बऱ्याच दिवसात काही लिहीयला वेळ मिळाला नाही म्हटलं एक छोटासा अनुभव सांगावा ...
गेल पूर्ण एक वर्ष मी माझी कार तशीच चालवत आहे म्हणजे माझ्या कडे लर्निग लायसन्स आहे पण परमनन्त काढायला मला वेळच मिळत नवता. शेवटी मागच्या आठवड्यात वेळ काढून गेले आळंदीला त्या ऑफिस मध्ये , लगेचच काम झाल आणि मला जाम भूक लागली होती म्हनून मी पुढे फिनिक्स मॉंल मध्ये जायचं ठरवले . बरेसचे मित्र तिथेच जवळच काम करत असल्यामुळे मी सगळ्यांना फोन करून बोलावून घेतल . सगळ ठरल्यावर मी लायसन्स च्या ऑफिस मधून निघाले आणि थेट नगर रोड ला जाऊ लागले तेवढ्यातच एका डाव्या वळणावर माझ्या कडून गाडीला जोरात ब्रेक लागला नी माझा मोबाईल माझ्या मांडीवरुन खाली पडला कारण गाडी चालवताना मोबाईल मी नेहेमी मांडीवर ठेवते, म्हणून मी गाडी थोडी बाजूला घेतली आणि सीट बेल्ट काढला फोन उचलला आणि बेल्ट लावायचा विसरले आणि तशीच पुढे गेले , लगेचच पुढे रस्ता नगर रोडला जावून मिळत होता .
तिथे होता मामा , नेमेक ( माझ वाईट नशीब ) मला पाहिलं आणि पाहिलं कि माझा सीट बेल्ट लावला गेला नाहीये. मग काय गाडी बाजूला घ्या म्हणून मला त्याने खूण केली आणि मी घेतली. पाहिलं मी त्याला गाडीतूनच सांगण्याचा प्रयन्त करत होते कारण बाहेर अतिशय घाण उन होत पण त्याच लक्ष दुसऱ्या मुलाकडे होत ज्याला त्याने माझ्या आधी पकडल होत सिग्नल तोडल्या मुळे .. मग मीच गाडीतून खाली उतरले आणि त्याच्या गाडी जवळ गेले . त्या मुलाच काम झाल्यावर आणि त्याच्या कडून पैसे घेतल्यावर त्यांनी त्याच लक्ष माझ्यावर वळवल , काही न बोलता रिसीट बुक वर लिहायला त्याने सुरुवात केली. लायसन्स दाखवा .. मी दाखवलं , मग विचारलं नाव काय आहे ... नाव सांगितलं मग विचारलं कुठे राहता .. ते पण सांगितलं .. तो पर्यंत मी माझ्या डोळ्यांवरचा गोगल डोक्यावर लावला आणि त्याला बोलले , काका .. मी इथेच बेल्ट काढला होता माझा मोबाईल पडला म्हणून मी तशी गाडी कधीच नाही चालवत आणि माझी दुसरी गाडी तर बेल्ट लावला नाही तर बीप वाजवत राहते ..त्यामुळे मला बेल्ट लावूनच गाडी चालवायची सवय आहे ...
तेव्हा त्यांनी माझ्या कडे नीट दोनदा पाहिलं आणि तो बोलला , बाई .. तुम्ही कुठल्या मराठी सीरीअल मध्ये आहात का ? मला कळलाच नाही मी म्हटलं काय ? त्यांनी पुन्हा विचारलं मी बोलले हो मी असते सिरिअल मध्ये ...
लगेचच त्याचा बोलण्याचा स्वर बदलला .. मि त्याला सॉरी बोलण्या ऐवजी तोच मला सॉरी बोलायला लागला .. सॉरी, मादाम हा मी ओळखल नाही ..इथे कुठे काम काढलात .. एवढ्या लाबं ? मी सांगितलं कि माझ काही काम होत आणि आता मी फिनिक्स मॉंल ला जातेय माझे काही मित्र माझे वाट पाहत आहेत .. मी म्हटलं किती पैसे झाले सांगा मला मोकळ करा .. मग काय तो बोलला .. मी नसते घेतले पैसे हो पण मी रिसीट तयार केलेय .. तुम्ही एक काम करा ५० द्या फक्त .. सॉरी हा मादाम ... मी म्हटलं ..ठीक आहे काहीच हरकत नाही मी रुल तोडलाय देते पैसे ... आणि मी तिथून निघाले ..निघताना पण त्याने अगदी छान हसत मला अच्छा केला ...
पुढे गेल्यावर हा अनुभव मी माझ्या मित्र मैत्रीण सांगितला, घरी सांगितला ..सगळे खूप खूप पोट धरून हसलो माहित नाही त्या पोलिसाला मी कोण मराठी कलाकार वाटले ते ... पण छान वाटला तो अनुभव !