Friday, July 5, 2013

पावूस आला पावूस आला ....

||आकाशातून बरसे जलधारा, न्हाऊन निघाला निसर्ग सारा, आसमंत हा नवा नवा ||.............. ||भिर भिर वारा आणि त्या पावूस धारा, चिंब मन आणि ओले क्षण, आसमंत हा नवा नवा ||.............. ||वीज आणि वार्याचा खेळ हा पहा, ह्या नव चैतन्यात जावून बघा, आसमंत हा नवा नवा ||............. ||पावूस आला पावूस आला, मन हे माझे हर्षुनी गेला, आसमंत हा नवा नवा ||............. ||इंद्रधनुश्याशी झालर, फुला आणि पानांचा भर, आसमंत हा नवा नवा ||............. ||सुंदर तो मोर पिसारा, हसला पाहून निसर्ग सारा, आसमंत हा नवा नवा ||..............