Tuesday, November 22, 2011

पोर्न स्टार सन्नी लीवओन ची बिग्ग बोस नावाच्या रिअलिटी शो मध्ये एन्ट्री ..खरच गरज आहे का ?




पोर्न स्टार सन्नी लीवओन ची बिग्ग बोस नावाच्या रिअलिटी शो मध्ये एन्ट्री .. हि बातमी वृत्तवाहिन्यावर झळकताच, आपले सगळे लोक खडबडून जागे झाली. सगळ्या वाहिन्यावर तेच तेच बातम्या आणि त्याच एका बातमीवर वाद विवाद चालू झाला !
कळत नकळत मी हि असंच बातमी पहिली आणि जास्त काही कळण्याच्या आताच मी दुसऱ्या चानेल चा नंबर दाबला पण लक्षात राहील फक्त नाव सन्नी लीवओन ...एक पोर्न स्टार
दुसऱ्या दिवशी पेपर वाचून झाल्यावर माझ्या ते नाव एकदमच माझ्या डोक्यात आल मग मी विचार केला पोर्न स्टार म्हणजे नक्कीच हे सगळ नग्नता आणि अश्लीलता असलेले मॉडेल बद्दल असेल म्हणूनच एवढा आरडा ओरडा सगळ्या वृत्तवाहिन्या वर चालू होता. कधीही न पाहिलेला चेहेरा आणि कधीही न ऐकलेलं नाव कोणाच आहे हे पाहण्यासाठी मी गुगल केल आणि मला घाम फुटला जे काही माझ्या समोर आल ते पाहून ... त्या सगळ्या होत्या पोर्नोग्राफी च्या साईटस आणि हि सन्नी आहे त्या साईटसची स्टार ...
आणि ह्या एवढ्या मोठ्या रिअलिटी शो मध्ये हिला बोलावलंय .. का ? कश्या साठी ? असे भरपूर प्रश्न माझ्या समोर आले .. उत्तर फारच सोप आहे ह्या वाहिन्यांना हवा आहे पैसा आणि यश, प्रसिद्धी .. TRP वाढवण्यासाठी काय वाटेल ते करतील हि लोक उद्या काय वाटेल ते दाखवतील, स्वताच्या स्वार्थासाठी हे लोक हे का नाही विचार करत कि आपण जे काय दाखवतोय ते एका नेशनल वाहिनी वर दाखवतोय आणि हे सगळ फक्त १८+ लोक नाही तर सगळे पाहत आहे, अगदी लहान मुल हि ...
आता हेच उदाहरण घ्या ना मला हे नाव माहित नवत तिचा चेहेरा माहित नवता म्हणून मी गुगल केल माझ्या प्रमाणे भरपूर लोक असतील जे असच करतील आणि सोडूनही देतील पण जर नुकत्याच वयात आलेली कोणीही मुल आणि मुलीने हेच केल आणि त्यांना कळाल कि हि कोण आहे तर त्यांच्याच सामान्य ज्ञानमध्ये नको त्या गोष्टीची भर नाही का पडणार आणि गरज नसताना आणि वयही नसताना ..
आपलीच लोक पैश्यासाठी अश्या गोष्टी समोर आणून माहित नसलेल्या आणि नको असलेल्या लोकांना प्रसिद्धी मीळवून देतात ह्याच गोष्टीच मला नवल वाटत .. आज कोणालाही माहित नसलेली हि मुलगी अचानकच समोर आली आणि फेमस हि झाली .. सगळ कश्या साठी TRP आणि पैश्यासाठी ... आणि काय तर तिला हिंदी चित्रपट साठी पण ऑफर मिळतेय खरच कहर आहे निर्लजतेचा !!

3 comments:

  1. इतरांकडे (जगाकडे) बघायचा दृष्टीकोन बदलला की जग जरा अधिक चांगले दिसतं असं म्हणतात...
    शरीराने वाढलेली असली तरी कदाचित अंतस्थ मनाने तिथे एक लहान मुलगी असू शकते...
    तिथेही ही पोर गांवभर नाचत असेल की जिला कोणीतरी कुठल्यातरी घरात घेतलं तर आणखी कोणीतरी चांगल्या (सर्वसामान्य समाजमान्य) सिनेमात घेऊन सन्मार्गावर आणलं... असा म्हणायला वाव आहे की बराच काळ उघड्या राहिलेल्या अंगावर एक वस्त्र टाकून ते झाकलं...

    पहा वि४ करून...

    ReplyDelete
  2. नामधारी विनवी (प्र)सिद्धासी, ब्लोग ला भेट दिल्याबद्दल आभारी आहे .. तुमच मत मला मान्य आहे पण प्रत्येक नाण्याला २ बाजू असतात आणि आपल्या लोकांनी वाईट बाजू पकडून पैसा करायचा हेच उचलून धरल तर तेही आपण चालवून घ्यायचं आस मला वाटत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे बिग्ग बोस आणि अजून इतर शो काय सगळेच हळू हळू घाणेरडे आणि किळसवाणे होत चाललेत ह्यात मला कुठेच शंका वाटत नाही आणि तिला चित्रपट देतंय कोण आणि कुठला हाही एक विचार करावा असा मला मनापासून वाटते आणि दुसरी कडून लोक भारतात घेवून येण्या पेक्षा इथल्या लोकांना तुम्ही वाव द्या नवीन talent शोधून काढा ..पण जर पटकन पैसा आणि यश हव असेल तर ते शक्य नाही म्हणून सन्नी सारखी मुलगी हे शोधत असतात .. सन्नी आणि इतर कोणीही पैश्यासाठीच हे सगळ करताय हे हि तुम्ही विसरू नका आणि चला एका प्रकारे मान्य केल कि तिला चांगला कपडा दिला अंग झाकायला, ह्या गोष्टीची काय गेरंटी कि ती पुन्हा पैश्या साठी आता करतेय ते पुन्हा करणार नाही ... आणि आता ती जे काही करतेय ते मला नाही वाटत कि वाट चुकून आणि मनात नसताना करतेय .. शेवटी प्रत्येकच मत वेगळ आपण आपल्या समाजाला आणि मुलांना काय चांगल द्याव आणि देवू नये हे प्रयेकाने ठरावाव

    ReplyDelete
  3. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर...
    कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...
    कोण मेले कुणासाठी रक्त ओकून...

    सत्य नाकारून चालत नाही... त्याला स्विकारतच मार्ग काढायचा असतो...

    ReplyDelete