Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Wednesday, March 16, 2016

रेघ

रुसून ओढली एकदा दोन मनामध्ये
पुसली तरी ओरखडा देवून गेली ..
आधीच्या खोल भावनाना प्रश्न पुसून गेली
गोंधलेल्या मनात अजून गोंधळ देवून गेली ..
आज वरच्या प्रेमाला नजर लावून गेली
आणि जुन्या वेळेवर धूळ पसरवून गेली..

Friday, July 5, 2013

पावूस आला पावूस आला ....

||आकाशातून बरसे जलधारा, न्हाऊन निघाला निसर्ग सारा, आसमंत हा नवा नवा ||.............. ||भिर भिर वारा आणि त्या पावूस धारा, चिंब मन आणि ओले क्षण, आसमंत हा नवा नवा ||.............. ||वीज आणि वार्याचा खेळ हा पहा, ह्या नव चैतन्यात जावून बघा, आसमंत हा नवा नवा ||............. ||पावूस आला पावूस आला, मन हे माझे हर्षुनी गेला, आसमंत हा नवा नवा ||............. ||इंद्रधनुश्याशी झालर, फुला आणि पानांचा भर, आसमंत हा नवा नवा ||............. ||सुंदर तो मोर पिसारा, हसला पाहून निसर्ग सारा, आसमंत हा नवा नवा ||..............

Sunday, January 29, 2012

अहम अहम .. भेटा माझ्यातल्या लेखक आणि फोटोग्राफर ला .."महाराष्ट्र टाइम्स" मध्ये !!

मला सांगण्यात खुपच आनंद होतोय कि माझा एक लेख कवडीपाट आणि त्याचेच काही फोटो , २८ जानेवारी च्या "महाराष्ट्र टाइम्स" मध्ये छापून आलाय.
२८ जानेवारीच्या सकाळी ७:०० च्या दरम्यान मला आनंदाचा धक्का मिळाला जेव्हा मला मझ्या काही जवळच्या लोकांचा फोन आला आणि मला कळल कि माझा लेख आजच्या पेपर मध्ये छापून आलाय .. मी तडक उठले आणि पेपर पहिला ... छान वाटल स्वताच नाव एवढ्या मोठ्या पेपर मध्ये वाचून ... दिवसभर बऱ्याच लोकांनी फोन करून अभिनंदन केल त्याच अप्रूप काही वेगळच नाही का ?



टीप -पूर्ण लेख नीट वाचण्यासाठी , वरच्या फोटोवर क्लीक करा.
किवा फोटो दुसऱ्या विंडो मध्ये उघडा आणि झूम करा.

Friday, January 20, 2012

माझीच मी ...


परडी भरली होती फुलांनी
ओसंडून वाहिली होती चारहि दिशांनी
वाहून गेले माझीच मी ...
अश्रू वाहोनि थिजले गाली
विरघळून गेली ती कहाणी
अस्मिता जपली माझीच मी ...
चान्दण झेललं ह्या ओठी
सुख साठवलं ह्या पोटी
ओंजळीत लपली माझीच मी ...
चालत चालत चालले मी
पुन्हा नं मागे पाहिलं मी
ओळखीच्या वळणवर, ना
नदीच्या काठावर, ना
संध्येच्या सूर्य बरोबर
चालत चालली माझीच मी ...

Saturday, January 14, 2012

भाव साजिरे दे ना मला .....


मोर पीस जणू फिरून गेल

घाव सारे वाहोनि नेले

भाव सारे देवोनी गेल

आनंदाच्या गगनात

फुलाच्या वनात

मोर पिसारयत ये ना पुन्हा

भाव साजिरे दे ना मला .....

Tuesday, December 13, 2011

न माझी मी राहिले , न माझी मी उरिले ......

तुझ्या डोळ्यात पहिले मी मला
न माझी मी राहिले ,न माझी मी उरिले

राहिले न माझे मी पण न थांबता विरघळून
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

सुंदर भासे सुंदर दिसे जगही आता
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

मन पक्षी पक्षी उडू लागले आकाशातून
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

गुंतले रेशमी बंध वाहिले चांदण्याचे गंध
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

तुझ्या डोळ्यात पहिले मी मला
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

Saturday, November 26, 2011

आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले ....


आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तोच चंद्र जो सगळ्यांना हवासा वाटतो
तोच चंद्र जो त्याच्या कवितेत असतो
तोच चंद्र जो तिच्या पुढे सुंदर नसतो
सुंदर असते ती, जी चंद्राला प्रश्न करते
खरच, आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तिचे हसणे पण चंद्राच्या त्या निखळ चांदण्यासारखे भासले
तिचे डोळे पण चन्द्रासारखे दिसले
नाही तर तिच्या डोळ्यात तरी चंद्र दिसला
आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
ती समोर दिसावी म्हणून चंद्र समोर दिसू लागला
आणि आता ती लाजली असेल आस वाटल कारण
चंद्र ढगात लपला ...

Sunday, October 9, 2011

विसरलास का सोडवायचेत अजून तुला खूप सारी कोडी .. ?




एक चूक आयुष्यातील, पुरते आयुष्यभर
कारण हजार कोडी टाकून जाते, हसून जीवनभर

एक कोड संपल कि दुसर उभ राहत
आणि सोडवत सोडवत, झालेल्या चुकेची आठवण करून देत

मन मारत मारत पुढे जाताना वाटत
करता येईल का ? मला माझ्या आयुष्यात एक तरी अंडू

ह्याच उत्तर माहित असत
म्हणूनच, जगत जातो करत पुन्हा पुन्हा रीडू

कधी वाटत झाल, संपली सगळी कोडी आता जगू मनावाणी
तेवढ्याच मन म्हणत अररे .. विसरलास का सोडवायचेत अजून तुला खूप सारी कोडी

पूर्ण जीवनाच्या चुकामुकीला तेवढ एकच निमित्त पुरत
झालेल्या भूल चुकीला खाकोत्याला बांधत

त्यातूनच शिकत शिकत जगावं लागत
केलेल्या प्रमादाने जगच भूल भुलैया दिसू लागत

आणि लोक कितीही चुकलेली असली तरी आपलीच भूल जाणवून देतात
कारण, आपले जवळचेही हसत हसत त्यांच्यात सामील होतात

Monday, September 26, 2011

मी .. कधी न संपणारी सुखाची चाहूल ...

जळून जाशील .. आग आहे मी ..
कधी न संपणारी वाट आहे मी ..

जितका जवळ येशील धग जाणवेल तुला ..
काही विचार करण्या आधीच ती संपवेल तुला ..

वाटत असेल सुंदर जाईल जीवन माझे
कस समजावू तुला, नको अडकुस .. हे मृगजळ असेल..

कारण अडकलास तर वाहत जाशील
इतका दूर, कि परत येण्याशी वाट विसरशील ..

विसरशील भूक आणि विसरशील जग..
कारण मला माहितेय, माझ्या आहे ती धग ..

माझा कडे आलास तर, माझाच होऊन जगू लागशील
वीज आहे मी, उर्जा आहे, मी .. कधी न संपणारी सुखाची चाहूल आहे.

Monday, November 29, 2010

लोक अशीही आणि तशीही !!!

लोक अशीही आणि तशीही

काही बोलणारी

काही कॅरणारी

काही बोलून कॅरणारी

काही न बोलून कॅरणारी

काही बेफिकीर

काही विश्वासू

काही घमेंदी

काही प्रेमळ

काही रागीत

तर काही दरयादील

पण खरी लोक तेव्हाच कळातात

जेव्हा तुम्ही स्वता संकटात असता

आनंदा मधे सगळेच साथ देतात

पण दुखात कळातात की कोण खर आहे आणि कोण खोत

काही फॅक्ट बोलतात

काही फॅक्ट आश्वासन देतात

काही न बोलून मदत करतात

काही बोलून काहीच करत नाहीत

खरच एवढ फसव जग असु शकत ?

की आपली दृष्टी कमी पडतेय ?

???? उत्तर बहुतेक त्यांच्याकडे असेल !!

Thursday, July 30, 2009

स्वार्थ

लोक खरच का स्वार्थी असतात ,अगदी जे आपल्या जवळचे वाटतात?

हल्ली कोणीही कसाही वगल तरी मनाच्या कोपर्‍यात एक प्रशचिन्ह येत

ह्यात तर काही स्वार्थ नसेल ना ?

कारण आपण तर सगळ च देऊन बसू आपल्या न काळात …

पण त्याच महत्त्वा ती ठेवेल का आपल्याला जपत ?

खरच प्रेम आणि स्वार्थ कधी एकत्र येऊ शकतात

माझ मन तर मनात नाही , पण काय सांगाव खार कोणी बोलत नाही.

आयुष्याच्या ह्या उंबरठ्यावर हा प्रश्न , खर तर एक कोड आहे ..

पण मी म्हणते लोक आस वागतात, म्हणूनच प्रश्न पडतात.

Tuesday, December 2, 2008

प्रेम कोणी करावे

प्रेम कोणी करावे

ज्याला प्रेमाचा अर्थ कळलाय

ज्याला त्या अर्थातील सत्य कळलेय

ज्याला सत्या तील वचन कललाय

ज्याला त्या वाचनातून समोरच्या च्या भावना कळल्यात

आणि ज्याला त्या भावना नेहेमी जपा व्याश्या वाटतील

कारण जपणे ही प्रेमाची पहिली पायरी आहे.....