
जेव्हा मी देवूळच पोस्टर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर ह्या दोघांची जोडी पहिल्यांदाच एका छान चित्रपटात काम करतेय हे पाहून मस्त वाटल. त्यांच्या वृत्तवाहिन्यावर येणारे इंटरवीएव्स पाहून वाटल चला एक छान चित्रपट बर्याच दिवसांनी येतोय मस्त बघू सिनेमा गृहात जावूनच ...
कुलकर्णी'स चा असलेला हा दुसरा चित्रपट म्हणजे "वळू" नंतरचा .. तीच टीम फक्त बदल आसा कि एक कुलकर्णी गायब म्हणजे अतुल कुलकर्णी च्या जागी नाना पाटेकर बस ! बाकी तेच गाव, तेच डोंगर , तीच घर ,तीच मानस सगळ तेच .. असो पण गोष्ट तर वेगळी आहे ना ?
असं म्हणत गेले चित्रपट पाहायला ... लोकांची तशी गर्दी होती म्हणजे होऊस्फुलाच होता जवळ जवळ ... छान वाटल पाहून कि मराठी प्रेक्षक हल्ली सिनेमे चित्रपट गृहातच येवून पाहतात ..
चित्रपट चालू झाला आणि हळू हळू कळायला लागले कि आरे नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर हे च खरे तर मार्केटिंग चे हत्यार आहे .. म्हंजे चित्रपटाचा विषय अतिशय छान आहे आणि तो दाखवलाय पण छान, छोटे छोटे बारकावे पण दिग्दर्शकाने व्यवस्तीत पाने पार पाडलेत .. विषय कुठेही कंटाळवाणा त्याने होऊ दिला नाहीये म्हणजे थोडक्यात विषयाला छान जगवालाय हा चित्रपट ..
एक छोट खेड तेच जे वळू मध्ये होत ते, एका गुराख्याला म्हणजे हा गुराखीच पूर्ण चित्रपटाचा नायक आहे , हा तर त्याला एका भर दुपारी एका उंबराच्या खाली झोपलेला असताना साक्षत्कार होतो कि त्याला दत्त दिसले ! बस मग काय हि बातमी पूर्ण गावात पसरते सगळे हळू हळू तिथे येवून दर्शन घेवू लागतात त्यात गावातले काही मोठे लोक म्हणजे राजकारणी लोक त्याच बातमीचा फायदा घेवून राजकारण सुरु करतात आणि सगळी पोवर वापरून अनादित्रीत्या त्या जागी एक देवूळ बांधतात, ज्या गावामध्ये खरतर एका सरकारी इस्पितळाची गरज असते तिथे उभ राहत एक मंदिर एक देवूळ आणि तेच देवूळ मिळवून देत तिथल्या लोकांना पोट आणि खिसा भरण्याचे साधन ... जी लोक राजकारण खेळूनच त्या गावासाठी वीज, पाणी, रस्ते करू शकलेले नसतात तीच देवूळ झाल्याने सगळ काही करून देतात कारण त्यांना त्याचा मागे मिळत असतो पैसा ... अमाप पैसा !!
पुढे गावच गावपण हिरावल जात .. जो तो पैश्याच्या मागे पळताना दिसतो आणि ज्या दत्ता मुळे हे सगळ मिळाल असत त्यालाच विसरून जातो ..
पण ज्याला ह्या सगळ्या गोष्टीचा साक्षत्कार झालेला असतो तो काश्या समजू लागतो खरी परीस्तीती ..आणि तो एक दिवस देवालाच चोरतो आणि घेवून जातो गावापासून खूप लांब आणि बिचाऱ्याला वाटते चला देव गेला तर गाव पूर्वी सारख छान होईल पण तसं काही घडत नाही .. आणि मग हा चित्रपट संपतो ..हो म्हणजे खरच संपतो
आता तुम्ही बोलाल ह्यात नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर आहेत कुठे ? तेच तर ते खरच, आहेत कुठे ? नाना पाटेकर तरी आपल्याला थोडा दिसतो राजकारणात गावाचा पाटील म्हणून आणि थोडासा चित्रपट नानाच्या वाटेला आला आहे पण दिलीप प्रभावळकर तर फक्त गावाच्या पाटला कडे गावामध्ये होणारे इस्पितळ ची इमारत कशी असेल आणि हा पूर्ण प्रोजेक्ट कसा काम करेल फक्त हेच सांगतो तेही फक्त अर्ध्या चित्रपटात नन्तर तोही निघून जातो म्हणजे मी तर हा चित्रपात बनवला आसता तर कदाचित दिलीप प्रभावळकर ला पाहुणा कलाकार म्हनून संबोधल असत ..पण इथेच आल मार्केटिंग नाना- प्रभावळकर च्या जोडीला पुढे करून हा चित्रपट खूप गर्दी खेचतोय हेच तुम्हाला पाहायला मिळेल पण जर तुम्ही खास नाना व प्रभावळकर चा अभिनय पहायचा अस काहीस मनात ठेवून हा चित्रपट बघायला गेलात तर मात्र तुमच्या पदरी निराशा अपेक्षित आहे ..
केवळ मार्केटिंग हेच हत्यार वापरलाय ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ... जेवढा खर्च चित्रपट बनवण्यासाठी केलाय तेव्हढाच मार्केटिंग साठी ... "दुनिया झुकती ही झुकाने वाला चाहिये" हे मात्र खर ठरत खास देवूळच्या बाबतीत ..असो एकंदरीत मराठी चित्रपट सुद्धा आता हिंदी वाल्यासारखे आपल्या चित्रपटाचे मार्केटिंग खास करून गर्दी खेचू शकतात हे तितकाच खर !!!
मुळात तिथे नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकरांच्या जागी कोणीही असते तरी फरक पडला नसता.
ReplyDeleteआणि हा सिनेमा वळू/विहीर च्या दिग्दर्शक/ कथाकारांचा आहे म्हणून पाहायला जाणारे लोक भरपूर होते असे मला वाटते .
मान्य आहे , ह्या दिग्दर्शक/ कथाकारांचा सिनेमे छानच असतात आणि तसा उल्लेख मी माझ्या निरक्षणआत लिहिले आहे .. त्यांचे सिनेमे बहाण्यासाठी गर्दी असतेच ह्या बाबत माझ काही म्हणण नाही ..पण शेवटी नाना + प्रभावळकर हि जोडी जर ह्या लोकांच्या चित्रपटामध्ये असेल तर अजून जास्त गर्दी हा सिनेमा खेचेल ह्यात काही वाद नाही आणि त्यामुळेच मी माझी बाजू मांडलेय .. आणि जर तुम्ही हा सिनेमा येण्याच्या आधी त्याच्या बाबतच्या मुलाखती पहिल्या असतील तर तुम्हीही माझ्या मतावर आला असतात बाकी प्रत्येकाचं मत वेगळ ..
ReplyDeleteब्लोग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!