Thursday, March 24, 2016

मन एक अजीब रसायन आहे ..

आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो. फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसत. सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत असेल, तर ती कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते. तेच, व्यक्तीच्या स्वभावात गोडवा, विनयशीलता आणि शालीनता असेल तर, त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ते हवहवसं वाटतं. सहवासातील माणसाचं देखील तसच असतं. एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं हा काही क्षणांचा खेळ असतो; पण जरी ती व्यक्ती सुंदर नसली आणि आकर्षक नसली पण तिच्या बोलण्यात जर गोडवा असेल जर ती समोरच्या माणसाला समजावून घेत असेल तर ती अधिक आकर्षक दिसू लागते ..
आयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात. काही जण तुम्हाला दिपवून टाकतात. तर, काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात. काही लोक तुम्हा तुमच्यातला लपलेला योदधा दाखवून देतात आणि कमाल घडवून आणतात .. आणि काही लोक तोच योदधा दाबण्याचा पर्यंत करतात. आपण जर एखाद्याच मोरल वाढवू शकलो तर ते एक असाधारण काम असत कारण त्याने ती व्यक्ती असा काही करून जाते कि तीच आयुष्य बदलून जाते ... पण फारच थोडी लोक हि गोष्ट लक्ष्यात ठेवतात. कि कोणीतरी आपल्या वाईट वेळेत साथ दिलीय बरसचे लोक हे सगळ विसरून जातात आणि आपल्या जीवनात रमून मोकळे होतात. जगात कुठलीच गोष्ट शाश्वत, निरंतर नसते, पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं . सात्विक प्रेमाची वाख्या कारण जरा अवघड आहे . कुठे तरी वाचल होत कि कितीही उजेड असेल सगळी कडे किवां खूप दिवे घरी लावले असतील पण जे समाधान एक छोट निरंजन लावून मिळत त्याच्या नाजुकश्या ज्योतीने जो प्रकाश मिळतो कदाचित ते मोठ्या दिव्याने पण मिळत नाही. कदाचित सात्विक प्रेम हि असंच असेल ..
नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच . आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याला नजर लागायला वेळ लागत नाही. काही वेळा गोष्टी मनाप्रमाणे नाही घडत आहेत असा दिसू लागत तेव्हा स्वभाव आणि परिस्तिति गोष्टी पण्यात पाहू लागतात. त्यांचा ताळमेळ घालायचा प्रयन्त करू पाहतात. तो जर बसला तर गोष्टी नीट होयला वेळ लागत नाही पण नाही बसला कि त्या खूप बिघडायला हि पण वेळ लागत नाही.
माणूस पण खूप वेगवेगळ्या गोष्टी वेळेप्रमाणे करत असतो. त्याच्या चांगल्या वेळेत तो सगळ छान होईल तस समोरच्या माणसाला समजावून घेतो. त्याला त्रास होऊ लागला कि तोच त्रास नात्यामध्ये दिसू लागतो. आपण झाड लावतो, ते वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतो पाणी घालतो, त्याची निगा ठेवतो, खत घालतो, झाड मोठ होऊ लागत बहरू लागत फुल फळांनी लगडू लागत, पण आपल्याला वाटत आता आपल काम संपल आत त्याची निगा राखण्याची गरज संपली पण तसं नसत , त्या झाडासाठी दिलेला वेळ आता पुन्हा द्यायची गरज नाही असा जेव्हा वाटत तेव्हाच खर चुकत, झाड काही वेळाने फुल देण बंद करत , पण माणसाला वाटत हे झाड असा का बर फुल फळच देत नाही. तो त्याकडे अजून दुर्लश्य करू लागतो , झाड अजून खराब होऊ लागत. बहुतेक नात्याचं पण असंच असाव ... खरच मन एक अजीब रसायन आहे.

No comments:

Post a Comment