Saturday, December 29, 2012

डमरू - पुणे

वाजत गाजत आलेला दमरु पुणेकर रेसिकाना अगदी पर्वणीच ठरला. डमरू प्रत्येक दिवस एक नवीन साज, नवीन स्वर आणि ताल देऊन गेला. डमरू ची बातमी आल्यावरच मी तारखा पाहूनच मनात ठरवल होत की हा कार्यक्रम चूकवायचा नाही आणि मला जायाच ही फार लांब नवत माझया घरातून अगदी 10 मिनिट चालानाच्या अंतरावरच होत. तारखा पहिल्या आणि माझ कॅलंडर मॅच केल ..दुसर काहीही काम, शूट्स त्या वेळेस नवते . दुसर्या दिवशी ऑफीस ला आले तर ऑफीस कडुनच डिसकाउंट पासेस मिळत होते , लगेचच पासेस बुक करून टाकले. डमरू च्या पहिल्या दिवशी कर्ण मधुर तालानी रसिकांना मंत्र मुग्द्ध केल. त्या दिवशी होते –
दिवस पहिला 1.मनी – मृदुंगम 2.सुरेश – घतटां 3.अमृत – खंजिरा 4.अल्लारखा ह्याचे पुत्रा फेज़ल – तबला 5.भवानी शंकर – पखवाज 6.नवीन शर्मा – ढोलकी. पहिल्या दिवशी पारंपारिक संगीता नंतर दुसर्‍यच दिवशी पुणेकर रसिकांना इंडो-वेस्टर्न एकायची संधी मिळाली बोन्डो कडून, बोन्डो हा गोव्याचा असून तो लहान पणा पासूनच हे अश्या प्राकरच म्यूज़िक वाजावतो ..त्याला खूपच कुकीन चा नाद असल्या मुळे किचेन मधल्या प्रत्येक गोष्टीतून कसा आवाज निर्माण होईल आणि त्याचे साचेशीर म्यूज़िक कसे तयार होईल हेच त्याचा डोक्यात नेहेमी असत , खाण्याचा दरडी आणि मुसिक चा छंदी अश्या ह्या बोन्डो ने लोकांना नाचायला भाग पाडले. त्यानंतर तन्वीर सिंग ह्यानी आपल्या अभूतपूर्व तबला वदनाने लोकांना थक्क केल पारंपारिक वाद्यआणि आधुनिक संगीत ह्याची बांधणी त्यानी खूपच छान आणि मधुर केली होती. दिवस दुसरा 1.बांदो – लॅटिन ड्रमिंग आणि फ्यूषन 2.तन्वीर साइन – तबला 3 विक्कू – घात्तम 4.स्वामीनाथन – खंजिरा तिसर्या दिवसाची सुरूवात तोंडाने किती विविध प्रकारचे ताल आणि नाद तयार होऊ शकतात ह्यावर पांडित्य मिळवलेले आणि काचारच्या दब्ब्यातून कसे ताल तयार होतात हे दाखवणारे एकमेव तौफिक खुरेशी आणि त्यांचा मुंबई स्टॅम्प ह्यानी पूर्ण वातावरणात एक वेगळीच गंमत आणली. दब्ब्यातून ते स्वतःच्य श्वासातून कशा ताल निर्मिती होते हे फक्त तोच माणूस करू शकतो. तौफ़ीक नंतर ग्रेग अलिस ह्या संगीत कारने स्वतच्या म्यूज़िक ने सगळ्यावर संगीत मोहिनी घातली. आणि सगळ्यात शेवटी आला तो माणूस ज्याच फक्त नाव एकटच टाळ्यांचा आणि शिट्ट्यांच खच पडतो असा एकमेव शिवमनी .. त्याच्या बद्दल काय सांगावे तेवढ कमीच आहे .. आणि मी आसा वेगळ काय सांगू ..एवढाच सांगते "तो आला ..त्याने वाजवले आणि त्याने मन जिंकली " दिवस तिसरा 1.तौफ़ीक आणि मुंबई स्टॅम्प – ड्रम्स 2.गेर्ग आल्लिसे – ड्रम्स 3.शिवमनी – ड्रम्स पुढच्या वर्षी पण माझ जाण नक्की कारण पुढच्या वर्षी डमरू आपल्याला देणार आहेत असेच टाल आणि नाद पण त्याच बरोबर पुणे कराना हावासा असणारा त्यांचाच एक आवाज महणजे पुण्याचे ढोल-तशा पथक.

Sunday, December 23, 2012

माफ करा माफ करा ..

माफ करा माफ करा .. खुपच बाकीच्या गोष्टींमध्ये व्यस्त असल्या मुळे इथे लिहायला आणि तुमच्याशी संवाद साधायला वेळच मिळाला नाही बाकीच्या म्हणजे ऑफिस च्या कामामुळे अगदी थकून गेलेय .. मला ब्रेक हवं एक छान ब्रेक ..रेफ्रेश करणारा पण आता नवीन वर्षाच्या संकल्पा मध्ये मी रोज नाही पण आठवड्या मध्ये काही काही तरी लिहेन आस काहीस ठरवत आहे असो , बराच काही सांगायचं , बोलायचं .. पण हळू हळू लिहीन आस ठरवलं तरी आहे .. बघू वेळ कशी साथ देते .. उम्म्म्म , कश्या पासून सुरु करू .. दिवाळी ? दिवाळी छान होती .. तेव्हा दिवाळी जाऊदेत .. अर्रे हा एक काम करते लिस्ट बनवते होपफुली मी सगळ लिहू शकेन. मला तुमच्याशी संवाद साधायचं खालील काही गोष्टींवर - १. माझी अष्टविनायक सहल २. ऑफिस च्या हेक्टिक वेळापत्रकामुळे हातातून निघून गेलेल सावाई चे एक पर्व ३. हिंजवडी आणि रस्ते ३. दिल्ली रेप केस ४. स्वर पण डमरू चे - द डमरू फेस्टिवल आता सगळ्यात लाटेस्त आहे ते म्हणजे द डमरू फेस्टिवल, जो पुण्यात ह्या शनिवारी आणि रविवारी झाला ! सो मी लवकरच तुमच्या बरोबर ह्या कर्ण मधुर कार्यक्रमाची माहिती शेर करेन .. तो पर्यंत टाटा ..