तुझ्या डोळ्यात पहिले मी मला
न माझी मी राहिले ,न माझी मी उरिले
राहिले न माझे मी पण न थांबता विरघळून
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले
सुंदर भासे सुंदर दिसे जगही आता
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले
मन पक्षी पक्षी उडू लागले आकाशातून
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले
गुंतले रेशमी बंध वाहिले चांदण्याचे गंध
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले
तुझ्या डोळ्यात पहिले मी मला
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले
प्रीती,
ReplyDeleteतुमचा ब्लॉग पाहिला. पोस्ट वाचल्या. चांगल्या आहेत.
तुम्ही गझल लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे का ?
पार्श्वभूमीवर हा जो फोटो लावलेला आहे तोही खूप आवडला. फोटोच्या ब्लॅक अँड व्हाईटपणामुळे तो अधिकच गूढ, गहिरा वाटतो.
शुभेच्छा.
केदार, धन्यवाद !! ब्लोग ला भेट दिल्याबद्दल आणि ब्लोग आवडल्या बद्दलही ... त्या चारोळ्या आहेत फक्त मी थोड वाढवून लिहील आहे .. तुम्हाला ते शब्द गझल वाटले ह्या मधेच मला छान वळत आणि माझा विश्वास वाढला ..
ReplyDeleteतो फोटो माझा स्वताचा आहे मला ब्लोगला थोडा वेगळा लूक द्यायचा होता म्हणून मी तो तसा वापरला आहे .. पुन्हा एकदा धन्यवाद !!
धन्यवाद.
ReplyDeleteतुमचा फोटो म्हणजे साठी-सत्तरीच्या दशकातील हिंदी सिनेमाच्या नायिकेसारखा वाटतोय.
अलीकडच्या काळात माझीही फोटोग्राफीची आवड विकसित झालेली आहे. खर्चिक प्रकरण आहे, म्हणून पूर्वी तो विषय सोडून दिलेला होता. याच वर्षी डिजिटल कॅमेरा घेतल्याने खूप वेगवेगळे फोटो काढता आले. प्रिंट न करताही कॅमेरावरच पाहता आले. काही डेव्हलप करून घरातच फ्रेम करून लावले. यात खूप आनंद मिळाला.
तुम्ही अलीकडे कशाचे फोटो काढलेत ?
केदार, खूपच मोठी कॉम्प्लेमेंत दिलीत तुम्ही !! धन्यवाद ..
ReplyDeleteमीही फोटोग्राफी करते, तुम्ही मी काढलेले फोटो फेसबुक वर पाहू शकता - ID - priti gaik आणि जे फोटो slide show वर चालू आहेत ते हि मीच काढलेले आहेत
मला जेव्हा वेळ मिळतो मी फोटो काढते आणि लिहिते ..