Wednesday, January 7, 2009

एक अनुभव - रिक्षा

एक अनुभव तुमच्याशी शेयर करावासा वाटतोय .... आज मला ऑफीस ला रीक्षेने जायला लागले तस माज़ ऑफीस माज़या घरपासून खूपच लांब अहे.. मी माज़या घरच्या खाली आले रिक्षा स्टॅंड वर एकच रिक्षा उभी होती मनात विचार आला "आता ही रिक्षा येणार का माज़या ऑफीस कडे की नाही बोलेल..." मी रिक्ष्याच्या जवळ गेले एक धिप्पद सावळा माणूस, वयाने ४५ चा असेल,अंगात पांढरा ज़ब्बा आणि लेंगा आणि डोक्यावर पांढरी नेहेरू टोपी एकदम मराठी माणूस मी डोकवून बोलले "मगारपट्टा येणार का? "आणि त्यानी होकारर्थी मान हलवली आणि रिक्षा चालू केली... त्याच्या चेहेर्यावर आनंदाचे भाव दिसले कारण त्याला छान लामच भा डा मिळाल. पण आता पर्यंत नेहेमी जेव्हा मला ऑफीस ला रिक्षने जाव लागलाय तेव्हा मगारपट्टा एइकूण सगळ्यानी मला 20 रुपये जास्त होतील असाच उत्तर दिलय... पण आज जेव्हा हा माणूस मला काहीच बोलला नाही तेव्हाच मला आचर्य वाटल.. रिक्षा सुरू ज़ाली आणि अर्ध्या पावू न तासाने आम्ही मगारपटा मधे पोचलो... मीटर पाहून मला आचर्य वाटल की इतके कमी पैसे कसे ज़ले?...मी त्याना सांगितले "10.80 चे किती ..." त्याने टर्रिफ कार्ड काढले आणि बोलले ..."85" मी एकदम दचकले आणि बोलले "काय 85 ? कस शक्या आहे...हे तर फारच कमी अहेत...तुमच मीटर मधे काही तरी प्रॉब्लेम आहे बहुतेक..." पण मीटर तर चालत होत...ते एकदम गडबदले आणि बोलले "आता मी काय सांगू तुम्हीच सांगा किती घ्यायचे ते..." मग मी त्या सांगितले..."हे बघा इथून स्वॉरगेट पर्यंत 110 रुपये होतात ...आता बोला किती देऊ..."ते हसले आणि बोलले "140 द्या मॅडम..." मी त्याना त्यांचे 140 रुपये दिले कारण ते खरच त्यांचे होते... ते हसले आणि बोलले "सुखी राहा..."