Wednesday, July 13, 2016

हीच ती वेळ ...

हाच तो दिवस, हीच ती वेळ असा करता करता आपण पुढे जात असतो
पुढे जात असतो की स्वतःला ढकलत असतो समाधान जातो की आसमाधानाने .. कदाचित समाधानाने जात नाही म्हणून पुढचा येणार दिवस सुरू पण तसाच करतो.

काही लोक म्हणातात मला असाच जगायचंय .. कोण काय बोलताय ह्याच मला काही घेणं देणं नाही ..लोक वेडे असतात काहीही अपेक्षा ठेवतात की मी कसं जगायचं कसं बोलायचं .. माझं मी बघेन 

खूप लोक बोलतात सकाळ किंवा दिवसाची सुरुवात छान झाली तर दिवस चांगला जातो .. पण लोक हे विसरतात .. दिवसात अनेक लोक आपल्याला कामानिमित्ताने भेटतात आणि त्यांची सुरुवात छान झालेलीच असते असा काही नसत .. त्यांचंही आपल्यावर परिणाम होतो ..

खरं तर प्रत्येक बिंदू वेळेचा, जगावं आसा असला पाहिजे .. किंवा तो जगता आला पाहिजे .. माहीत नाही कधी असा जमेल .. जेव्हा जमेल सगळे सुखी होतील. पण हे ह्या सगळ्याच उत्तर नाहीये .. 

एक पुस्तक वाचतेय सध्या.. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जो विचार करता तसं घडत .. तुम्हची गोष्टी तुमच्या जीवनातल्या आकर्षित करता .. जर तुमही सगळं छान हवाय तुम्ही फक्त छान आणि चांगले विचार कारण आवश्यक आहे .. आणि खरं तेच खूप अवघड आहे 

एक माझे काका आहेत ते नेहेमी हे बोलत असतात हीच ती वेळ चला .. कुठल्याही गोष्टी साठी जर ती छोटी असेल किंवा मोठी, काही करण्या आधी "हीच ती वेळ " ..
मला कधी कधी ते ऐकून वाटत बहुतेक असाच असेल जेव्हा काही घडत असेल किंवा घडायचं असेल एक वेळ त्याला असेलच ना ..?