Showing posts with label माझ लाइफ. Show all posts
Showing posts with label माझ लाइफ. Show all posts

Friday, June 21, 2013

माझ ..नवीन .. घर .. आणि ..शिफ्टींग ...

नवीन घरात शिफ्ट होवून एक महिना झाला तरी अजून घर सेट करण काही थांबलेलं नाही. मी तर ह्या मताला आलेलं आहे कि मराठीत एक म्हण आहे "घर पहाव बांधून" तस "घर पहाव शिफ्ट करून" हे हि तेवढंच अवघड आहे. करण इथे दोन गोष्टी कराव्या लागतात पाहिलं म्हणजे आधीच्या घरातून आपल्याला हवेत त्या सगळ्या गोष्टी आवरून एकत्र भरायच्या मग त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नवीन ठिकाणी जावून बाहेर काढायच्या आणि लावायच्या. अर्रे राम किती ते काय काय कराव लागत .. आता तुम्ही बोलाल कि पेकेर्स अंड मुवेर्स का नाही वापरल इतक सोप आहे शिफ्ट करण .. पण ते लोक फक्त आपण काढून ठेवलेल्या गोष्टी पेक करतात आणि नवीन ठिकाणी जावून अनपेक करतात पण त्यांना आपणच सगळ काढून द्याव लागत .. हा मोठय गोष्टी जस TV ,, फ्रीज ह्या गोष्टी ठीक आहेत ते स्वताच नित पेक करतात. असो तर अश्या प्रकारे मी जुन्या घरातून नवीन घरी शिफ्ट झाले म्हणजे मुवेर्स ने आणल सगळ समान पण आणल्या नंतर लावण आहेच ना .. विचारू नका जवळ जवळ ५ दिवस मी तेच करत होते पहिला हॉल मग किचेन आणि मग शेवटी बेडरूमस .. किचेन मध्ये सगळ लावण तस फास्ट झाल करण तश्या प्रत्येक गोष्टी साठी सोयी करून ठेवलेल्या होत्या ..त्या मानाने हॉल पण लगेच लागला पण वेळ गेला तो बेडरूम्स मध्ये...करण घरातल तेच एक ठिकाण असत जिथे आपण सगळ्यात जास्त वेळ काढतो मग त्यचे माचींग पडदे त्याचा अम्बिअन्स चांगलाच हवा नाही का ?सकाळ पासून मी कामाला लागायचे कालाय्चाच नाही कधी वेळ गेला ते .. रोज एक लिस्ट बनवायचे आज काय हे आणायचं ..ते आणून झाल कि दुसर्या दिवशी अजून एक दुसरी लिस्ट तयार ह्यायाची ..घरातलं आवरून बाहेरच शोप्पिंग बापरे दम निघाला सगळा त्यात मे चा भयानक गरमा .. पण एवढ सगळ करून जे घर आपलं छान दिसत ते अप्रूप वेगळाच असत ............................................................................. आता घर नित लागलाय तरी मध्ये च काही तरी असत कि अर्रे हे आणायचं राहिलंय ..लिस्ट काय अजून संपत नाहीये :) पण वर्थ आहे हे करणआणि आपल घर लावण ह्यात जो आनंद मिळतो तो कशातच नाही ..नाही का ? ................................................................................................................. आता ह्या घरातील एक जागा हि आता माझी फार लाडकी झालेय माझ्या बेड रूम मधली खिडकी .. जिथे बाजूला सोन चाफ्याच्या फुलांनी बहरलेल झाड आहे हल्ली माझी सकाळ चहा बरोबर तिथेच होते .. हेच काय आताही मी तिथेच बसून हे सगळ लिहितेय ..

Saturday, December 29, 2012

डमरू - पुणे

वाजत गाजत आलेला दमरु पुणेकर रेसिकाना अगदी पर्वणीच ठरला. डमरू प्रत्येक दिवस एक नवीन साज, नवीन स्वर आणि ताल देऊन गेला. डमरू ची बातमी आल्यावरच मी तारखा पाहूनच मनात ठरवल होत की हा कार्यक्रम चूकवायचा नाही आणि मला जायाच ही फार लांब नवत माझया घरातून अगदी 10 मिनिट चालानाच्या अंतरावरच होत. तारखा पहिल्या आणि माझ कॅलंडर मॅच केल ..दुसर काहीही काम, शूट्स त्या वेळेस नवते . दुसर्या दिवशी ऑफीस ला आले तर ऑफीस कडुनच डिसकाउंट पासेस मिळत होते , लगेचच पासेस बुक करून टाकले. डमरू च्या पहिल्या दिवशी कर्ण मधुर तालानी रसिकांना मंत्र मुग्द्ध केल. त्या दिवशी होते –
दिवस पहिला 1.मनी – मृदुंगम 2.सुरेश – घतटां 3.अमृत – खंजिरा 4.अल्लारखा ह्याचे पुत्रा फेज़ल – तबला 5.भवानी शंकर – पखवाज 6.नवीन शर्मा – ढोलकी. पहिल्या दिवशी पारंपारिक संगीता नंतर दुसर्‍यच दिवशी पुणेकर रसिकांना इंडो-वेस्टर्न एकायची संधी मिळाली बोन्डो कडून, बोन्डो हा गोव्याचा असून तो लहान पणा पासूनच हे अश्या प्राकरच म्यूज़िक वाजावतो ..त्याला खूपच कुकीन चा नाद असल्या मुळे किचेन मधल्या प्रत्येक गोष्टीतून कसा आवाज निर्माण होईल आणि त्याचे साचेशीर म्यूज़िक कसे तयार होईल हेच त्याचा डोक्यात नेहेमी असत , खाण्याचा दरडी आणि मुसिक चा छंदी अश्या ह्या बोन्डो ने लोकांना नाचायला भाग पाडले. त्यानंतर तन्वीर सिंग ह्यानी आपल्या अभूतपूर्व तबला वदनाने लोकांना थक्क केल पारंपारिक वाद्यआणि आधुनिक संगीत ह्याची बांधणी त्यानी खूपच छान आणि मधुर केली होती. दिवस दुसरा 1.बांदो – लॅटिन ड्रमिंग आणि फ्यूषन 2.तन्वीर साइन – तबला 3 विक्कू – घात्तम 4.स्वामीनाथन – खंजिरा तिसर्या दिवसाची सुरूवात तोंडाने किती विविध प्रकारचे ताल आणि नाद तयार होऊ शकतात ह्यावर पांडित्य मिळवलेले आणि काचारच्या दब्ब्यातून कसे ताल तयार होतात हे दाखवणारे एकमेव तौफिक खुरेशी आणि त्यांचा मुंबई स्टॅम्प ह्यानी पूर्ण वातावरणात एक वेगळीच गंमत आणली. दब्ब्यातून ते स्वतःच्य श्वासातून कशा ताल निर्मिती होते हे फक्त तोच माणूस करू शकतो. तौफ़ीक नंतर ग्रेग अलिस ह्या संगीत कारने स्वतच्या म्यूज़िक ने सगळ्यावर संगीत मोहिनी घातली. आणि सगळ्यात शेवटी आला तो माणूस ज्याच फक्त नाव एकटच टाळ्यांचा आणि शिट्ट्यांच खच पडतो असा एकमेव शिवमनी .. त्याच्या बद्दल काय सांगावे तेवढ कमीच आहे .. आणि मी आसा वेगळ काय सांगू ..एवढाच सांगते "तो आला ..त्याने वाजवले आणि त्याने मन जिंकली " दिवस तिसरा 1.तौफ़ीक आणि मुंबई स्टॅम्प – ड्रम्स 2.गेर्ग आल्लिसे – ड्रम्स 3.शिवमनी – ड्रम्स पुढच्या वर्षी पण माझ जाण नक्की कारण पुढच्या वर्षी डमरू आपल्याला देणार आहेत असेच टाल आणि नाद पण त्याच बरोबर पुणे कराना हावासा असणारा त्यांचाच एक आवाज महणजे पुण्याचे ढोल-तशा पथक.

Saturday, May 5, 2012

USA embassy - अनुभव

USA embassy समोर बसून काय कराव कळत नवत म्हणून म्हटलं थोड लिहाव काही तरी कनस्त्रक्टीव तरी होईल. मी माझ्या घाईमुळे आणि मुर्खापणा मुळे माझा कॅमेरा पुण्यातून निघताना घेतला नाही तो जर आणला असता तर आता मला जास्त काही विचार करायची वेळच लागली नसती कारण इथे प्रत्येक गोष्ट कॅमेरा ्मधे बंद करण्याची होती, मागेच समुद्र होता तिथे हि मला फोटो काढता येवू शकले असते पण काही उपयोग नाही आता ..विचार करूनही ... मग विचार केला कि जर माझ्या लिहिण्यातून मी इथले चित्र जर वाचकासमोर आणू शकाले तर छान होईल. मी आता एका फळ वाल्याच्या शेजारी रचून ठेवलेल्या फळांच्या क्रेट वर बसली आहे आणि मस्त चहा पीत पीत हे लिहित आहे. माझ्या आजू बाजूला असंख्य लोक उभी आहेत, रस्त्याच्या इकडच्या तिकडच्या दोन्ही बाजूला लोकन्चि ये जा चालु आहे. embassy मध्ये जाणारी लोक म्हणजेच अप्लीकॅन्त अतिशय तणावातून रांगेत हळू हळू पुढे सरकत embassy मध्ये जात आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न .. माझे काय होईल ?, मला काय प्रश्न विचारतील ? त्यांची भाषा मला कळेल का ? सगळ्यात महत्त्वाच म्हणजे मला विसा मिलेल का ? कोणी ओफिस कडून H1 वा L1 करण्यासाठी आलेले आहेत किवा कोणी आपल्या मुलीकडे व मुलाकडे जाण्यासाठी विसा करत आहेत, त्याचं एक वेगळच टेन्शन. नवीन लग्न झालेल्या मुलींचं वेगळाच टेन्शन .. त्या आपल्या भविष्य ठरण्यासाठी रांगेत उभ्या आहेत .. लग्न तर झालाय पण विसा होईल का आणि मी तिकडे जाऊ शकेन का ? अश्याच काहीश्या भावना त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहेत. हि झाली आत जाणाऱ्या लोकांची परीस्तीती .. आता बाहेर कोणाचे आई बाबा आपल्या मुलाचे काम होईल कि नाही हि चिंता करत उभे आहेत, कोणाचा भाऊ , कोणाचा नवरा, कोणाची बहिण, काका, मामा अशी असंख्य लोक embassy बाहेर जागा मिळेल तिथे बसून आपल्या माणसाची वाट पाहत आहेत .. कित्येक लोक स्वताला सोफास्तीकॅतेड किवा लई भारी समजणारी मस्त फुटपाथवर बसलेले इथे तुम्हाला दिसतील म्हणजे तसं मी हि इथे अशीच बसलेय. तेवढ्यात माझ लक्ष इथून चालत असलेल्या मुलींच्या घोळक्यावर गेल त्या विसा साठी आलेल्या दिसत नवत्या कदाचित इथून जात असतील. माझ लक्ष गेल त्यांच्या outfit वर आणि accesaries वर. एकंदरीतच मुंबईत नवीन ट्रेंडस खूप लवकर येतात आणि नंतर त्या इतर सगळ्या शहरामध्ये पसरतात. मुंबईच्या मुली लगेचच ओळखू येतात, एकतर गोगल त्यांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो मग त्यातही त्यांची फशन दिसते मग तो ब्रान्देड नसला तरी त्यांना चालतो. त्यांच्या कानामध्ये कानातल्यांचे प्रकार बघण्यासारखे असतात. बऱ्याच वेळेला केस सुटतेच दिसतील त्यांचे, जस काही त्या येणाऱ्या घामाची त्यांना सवय झालेली असते, कोणी वेणी घातलेली दिसते पण त्यातही वेरीअशांस असतात म्हणजे एकाच बाजूला ला वेणीचे पेड असतात तर दुसऱ्या बाजूला समोरच्या केसाची बट पुढे डोळ्यावर काढलेली असते. मला तर बऱ्याच वेळेला वाटत कि त्यांच्या डोळ्यांना त्या अश्या प्रकारच्या केसांचा त्रास तर त्रास होत नसेल का?. पण एवढ मात्र आहे त्याच आयुष्य खूप फास्ट आहे. जेवढ्या लवकर त्या नवीन गोष्टी अदाप्त करतात तेवढ्याच लवकर बदलतात हि. तेवढ्यातच मला embassy मधून एक मुलगा बाहेर येताना  दिसला  त्याच स्वप्न पूर्ण झालेलं त्याच्या चेहऱ्यावर लागेचाच  कळत होत, मस्त हसत हसत त्याने बाहेर पावूल  टाकत ते नवीन आयुष्याची निव रोवण्यासाठीच, मग माझ लक्ष मी पुन्हा एकदा embassy मधून बाहेर येणार्यांकडे केंद्रित केल एक छानस जोडप बाहेर पडल पूर्णत्वाचा भाव ठेवून, ठेवढ्यात एक मुलगा धावतच बाहेर आला आणि आपल्या मित्राला कि भावाला कडाडून मिठी मारली पण मागूनच एक मुलगा मान लटकावून बाहेर पडला नी पटकन दिसेनासा झाला त्याला मात्र पुन्हा ह्या सगळ्या दिव्यातून जायचं होत   काही लोक हसत हसत तर काही तोंडावर प्रश्नचिन्ह घेवून बाहेर पडत होते, प्रश्न तसा फारच साधा आहे असा वाटत पण त्याच उत्तर काय हे मात्र आपल नशिबाच ठरवत आणि usa विसा करताना नक्कीच ह्या सगळ्याचा अनुभव येतो. तुम्ही काय आणि कुठे कस बोलायचं, कस उत्तर द्यायचं हे कितीही ठरवून गेलात तरी ते तसाच घडेल हे मात्र सांगता येन अवघड आहे. ज्यावेळी मी विसा साठी गेले होते तेव्हा माझा विसा झाला होता त्या वेळेला पण तेव्हाही बऱ्याच लोकांनी बरीच इनपुट्स दिली होती कि सकाळचाच वेळ घ्या तर काम नक्की होत पण आता तर वेळ हि तुम्हाला ऑटो जनेरेतेड मिळते ..मग कोणी सांगितलं कि interviewer मुलगी असेल तर जरा अवघडच असत पण जेव्हा माझा विसा झला माझा interview एका मुलीनेच घेतला होता .. आणि मला एकदमच माझा तो दिवस आठवला जेव्हा मी हि अशीच घाबरलेल्या अवस्तेत विसा करण्यासाठी आले होते, मीही तेव्हा अप्प्लीकॅन्त्च्या लीने मध्ये उभी होते तेव्हा माझ बाहेरच्या लोकां कडे व बाहेर कुठेही लक्ष्य गेले नाही .. आज हि आठवत, स्वत जवळच्या सगळ्या गोष्टी अगदी मोबिले सुद्धा आपल्याला VFS च्या ऑफिस मध्ये लोकेर मध्ये ठेवून फक्त आपले लागणारे कागद पत्र (त्यांच्या दिलेल्या लिस्ट प्रमाणे ) घेवून विसा ऑफिस मध्ये जायचे असते. रांगेत आत गेल्या वर आपले अप्प्लीकॅतीओन चेक ह्वून एन्ट्री झाल्या वर ते आपल्याला एकदा चेक करतात कि आपण कागद पत्र शिवाय काही घेवून तर आलो नाहीये ना .. मग आपल्याला एक लाकूड आणि टोकन हातात दिल जात जे आपल्या बरोबर परत बाहेर पडे पर्यंत ठेवायचं असते त्या लाकडाच काय काम आहे ते काही कोणाला हि कळत नाही पण मला आस वाटत कि त्या मध्ये एखादी चीप असावी ज्यामुळे जर त्यांना आत मधील सगळ्या लोकांवर एकाच वेळेला नीट नजर (कॉम्पुटर वरून ) ठेवता येईल. मग पुढे जावून आपल्याला अंगठ्याचे आणि बोटांचे इम्प्रेशन द्यायचे असतात तेव्हा हातावर मेहेंदी खराब बोट म्हणजे स्कीन ला काही प्रोब्लेम असेल तर ते लोक इम्प्रेशन घेत नाहीत मग आपण एका मोठ्या हॉल मध्ये आपला नंबर येई पर्यंत बसायचं , समोर आपल्याला बरेच कौन्तर दिसतात काही भाषा स्पेसिफिक असतात म्हणजे ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही अथवा काळात नाही त्यांच्या साठी ट्रान्सलेतर असतत. मला अजूनही आठवत एक आजी ज्या पंढरपूर वरून आल्या होत्या विसा करण्या साठी त्यांचा मुला कडे जायचं होत. अश्या मस्त नवावरी साडी घालून गळ्यात पंढरपूरच्या तीपिकॅल maala घालून त्या बसल्या होत्या जस मी त्याच्या शेजारी जावून बसले त्यांनी मला विचारलं बघ काय बाय हा नंबर आलं का ? मला त्यांचा कॉन्फिदान्चे पाहून अजूनच हुरूप आला .. मग जसा माझा नंबर आला मी त्या दिशेने गेले आणि इंटरविव चालू झाला आणि संपला पण .. फक्त २ प्रश्न आणि विसा मिळाला ..मला विसा मिळाला .. मला विश्वास च बसत नवता .. त्यामुळे काहीही खोट बोलायचा प्रयत्न करू नका खोते कागदपत्र लावू नका, कागदपत्र नित लावून त्याच्या समोर प्रेसेंत करा आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे आपली body language खूप लक्ष्य पूर्वक त्याचं आपल्या कडे लक्ष्य असत ते मात्र अजिबात विसारु नका .. पण आपण अजिबात कुठल्याच गोष्टीवर ठाम पणे सांगू शकत नाही कि असाच असेल वा असाच होईल .. शेवटी तुम्ही काय कस करता ह्या पेक्षा तुमच्या नशिबाने काय ठरवलं आहे तेच जास्त महत्त्वाचे ठरते .

Friday, March 16, 2012

एक छोटासा अनुभव .... मन टवटवीत करणारा !!

बऱ्याच दिवसात काही लिहीयला वेळ मिळाला नाही म्हटलं एक छोटासा अनुभव सांगावा ...

गेल पूर्ण एक वर्ष मी माझी कार तशीच चालवत आहे म्हणजे माझ्या कडे लर्निग लायसन्स आहे पण परमनन्त काढायला मला वेळच मिळत नवता. शेवटी मागच्या आठवड्यात वेळ काढून गेले आळंदीला त्या ऑफिस मध्ये , लगेचच काम झाल आणि मला जाम भूक लागली होती म्हनून मी पुढे फिनिक्स मॉंल मध्ये जायचं ठरवले . बरेसचे मित्र तिथेच जवळच काम करत असल्यामुळे मी सगळ्यांना फोन करून बोलावून घेतल . सगळ ठरल्यावर मी लायसन्स च्या ऑफिस मधून निघाले आणि थेट नगर रोड ला जाऊ लागले तेवढ्यातच एका डाव्या वळणावर माझ्या कडून गाडीला जोरात ब्रेक लागला नी माझा मोबाईल माझ्या मांडीवरुन खाली पडला कारण गाडी चालवताना मोबाईल मी नेहेमी मांडीवर ठेवते, म्हणून मी गाडी थोडी बाजूला घेतली आणि सीट बेल्ट काढला फोन उचलला आणि बेल्ट लावायचा विसरले आणि तशीच पुढे गेले , लगेचच पुढे रस्ता नगर रोडला जावून मिळत होता .
तिथे होता मामा , नेमेक ( माझ वाईट नशीब ) मला पाहिलं आणि पाहिलं कि माझा सीट बेल्ट लावला गेला नाहीये. मग काय गाडी बाजूला घ्या म्हणून मला त्याने खूण केली आणि मी घेतली. पाहिलं मी त्याला गाडीतूनच सांगण्याचा प्रयन्त करत होते कारण बाहेर अतिशय घाण उन होत पण त्याच लक्ष दुसऱ्या मुलाकडे होत ज्याला त्याने माझ्या आधी पकडल होत सिग्नल तोडल्या मुळे .. मग मीच गाडीतून खाली उतरले आणि त्याच्या गाडी जवळ गेले . त्या मुलाच काम झाल्यावर आणि त्याच्या कडून पैसे घेतल्यावर त्यांनी त्याच लक्ष माझ्यावर वळवल , काही न बोलता रिसीट बुक वर लिहायला त्याने सुरुवात केली. लायसन्स दाखवा .. मी दाखवलं , मग विचारलं नाव काय आहे ... नाव सांगितलं मग विचारलं कुठे राहता .. ते पण सांगितलं .. तो पर्यंत मी माझ्या डोळ्यांवरचा गोगल डोक्यावर लावला आणि त्याला बोलले , काका .. मी इथेच बेल्ट काढला होता माझा मोबाईल पडला म्हणून मी तशी गाडी कधीच नाही चालवत आणि माझी दुसरी गाडी तर बेल्ट लावला नाही तर बीप वाजवत राहते ..त्यामुळे मला बेल्ट लावूनच गाडी चालवायची सवय आहे ...
तेव्हा त्यांनी माझ्या कडे नीट दोनदा पाहिलं आणि तो बोलला , बाई .. तुम्ही कुठल्या मराठी सीरीअल मध्ये आहात का ? मला कळलाच नाही मी म्हटलं काय ? त्यांनी पुन्हा विचारलं मी बोलले हो मी असते सिरिअल मध्ये ...
लगेचच त्याचा बोलण्याचा स्वर बदलला .. मि त्याला सॉरी बोलण्या ऐवजी तोच मला सॉरी बोलायला लागला .. सॉरी, मादाम हा मी ओळखल नाही ..इथे कुठे काम काढलात .. एवढ्या लाबं ? मी सांगितलं कि माझ काही काम होत आणि आता मी फिनिक्स मॉंल ला जातेय माझे काही मित्र माझे वाट पाहत आहेत .. मी म्हटलं किती पैसे झाले सांगा मला मोकळ करा .. मग काय तो बोलला .. मी नसते घेतले पैसे हो पण मी रिसीट तयार केलेय .. तुम्ही एक काम करा ५० द्या फक्त .. सॉरी हा मादाम ... मी म्हटलं ..ठीक आहे काहीच हरकत नाही मी रुल तोडलाय देते पैसे ... आणि मी तिथून निघाले ..निघताना पण त्याने अगदी छान हसत मला अच्छा केला ...
पुढे गेल्यावर हा अनुभव मी माझ्या मित्र मैत्रीण सांगितला, घरी सांगितला ..सगळे खूप खूप पोट धरून हसलो माहित नाही त्या पोलिसाला मी कोण मराठी कलाकार वाटले ते ... पण छान वाटला तो अनुभव !

Friday, February 17, 2012

माझ नवीन फोटोग्राफी पेज ...

माझ नवीन फोटोग्राफी पेज , कृपया खालील लिंक वर क्लीक करा आणि आवडलं तर नक्की पुढे शेअर करा -

http://www.facebook.com/pg0511


- तुमची प्रीती

Sunday, January 29, 2012

अहम अहम .. भेटा माझ्यातल्या लेखक आणि फोटोग्राफर ला .."महाराष्ट्र टाइम्स" मध्ये !!

मला सांगण्यात खुपच आनंद होतोय कि माझा एक लेख कवडीपाट आणि त्याचेच काही फोटो , २८ जानेवारी च्या "महाराष्ट्र टाइम्स" मध्ये छापून आलाय.
२८ जानेवारीच्या सकाळी ७:०० च्या दरम्यान मला आनंदाचा धक्का मिळाला जेव्हा मला मझ्या काही जवळच्या लोकांचा फोन आला आणि मला कळल कि माझा लेख आजच्या पेपर मध्ये छापून आलाय .. मी तडक उठले आणि पेपर पहिला ... छान वाटल स्वताच नाव एवढ्या मोठ्या पेपर मध्ये वाचून ... दिवसभर बऱ्याच लोकांनी फोन करून अभिनंदन केल त्याच अप्रूप काही वेगळच नाही का ?



टीप -पूर्ण लेख नीट वाचण्यासाठी , वरच्या फोटोवर क्लीक करा.
किवा फोटो दुसऱ्या विंडो मध्ये उघडा आणि झूम करा.

Wednesday, January 4, 2012

२०११ ... आयुष्यातील एक सगळ्यात मोठ पर्व ... जे शिकवून गेल बराच काही !!! अलविदा २०११ ...



मला वाटत ह्या जगातला प्रत्येक माणूस नवीन वर्ष चालू होताना एकदा तरी मागील वर्ष कस गेल ह्या बाबतीत नक्कीच विचार करत असेल आणि त्या एका सेकंदाच तो माणूस ते पूर्ण वर्ष फिरून येतो ,प्रत्येकाला स्वताचे चांगले वाईट दिवस दिसून जातात आणि त्यावरच लोक ठरवतात कि मगच वर्ष चांगल गेल कि खराब ..
वाट तशी ठरली होती कुठे जायचं ते हि पक्क होत आयुष्यात कधी दुख असू शकतच नाही हेच फक्त तेव्हा दिसत होत पण अचानकच वादळ आल आणि सगळ काही धुसर झाल आणि वाटच चुकली वाट अशी चुकली कि परत वाटेवर न आणता पूर्वीच्या वाटेवर सोडून गेली, तेव्हा कदाचित हे नवते माहित कि पूर्वीचीच वाट बरोबर होती ..
२०११ वर्षाची सुरुवातच वादळाने झाल्या मुळे पूर्ण वर्ष त्या वादळाच्या पाऊल खुणा काढण्यात गेल्या आस काहीस म्हणायला काहीच हरकत नाहीये, आयुष्यात जे काही कठीण प्रसंग येऊ शकतात ते सगळे हा म्हणजे तसे सगळेच जवळ जवळ येवून गेल्या सारखे वाटले. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच आयुष्यात प्रोब्लेम्स असतात.. हो तर , असतात नं पण प्रत्येकाने आपला एक साचा बनवलेला असतो आणि त्याच्या बाहेर माणूस जास्त करून जाण्याचा प्रयत्न करत नसावा बहुतेक ..
तसाच साचा बनवलेला होता पण ह्या वेळेला साच्यात ठरवलेल्या गोष्टी आल्याच नाहीत, ज्यांच्या वर जास्त विश्वास होता ती लोक विश्वासाच्या चौकडीत बसलीच नाही तिथेच नापास झाली आणि स्वतच जग बानवण्यासाठी दुसऱ्याच बनवलेलं जग निर्दयी पणे तोडून निघून गेली. जीवनात भावना किती महत्त्वाच्या असतात आणि जेव्हा कोणी त्या तोडून मोडून लाथाडून निघून जात तेव्हा त्या इकडे तिकडे विखुरलेल्या भावना एकत्र गोळा करताना काय यातना होतात ते शब्दात सांगूनही कोणाला कळणार नाही. प्रत्येक भावना गोळा करताना मन किती जड होत हि गोष्ट अनुभवण्यासाठी त्याच अनुभवातून जाव लागेल. हे जग किती स्वार्थी असू शकत ते कळल्यावर आपला विश्वास कोणावरच बसू शकत नाही. प्रत्येक माणूस संशयी वाटू लागतो .. अगदी प्रत्येक !
त्यामुळे ह्या वर्षात हे कळल कि पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये अगदी ती व्यक्ती आपल्या कितीही ओळखीची का होऊ नये, अगदी कितीही.. काही गोष्टी शेऐर करतान हजार काय १० हजार वेळा विचार करा.
आणि प्रत्येक वेळेला स्वताचा विचार करा आपल कस कश्या मुळे जास्त फायदा होईल ते बघा , जग स्वार्थी आहे तर आपण पण काय कमी स्वार्थी आहोत असा प्रश्नच पुढे कधी येतच कामा नये ... हि झाली भावनिक शिकवण जी २०११ वर्षां कडून मिळाली .
मग आली आर्थिक, कितीही छान गुंतवणूक आहे असे वाटल तरी स्वता कडचे सगळे पैसे संपवून त्याच्या मागे पळने मुर्खपणा असतो, पैसे संपतात आणि जेव्हा खरच पैश्याची गरज असते तेव्हा जमीन किवा घर आपल्याला लगेच काहीच पैसे देवू शकत नाही .. गुंतवून करा पण पैसे थोडे बाजूला ठेवून करा कारण जस मी वर सांगितलं, तस कोणीही कितीही जवळच असाल तरी पैश्याची गोष्ट आल्यावर सगळे तू कोण असेच हात वर करतात .. अगदी फालातुतल्या फालतू रकमे साठी सुद्धा ! आणि कधी काळी जरी तुम्ही त्या लोकांना मदत केली असेल तर तो परत आपलाच मुर्ख पणा ...
मग होत कॅरीअर् बद्दलचे झटके, नवीन ऑफिस मध्ये स्वताला सेट कारण हे मला वाटत सगळ्यात अवघड काम असेल आणि जेव्हा तुमच्या कुठल्याच गोष्टी निट होत नाहीयेत हे जेव्हा तुम्हाला माहित असत तेव्हा
बाकीच्या गोष्टीही नक्कीच खराब होतात कारण तुमच मन आणि डोक दोनीही जागेवर नसतात. त्यामुळे जेव्हा तुमच सगळाच पणाला लागल असेल कॅरिअर पणाला लावणे हा एक मोठा मुर्खपणा ठरेल ..
आता साधी आणि सोपी गोष्ट सगळ गणित बिनसल आणि एकदा का गाडी रुळावरून घसरली कि सगळा पडसाद उमटतो घरामध्ये आणि घरातल्या लोकांवर आणि चालू होतात घातरले प्रोब्लेम्स जे सुटत तर नाहीच उलट बिघडतच जातात आणि खर तिथे तुम्हाला गरज असते समजुतीची आणि कोणी तरी समजावून घेण्याची जर कोणी तस केल तरच घरामध्ये जास्त खचण्या आधी आपण वर येतो ...
त्यातच आयुष्यात हे हि शिकले कि तुमच्या कडे सगळ असेल पैसा, हुद्दा , ताकद, सौदर्य आणि व्यक्तीमतत्व पण 1 वेळ तुमला सगळ विसायला लावते अगदी सगळ .. जास्त अभिमान तुम्हाला घेवून बुडतो.
एकंदरीतच, आयुष्याच गणित जर एकदा चुकल तर ते बरोबर उत्तर द्यायला खुप वेळ लागतो आणि बरोबर घेवून जातो पैसा, काळजी, भावना , लोक , वेळ आणि वृत्ती ...
तेव्हा २०११ ने बराच काही हिरावून गेल पण शिकवून गेल लाख मोलाच्या गोष्टी ज्या आता पर्यंतच्या आयुष्यातही शिकल्या गेल्या नवत्या. जुनी लोक बोलतात कि नेहेमी आपल्यावर जेव्हा वाईट प्रसंग येतात ते आपल्याला काहीतरी धडा शिकवून जातात . आज कालची पिढी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसेल पण अश्या गोष्टींवर विश्वास बसण क्रमप्राप्त होत. २०११ वर्ष वाईट नवत ते होत नवीन धडे शिकवणारे वर्ष, जे धडे येणाऱ्या पुढील आयुष्यात नेहेमीच उपयोगी पडतील.
त्यातहि काही लोक सरप्राइस गिफ्ट पेंकेत मध्ये ह्या वर्षात आले आणि थोडा का होईना आपलेपणा आणि समजूतदार पण दाखवून गेले. आणि त्यामुळेच आलेल वादळ आणि त्यामुळे सापडलेली आधीची वाटच अगदी योग्य होती ह्याची पावती देवून गेले.

Thursday, December 15, 2011

सवाई गंधर्व भीमसेन उत्सवची झालेली माझी नवीन ओळख ...


सवाई गंधर्व भीमसेन उत्सव आणि माझा तसा काहीच संबंध नाहीये म्हणजे मला गान मला येत नाही आणि कळतही नाही , तस एक दोन वेळा मी सवाई ला गेले आहे पण ते असाच कोणाबरोबर तरी सोबत म्हणून गान ऐकायला नाही. पण ह्या वर्षी मात्र एक वेगळीच ओळख झाली माझी सवाई गंधर्व बरोबर ...
ते आस झाल कि मी नेहेमी प्रमाणे पित्ता मुळे आजारी पडले म्हणजे मला नेहेमीच हा त्रास होतो पण सध्या त्याच प्रमाण जरा जास्त चालू आहे . तर जास्त त्रास होत असल्याने मी फोन केला माझ्या फमिली डॉक्टर ना , त्याचं क्लिनिक १२:३० ला चालू होत म्हणून मी लगेचच नंबर लागावा ह्या हेतू ने फोन केला होता पण मला त्यांच्या रीसेप्शनिस्त कडून कळल कि ते त्या दिवशी लवकर येणार नाहीयेत कारण सवाई गंधर्व चालू आहे. मला वाटल अर्रे वाह डॉक्टरना गाण्याची आवड दिसतेय ..मग मी तिने सांगितल्या प्रमाणे २:३० ला दवाखान्यात गेले, पण तरीही डॉक्टर आले नवते मी म्हटलं अर्रे बापरे डॉक्टर एकदम जास्त दर्दी चाहते दिसतात सवाई चे आणि गाण्याचे . मी येवून बराच वेळ झाला, माझी त्यांच्याशी असलेली ओळख आणि माझा आजाराची तीव्रता बघून रीसेप्शनिस्त ने त्यांना फोन लावला तर ते सवाई मधेच होते पण मला कधी कधी सलाईन लावायला लागते म्हणून ते लगेचच आले.
सगळ तपासून झाल्यावर आणि औषध लिहून झाल्यावर मी त्यांना बोलले काय गान खुपच आवडत वाटत म्हणून दवाखान्याची वेळ हि ५ दिवांसाठी बदलली वाटत . माझ्याकडे न पाहताच त्यांनी मला ते सवाई चे त्रेस्त्री आहेत आस सांगितले मी एकदम त्यांच्या कडे दचकून पहिले आणि म्हटलं कस काय ? म्हणजे तुमचा दवाखाना इथेच आहे पहिल्या पासून म्हणून कि तुम्ही त्या बोडी वर आहात ? त्याने वर पहिले आणि अगदी शांत पणे म्हटले "अग मी सवाई गंधर्व ह्यांचा नातू आहे ते माझ्या आईचे वडील , त्यामुळे सगळे हक्क आमच्या कडे आहेत आणि म्हणूनच हे ५ दिवस पूर्ण लक्ष घालावाच लागत. सगळ्यात जास्त रसिकांना ह्या उत्सवाचा आनंद मिळावा म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही तिकिटांचे दर हि बदलेले नाहित, तू नाही वाटत जात ?? ".. मी डोळे मोठे करून हे सगळ ऐकत होते आणि मला काळातच नवत कि मी त्यांना काय विचारू कि काय बोलू .. मग मी थोड सावरून बोलले "नाही, मला कळत नाही गान .. पण पुढच्या वर्षी मात्र नक्की येईन .." ते बोलले "ये ये, समोरचा कोच आपण बुक करू जास्त महाग नाहीयेत त्याचेही दर .."
आस बोलून मी तिथून निघाले आणि विचार करू लागले ज्या लोकांकडे एवढी मोठी गोष्ट दाखवण्या सारखी आहे पण किती साधे पणे त्यांनी मला हे सांगितलं , अजून कोणी असत तर किती भाव मारला असता कि मी प्रत्यक्ष सवाई गंधर्व ह्यांचा नातू आहे . नाही तर ज्या लोकां कडे काहीही नसात ते हि उगाचच भाव मारून जातात .. मला वाटत ह्यालाच मनाचा मोठे पणा म्हणतात बहुतेक ..
काहीही असो , हे मात्र नक्की कि पुढच्या वर्षी सवाई गंधर्व भीमसेन उत्सवाचे छान फोटो मात्र नक्कीच काढायला मिळतील ...

Wednesday, November 30, 2011

पसाट .... wow simply woooow ...!!!


मला पहिल्या पासूनच गाड्यांच भयंकर आकर्षण आहे, कुठलीही नवीन गाडी बाजारात आली कि मला ती कधी एकदा पाहते आस नेहेमीच वाटत आणि बऱ्याच वेळेला मी गाड्यांचे स्पेसिफिकेशन पण अगदी आवर्जून पाहते . आमच्या दोन्ही गाड्या घेताना पण मी बराच विचार केला होता. माझी पहिली गाडी आम्हाला मोठी आणि आरामदायी हवी होती जी आम्ही बाहेरगावी जाताना वापरू म्हणून त्या वेळेला बाजारात इंनोवा गाडी जोरात चालू होती म्हणून मी इंनोवा ला प्रेफरन्स दिला. इंनोवा पण छान गाडी आहे एकदम मोठी, भव्य आणि आरामदायी आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे इंनोवाचा AC, सेकॅंदा मधेच गाडी पूर्ण गार होते. मग काही दिवसांनी मला रोजच्या कामासाठी आणि ऑफिस ला जाण्यासाठी वा गावात जाण्यासाठी इंनोवा खुपच मोठी वाटू लागली मग आम्ही इकॉनोमिकॅल गाडी घ्यायची ठरवली. इकॉनोमिकॅल गाडी म्हटल्यावर मारुती शिवाय मला नाही वाटत कुठल् दुसर नाव समोर येवू शकत. त्यावेलेलाही मी खूप गाड्या पहिल्या आणि सगळ्या मध्ये आवडली निसान ची मिअक्रा पण आधीच ठरवल्या प्रमाणे मला एक छोटी स्वस्त आणि नीट इकॉनोमिकॅल गाडी हवी होत म्हणून मी अल्टो k10 घेतली .. छान गाडी आहे. मग बरेच दिवस कुठली गाडी अशी पहिली नाही कि पुन्हा एकदा मान वळवून पहावी. आणि काही दिवसांनी एका गाडीची चर्चा बाजारात ऐकू येवू लागली ज्याच्या त्याच्या तोंडी एकाच नाव आणि त्या गाडीची स्तुती ... ती गाडी होती Volks Wagen – Pasaat ....
मी पसाटचे फिचर्स पाहून खुपच इम्प्रेस झाले आणि एक दिवस मला ती गाडी एका सिग्नल ला दिसली राखाडी कलर असलेली लांब रेखीव गाडी, ती जाई पर्यंत मी ती गाडी पाहत बसले मग काही दिवसातच पसाट रस्त्यावर दिसू लागली पण जेव्हाही दिसायची मी मागे वळून पाहायचेच
एक दिवस मी माझ्या काकूंकडे चालले होते शनिवार होता माझी गाडी मी रस्त्यावर सामन्तर पार्किंग मध्ये पार्क करत होते मग गाडीतून उतरून मी गाडीला लॉंक लावताना मला माझ्या गाडीच्या मागे पसाट पार्क होताना दिसली म्हटलं जाताना पाहाव तिच्या कडे तेवढ्यातच मला आवाज आला कि “मादाम, एवढ लॉंक नका करु, कोणी नाही चोरून नेणार गाडी ...” मी दचकून मागे पाहिलं तर माझा एक जुना मित्र चांगला मित्र बऱ्याच वर्षांनी माझ्या समोर पसाटमधून उतरत होता मग काय आमच्या गप्पा चालू झाल्या मधून मधून मी पसाटकडे पाहत होते तेवढ्यातच माझा मित्र मला बोलला आपण इथे उभ राहून बोलण्या पेक्षा होटेल मध्ये जाऊन कॉफी घेऊयात का ? मी म्हटलं चला ..., न राहवून मी त्याला बोलले मी चालवू का रे गाडी ?? पण त्याने उत्तर दिल ..पाहिलं तू पसाट काय आहे हा अनुभव बाजूला बसून घे आणि मग चालव .. मग काय गाडी चालू झाली आणि काय सांगू मी एवढी सही गाडी पहिलीच नाहीये कधीही its a computer ती गाडी एक रोबो आहे तिला मानुअल मोड वर चालवा व तिला ऑटो मोड वर .. जस्त लाजवाब ..मी मंत्रमुग्द्ध होवून गाडीच्या प्रत्येक फिचर्स पाहत होते, प्रत्येक सीईट साठी वेगळा AC आणि हिटर, सीईट हि आपल्या मणक्या च्या आकार प्रमाणे स्वतः सेट होते , हि अशी एकमेव गाडी आहे कि तिला बनवता हाडांचे डॉक्टरची मदत घेतली आहे , गाडी स्वतः स्वताला पार्क करते समोरच्या स्क्रीन वर पुढून मागून येणारे अडथळे दाखवते , हूड ऑटो मध्ये मागे घेता येते , मागच्या काचेला बटन ने गार्ड लावता येते, दरवाज्यांना बाजूला ओली छत्री ठेवली तरी ते पाणी बाहेर जाते अशी सोय दिलेय आणि अजूनही काही लहान साहन बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला बाकी दुसऱ्या गाड्यामध्ये बघायला नाही मिळणार .. आणि आराम वाह .. चालवता कळल हि नाही कि स्पीड १०० पर्यंत आहे एकदम स्मूथ .. wow simply woooow ...
मग काय पसाटअम्धून उतरू मस्त कॉफी आणि पूर्वीचे चे विषय .. कोण काय करतं आणि कोण कुठे आहे हे बोलता बोलता वेळ कसा गेला कळलाच नाही ..आणि ठरल्या प्रमाणे परत येताना मी पसाट चालावयाच मानसिक समाधान आणि स्वप्न जगवल ...
बाजारात ह्या बजेट मध्ये बहरपूर गाड्या आहेत मर्सिडीज आहे, BMW आहे, ऑडी हि ..पण पसाट ची गोष्ट वेगळी हे मात्र नक्की ...

Wednesday, November 2, 2011

प्रवास आवडीचा ...

आज मे उप्पर आसमा नीचे, आज मे आगे जमाना हे पीछे …

आज रस्ता तोच होता, तीच तीच गाव मागे मागे जात होती, वातावरणही तेच होते, छान दुपार उन्हात न्हाली होती, वारा मस्त सुसाट घाटातून वाहत होता, शेजारून छान मुळशी धरणाचे पाणी हळूहळू मागे सरत होते ..
रस्त्यात त्याच टपऱ्या, चहाची दुकाने आणि हॉटेल्स ..नेहेमीची गर्दी, नेहेमीच्याच स्पोटला लोकांच्या गाड्या उभ्या होत्या, कोणी फोटो काढताय तर कोणी मस्त झाडाच्या खाली बसून जेवणाचा आनंद घेत आहेत ..
वाह ... वाह!! मोठा वीकेंड त्यामुळे ताम्हीनीही घाटही व्यवस्तीत गाड्यांच्या गर्दिनी फुललेला दिसत होता. बऱ्याच ठिकाणी थांबायचा मोह मला झाला पण आजचा प्रवास वेगळा होता नेहेमीसारखा न्हवता, मला लवकरात लवकर माझ गाव गाठणे आवश्यक होत .. आणि नेहेमी प्रमाणे माझ डोक हि दुखत नवत आणि घरी जाऊन दुखणार पण नवत कारण ह्या वेळेला एकाच मोठा फरक होता माझ्या प्रवासामध्ये आणि तो म्हणजे मी स्वत इंनोवाच्या कारच्या ड्रायवर सीटवर बसले होते तसं इंनोवाला कार नाही म्हणता येणार इंनोवा म्हणजे एक मिनी ट्रक आहे ..
एकेकाळी मला अशक्य वाटणारी गोष्ट कि मी कधी इंनोवा सारखी मोठी गाडी घेवून ३ तासाचा घाट असलेला रस्ता पूर्ण पुण्यापासून कधी चालवू शकेन … पण शेवटी अशक्य काही नसत आणि मला तर वाटत कि ज्या गाड्या जास्त मोठ्या दिसतात त्या चालवायला तेवढ्याच सोप्या असतात .. रोज पुण्यात छोटी कार चालवून जेवढा आत्मविश्वास वाढला होता त्यापेक्षाही ह्या प्रवासाने मला एक नवीन भरारी मिळाली.
असो , पण हा माझा पहिला स्वत केलेला प्रवास खूपच अविस्मरणीय राहील ह्यात काहीच शंका नाही .. पण ह्या पुढे मी जगातली कुठलीही गाडी कुठेही चालवू शकते हे मात्र नक्की ...

Friday, October 21, 2011

ईच्छाशक्ती .. The WillPower

काय असते हि नक्की म्हणजे नक्की कुठे असते आणि आहे कि नाही हे कसे ओळखायचे ? खरच खूप प्रश्न पडतात ना ?... पण हि गोष्ट ज्यांच्या जवळ असते ते ह्या जगातले सगळ्यात सुखी आणि श्रीमंत माणस असतात.
कस असा ? प्रश्न पडण स्वभावीकच आहे, हल्ली लोक थोडस काही तरी बिनसलं किंवा काही गोष्टी मनासारखी नाही झाली कि लगेचच डिप्रेस होतात, काहीना वाटू लागत कि संपल आता सगळ आणि तेच ते घोटत बसतात पण इथेच खरी परीक्षा सुरु होते ..
परवा अशीच घरी बसले होते आणि माझ्या काकूंची मैत्रीण आली, दुपारच होती..मी आपली निवांत पुस्तक वाचत झोपले होते त्या आल्या म्हणून उठून बसले,त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि बोलल्या काय ग तू कधी पासून पुस्तक वाचायला लागलीस? .. मी म्हटलं काही नाही,सध्या वेळच वेळ आहे. ओफीस मध्ये काही काम नाहीये आणि बाकी जे जे तरी करतेय ते पण काय ग्रेट होत नाहीये,वैताग आलाय .. सगळ्या गोष्टी माझ्या बाबतील घडतात,खरच कंटाळा आलाय मला सगळ्याचाच.सगळ माझ्याच बाबतीत बहुतेक देवानी प्लान करून ठेवलाय.
त्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि मला बोलल्या,तुम्ही आज कालची मुल इतक्या लवकर सगळ्या गोष्टीची कट कट कशी करून घेता, प्रत्येक गोष्टीचा त्रास तुम्हालाच आहे आस का वाटत तुम्हाला ? एवढ्या तरुण वयात लगेच गीवउप कस होता तुम्ही ? अख्खा आयुष्य पुढे उभ आहे आणि तुमच्याकडे कामतरता आहे ती विलपावर ची !
मी त्यांची कडे पाहताच बसले आणि मग मला कळली त्यांनी अनुभवलेली ती ३ वर्षे ...
त्यांना ३ वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता होता, एक असाध्य असा कॅन्सर.. सारकोमा
("http://en.wikipedia.org/wiki/Sarcoma"), हा एक पेशींचा कॅन्सर आहे शरीरातील कोणत्याही भागात हा मसलच्या आत पेशींमध्ये वाढतो. सारकोमा हा २ प्रकारचा असतो एक म्हंजे हाडान्माधला आणि दुसरा मसल मधला.त्यांना पायाच्या पोटरी मध्ये सारकोमा झाला होता.
पुण्यातील प्रत्येक स्पेशालीस्ट डॉक्टर ने त्यांना नाही संगीताल.वयाच्या ३५ ला अश्या प्रकारचा असाध्य रोग होणे हे एक वाईट नशीब नाही तर काय? त्या त्यांच्या भरलेल्या संसाराकडे पाहून त्या मरणयातना सहन करत होत्या. आस समजून कि हे जे काही शेवटचे दिवस आहेत ते तरी आपण आपल्या २ मुल आणि नवऱ्या बरोबर आनंदाने घालावूत. त्यांनी स्वताला घट्ट केल आणि काही न काही तरी पर्यंत करताच राहिल्या. वेगवेगळ्या डॉक्टर कडे जा, कोण कोण ला विचार,नेट वर माहिती मिळवणे तेवढ्यात त्यांना एका मुंबईच्या डॉक्टर चा पत्ता कळला, त्यांनी तिथे जावून दाखवून यायचं नक्की केल आणि त्या गेल्या... तिथे गेल्यावर त्यांना कळल कि त्यांचा कॅन्सर त्यांच्या त्या पायातील फक्त पोटरी पर्यंतच पसरलेला आहे आणि त्याच ऑपरेशन होण शक्य आहे,फक्त त्या ऑपरेशन मध्ये कदाचित पाय कापला जाण्याची शक्यता आहे. त्यांना नवी उमेद मिळाल्याने त्या ते करायला तयार झाल्या.पाय नसेल तरी मी माझ्या संसाराची गाडी नक्कीच कशीही पुढे ढकलू शकेल आस त्यांना वाटून गेल आणि त्यांनी डॉक्टरांना तसा पोसिटीव अतितूड ,विलपावर दाखवली, जी खरी अश्या प्रकारच्या उपचारासाठी आवश्यक असते आणि ते ऑपरेशन व्यवस्तीत पार पडले. सारकोमा फक्त पोटरी मध्ये असल्यामुळे त्यांचा पायाही शाबूत रोहिला फक्त पोटरी शिवाय.
त्यांनची इछाशक्ती जिंकली, त्यांनी मरणाला पण आपल्या इछाशक्ती ने दूर लोटले. आज ३ वर्षानंतरही त्या व्यवस्तीत सगळ करतात. कुठे कुठे फिरायला जातात, स्वताच्या पायावर उभ राहून सगळ करतात अगदी सामान्य माणूस करेल ते ...पण जर त्यानी त्या वेळेला त्यांनी गीवउप केल असत तर ? ..त्यांनी प्रयत्नच केले नसते आणि त्यांना कुठलाच उपाय दिसला नसता. तेव्हा इछाशक्ती हि अशी शक्ती आहे जी तुम्हाला कुठलेही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते. मला त्याचं हे सगळ ऐकून माझी लाज वाटली कि मी किती फालतू गोष्टीसाठी रडतेय.
आयुष्य हे एकदाच मिळत, पुढचा जन्म ..मागचा जन्म आस काहीच नसत. जे करायचं इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. त्यामुळे छान आनंदी राहा. आयुष्य छान जागा , स्वत हसा आणि दुसर्यानाही हसवा. कधीच कोणाला दुखवू नका. आणि सगळ्यात महत्तवाच कुठल्याही गोष्टी साठी "अशक्य" म्हणू नका.

Sunday, October 16, 2011

FTI - शोर्ट फिल्म्स फेस्टिवल ...

दोन दिवसा पूर्वी FTI मध्ये शोर्ट फिल्म्स फेस्टिवल झाला, मी गेले होते .. थोडा वेळ होता म्हणून त्यामुळे सगळे फिल्म्स नाही पाहू शकले पण जे काही पहिले त्यातले ३ फिल्म्स विचार करायला लावणाऱ्या होत्या .. पूर्ण दिवस मी त्या ३ गोष्टींवर विचार केला आणि काही जवळच्या लोकांबरोबर मी त्या फिल्म्सच विषयी बोललेही ..पण नंतर मात्र मी ते विसरून गेले ..
पण कालच त्या फेस्तीवलचा निकाल लागला आणि त्यात तेच फिल्म्स अव्वल ठरले जे मला विचार करायला लावणारे होते .. त्यातला एक होता २१२ ० fahrenheit, ज्यामधून दाखवलं गेल होत जर तापमान २१२ fahrenheit म्हणजे १०० degree ला गेले तर काय होईल .. लोक कधी एका पाण्याच्या बाटली साठी एकमेकांच्या जीवांवर उठतील आणि लोक पाणी मिळवण्या साठी काय काय करतील, कस bank चे लोकरहि पाण्यासाठी वापरतील कारण तेव्हा पाण्याला सोन्या पेक्षा जास्त किंमत असेल ... त्यामुळे तुम्हीही थोडा वेळ विचार करून बघा जर खरच पृथ्वीच तापमान १०० डेग्री गेल तर काय होऊ शकेल ?
दुसरा विषय होता कमीत कमीत वेळेत पैसे मिळवण्याच्या मागे धावण्याने लोक कसे स्वताच्या तोंडावर पडतात ..त्यासाठी त्यांनी दाखवलेलं उदाहरण पण छानच होत, नाव होत वर्तुळ ..एक छोट खेड .. आणि त्यातलं एक गरीब कुटुंब ..एक लहान मुलगा .. ज्याची आई त्याला पुरणपोळी साठी गुळ आणायला पाठवते आणि त्याला जाताना २ रुपये देते .. मग त्याला कसे मित्र भेटतात आणि त्याला अनेक मोह होतात पण तो स्वताच्या मनावर ताबा मिळवतो पण पुढे जावून आपल्या मित्राला मिळालेल्या अचानक पैश्यातून तो मोहात पडतो आणि आपले असलेले २ रुपये पैसे लावून खेळणाऱ्या मुलांबरोबर खेळतो आणि पैसे जातात पण हातात काहीच येत नाही म्हणजे २ रुपये पण नाहीत आणि गूळही नाही ...
तिसरी फिल्म होती दोन म्हातारपणाच्या उंबर्थ्याकडे पोहचलेले जोडपे ... ज्यातलं एक माणूस जग सोडून लवकरच जाणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे मरणा विषयीचे बोलणे ... विषय थोडा जड होता आणि संवाद हि मला बरेच जड वाटले पण विषय चांगला हाताळला होता ... ह्या फिल्म च नाव होत थे Gateway of Heaven ! ...
नवीन शिकणारे लहान लहान लोक किती छान फिल्म्स बनवतात हेच अश्या प्रकारच्या फेस्टिवल मधून बघता येत आणि त्यांची छान पारख करता येते... कदाचित ह्यातूनच कोणी तरी पुढे जावून नसरुद्दिन शहा,जाया बाधूरी किवा स्मिता पाटील,नाना पाटेकर,आणि आताच रोहित शेट्टी ... बनतील आणि आपली करमणूक करतील .

Tuesday, September 20, 2011

जीवन ऐसे नाव !

आज काहीसा कामाचा मूड अजिबातच नवता ... म्हणजे अगदी सकाळ पासूनच .. सकाळी उठल्यावर अस वाटल कि आज जाऊच नये ऑफिसला ..पण मग विचार केला उगाचच सुट्टी कशाला वाया घालवायची .. मग पटकन आवरून जॉब ला गेले आणि दुपारी मस्त कलटी मारली .. तस मी सकाळीच निघताना कॅमेरा आणि लेन्सेस घेतल्या होत्या ... हाच विचार करून कि जर कलटी मारता आली तर उगाच पुन्हा घरी जायला नको ..
मस्त गाडी ला स्टार्टर मारला, गोगल ओन आणि AC हि ओन .. कार मस्त सिह्नगड रोड ला घातली आणि direct खडकवासला ! मस्त वातावरण होत .. गेल्या गेल्या एक मस्त चहा घेतला आणि विचार केला काय click करायचं ? मग, इकडे तिकडे पहिल्या वर बरंच काही दिसू लागल जे कॅमेऱ्या मध्ये नजर कैद होण्या साठी आतुर होत ..
मग पुढच्या १ तासात मी आणि माझा कॅमेरा काम करत होतो .. खूप काही होत तिथे वेगवेगळी फुल होती, नजर जाईल तिथ पर्यंत पाणी होत , त्यात काही नौका मस्त बागडत होत्या, काही पक्षी उडत होते काही चं झाडावर बसून पाण्यात पाहत होते आणि काही पक्षी झाडा झुडपाच्या मागे बसून आयुष्य बद्दलचे समीकरण बनवत होते ... वचन देत होते .. कधीच वेगळ न होण्याचं !
फ्रेश वाटल पाहून सगळ ... बर्याच जोडप्यांना वाटल कि मी त्यांचे च फोटो काढतेय कदाचित ... पण मी त्यांच्या कडे बघून सांगितलं ..घाबरू नका .. मी हि इथे बसून गेलेले आहे .. तुमच्या साराकीच मलाही खूप वचन मिळती होती .. !! पण वेड्या त्या जीवांना काय आणि कोणी सांगावे कि खर अस काहीच नसत .. पण ते नंतर कळत आणि तेव्हा खूप उशीर झालेला असतो .. असो !
तिथून मी निघणार आणि पावसाने हि मस्त हजेरी लावली .. संध्याकाळ मस्त पावसात नाहली .. मग पाऊस माझा सोबती बनून अगदी पुण्या पर्यंत म्हणजे घर पर्यंत आला .. घरी आले मस्त फ्रेश झाले आणि पुन्हा बाहेर पडले थोड्याश्या कामाने ..काम तर झाले पण बर्याच दिवसांनी माझी नजर पुस्तकांच्या दिशेने वळली .. माहित मला काय वाटल आणि मी आज चक्क चक्क ६ पुस्तके विकत घेतली .. माझ मलाच कळल नाही कि इतकी पुस्तक कशी काय घेतली ... एक घ्यायला गेले आणि हे पण छान वाटतंय आणि ते हि छान असेल अस करत करत ... शेवटी म्हटलं बस .. पैसे संपले आता ..

काही दिवस खूप काही देवून जातात आणि काही खूप काही हिरावून घेतात .. खर तर ह्यालाच जीवन म्हणतात .. कदाचित !!!

Friday, July 8, 2011

मला सगळ आवरल्या शिवाय चैनेच पडत नाही

बेडा घाट वरून परत आल्यावर सगळ्यात मोठ काम माझ्या समोर होत ते म्हणजे सगळ्या bags आवरून सगळ समान जागच्या जागेवर ठेवणे ... मग काय रात्री जेव्हा मी पुण्यात पोहोचले खूप जास्त थकले होते .. सगळ तसाच ठेवून झोपून गेले आणि सकाळी उठल्यावर माझ काम चालू ...
माझा प्रोब्लेम असा आहे न कि मी कितीही थकलेले असले तरी मला सगळ आवरल्या शिवाय चैनेच पडत नाही ... सगळ्या bags उघडून सगळ्यात आधी मी धुण्याचे कपडे वेगळे केले तसे मी ते थिथूनच वेगळे करून आणले होते ... ते आधी वाशिंग मचिन ला लावले , जे जास्त मळले होते ते गरम पाण्यात भिजवले मग next जे कपडे dycleaning ला जाणार होते एका पिशवीत टाकले. मग बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे माझे cosmatices सगळे जागच्या गेवर ठेवले मग बाथरूम गोष्टी जागेवर गेल्या ..मग सगळे चप्पल आणि shoes पुसून, कागद मध्ये गुंडाळून जागेवर ठेवले ... पूर्ण bag रिकामी करून bagechya जागेवर ... जेव्हा माझी पूर्ण रूम पाहोल्या सारखी दिसू लागली तेव्हा माझ्या जीवात जीव आला ...
काही लोक मी पाहिलेत bags तश्याच ठेवून महिना भरही तसेच राहू शकतात .. मला खरच आश्चर्या वाटत ...

Wednesday, June 22, 2011

खूप वाईट वाटतंय ...

आज वारी देहू मध्ये आलेय .. आणि विठोबा तुकाराम गजरात वारकरी पंढरीची वाट चालू लागलेत ... काय सुंदर दृश्य असेल ते ... पण आज मी महाराष्ट्रात नाहीये ... खूप वाईट वाटतंय ..ह्या वर्षी वारीचे प्रत्येक क्षण कॅमेरा मध्ये टिपण्याची माझी इच्छा होती पण जी पूर्ण नाही होऊ शकली .. शेवटी काय आयुच्यात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आस काही सांगता येत नाही ... पण पुढ्या वर्षी मात्र नक्कीच मी पूर्ण वारीला माझ्या कॅमेरा मध्ये टिपेन हे नक्की ...
मी मध्य प्रदेश मध्ये आहे आणि वारीच्या एवजी कान्हाच जंगले आणि त्यातील प्राणी कॅमेरात टिपणार आहे ... होपफुली मला वाघ दिसतील ... I am crossing my fingers !! lets see ..

मी नक्कीच कान्हाचे फोटो आणि वाघाचे फोटो प्रकाशित करेन माझ्या पुढच्या post मध्ये ...

Sunday, June 19, 2011

मिस यु आल .. !!!

आयुष्यात प्रत्येक जन काही तरी ध्येय घेवून पुढे जात असतात मी हि काही तरी ठरवून पुढे जातेय ... पण जेव्हा आपण काही तरी मिळवायचं ठरवतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील काहीतरी मागेन सोडून पुढे सरकत असतो ... कारण आस होऊच शकत नाही कि सगळ्या गोष्टी घेवून किवा सगळ्यांना खुश करून आयुष्यात पुढे जाता येत ... मग आता कुठे काय आणि कोणाला सोडायचं हे मात्र सर्वस्वी आपल्यालाच ठरावाव लागत ... त्या मध्ये मात्र आपली मदत करणार कोणीही नसत ...
मी हि हच विचार करून .. पुचे जातेय ... १५ तारखेला माझा ऑफिसचा शेवटचा दिवस होता .. साडे चार वर्षे ज्या कॉमापानी मध्ये मी काढली ती सोडताना ..मनाला काही तरी वेगळ वतन साहजिक होत .. आणि तेच मी अनुभवलं ... भयंकर द्विधा मानास्तीती मध्ये होते मी ... ते ऑफिस , ते सगळे लोक ज्यांच्या बरोबर मी इतक्या वर्षे काम केल ... ते ऑफिस मधाळ वातावरण आणि जे थोडे पण आयुष्य भर पुरणारे मित्र ... हे सोडताना जर वाईट वाटल नाही तर तो माणूस .. दगडी काळजाचा असेल असाच मी म्हणेल ...
दुपार पर्यंत स्वताला शांत ठेवून clearance काम केली .. पण जसे घड्याळ पुढे पुढे सरकत होते पायातले त्राण कमी कमी होत होते ... शेवटी एक वेळ असाही आली कि रडू कोसालेच .. मग मी पटकन ऑफिस मध्ये वाश रूम मध्ये गेले आणि स्वताला कंट्रोल मध्ये आणून बाहेर आले ..
रोज मी त्या सगळ्या गोशी मिस करते .. आता जो पर्यंत नवीन काम चालू होत नाही तो पर्यंत आणि नंतरही कादाचील ते सगळ आठवेल ... मिस यु आल .. !!!

Thursday, June 2, 2011

शनिवार आणि रविवार

गेलेले सगळे शनिवार आणि रविवार खूपच बिज़ी गेले .. मी मागे बोलले की मी लवकरच लिहिते की पण मला ऑफीस च्या कामा मुळे वेळच मिळाला नाही.
आज थोडा वेळा हे आसे वाटले महणून लिहियला बसलेय .. सोमवार ते शुक्रवार खूपच ऑफीस च्या कामात बिज़ी जातात आणि राहिलेले 2 दिवस .. तर विचारू नका …

शनिवार –

पहाटे 5:30 to 8:30 - फोटोशूट “हाइवे 61” @ सूस रोड पाषाण .. with PhotoWox ग्रूप.

हा ग्रूप फोटोग्रफी चा आहे, जी लोक फोटोग्रफी साठी नवीन आहेत आणि ज्याना क्लास न लावता शिकण्या मज्जा आहे ते सगळे लोक इथे तुम्हाला भेटतील .. सगळे छान आहेत आणि हेल्पिंग आहेत … सगळ्यांजावळ छान छान कॅमरा आहेत आणि चार चाकी गाड्या पण … मी जेव्हा पहिल्यांदा गेले .. तेव्हा मला आस वाटल की आररे माझया कडे छान कॅमरा का नाहीए … पण सगळ्यांच्या चार चाकी गाड्या पाहून वाटल की atleast माझया कडे ते तरी आहे … हा हा … मग मी विचार केला मी कधी पासून आसा विचार करायला लागले … , त्यामधे एक मुलगा आहे जो कॅमरा चे आणि फोटोग्रफी चे इन अँड आउट जाणतो .. यू नो लाइक मास्टर … , तो तिथे वेगवेगळे angles अँड info देतो …
मी त्याला बोलले, मुझे कॉंप्लेक्स आ राहा है .. I dont hav camera like you guys … तो उसने ans किया ..
dont worry, u will get it some or other day but I think you have vision ... मला इतक छान वाटल …

9: 00 टू 12:00 – नाचाची प्रॅक्टीस (बहीनीच्या संगीत ची)
1:00 – लंच @ वैशाली मस्त चीज़ डोसा अँड ताक .. सहीईइइइइइइई
2:0० तो 6:00 – शॉपिंग ओन् जस्ट कसुअल्स, M tv, सागर आरकेड, फॅब इंडिया, मोची
माझी बहीण लग्ना नंतर फिरण्या साठी Moritus ला जातेय सो .. सी शोर वर फिरताना जे काही लागेल आणि एकंदरीतच तिकडच्या साठी शॉपिंग केल .. तिला छान छान आइडियास दिल्या …यू नो हाउ तो गिव सरप्राइज़स टू पार्ट्नर .. (आयुष्यच एक खूप मोट सर्प्राइज़ आहे माझया साठी … मला ही आयुष्यात खूप मोठे मोठे सर्प्राइज़ मिळाले जे मी कधीच expect केले नवते… असो )

6:30 तो 8:30 पीयेम – बहीनीचा लग्नाचा ड्रेस च ट्राइयल अँड चेंजस @ सुजाता’स फॅशन @ बानेर
मी आज मिती पर्यंत सुजाता सारखी हुशार आणि आटिट्यूड नसलेली फॅशन डिज़ाइनर पहिली नाही .. वेरी क्लेवर अँड आसम डिज़ाइन करते .. म्हणजे थोडक्यात सांगू का .. जे काही तुमच्या डोक्यात असेल त्याची हुबे हब नक्कल करते .. म्हणजेच कलल ना … खूपच छान

9:00 पीयेम – होम फाइनली

रविवार –

सकाळी – 7: 30 गुड मॉर्निंग – घर आवरण आणि जेवण बनवणे.
10:00 टू 1:00 - नाचाची प्रॅक्टीस (बहीनीच्या संगीत ची)
1:30 - लंच
2: 30 टू 6:30 - लक्ष्मी रोड – शॉपिंग @ PNG, राज’स, रोहित’स , चार्लिस
7:00 @ होम – पार्टी ला जाण्या साठी तयारी
7:45 टू 11:45 – पार्टी @ स्पाइस , MIT कॉलेज – फ्रेंड ने फ्लॅट घेतला आणि तिच्या मुलीचा bday त्या साठी ..
रात्री 12:00 घरी आणि लगेचच झोप ..

हेक्टिक 2 दिवस … देवा वाचाव मला ...

Tuesday, May 31, 2011

पुणे – जबलपुर – बिडा घाट – कान्हा – जबलपुर – पुणे





लवकरच मी मध्य प्रदेश मधल्या कान्हा जंगल पार्क ला भेट देणार आहे .. माझी ट्रिप खालील प्रमाणे असेल .. पुणे – जबलपुर – बिडा घाट – कान्हा – जबलपुर – पुणे.
अस म्हटल जात की कान्हा मधे वाघ दिसततच .. बघू माझ नशीब काय सांगत ते .. कलेलेच जून एंड ला ..
जाऊन आल्या वर नक्कीच फोटो शेअर करेन

Wednesday, May 25, 2011

मी आणि माझी गाडी

मी नुकतीच आल्टो K10 घेतली .. आणि 15 दिवसात गाडी व्यवस्तिथ शिकले ही … सुरुवातीला जरा कॉन्फिडॅन्स कमी वाटला पण .. नंतर माझया ट्रेनर (मी पर्सनल ट्रेनर केला होता) मुळे एकदम बूस्ट उप झला …
आधी माझया कडे Activa होती (अजूनही आहे ), तेव्हा मी साइकल वाले आणि फौरव्हीलेर वाले ह्या लोकाना शिव्या घालायचे आणि आता जेव्हा पासून मी कार चालवते सध्या मी साइकल वाले (बिचारे 2 वीलर आणि 4 वीलर दोघांकडून शिव्या खातात ) , आणि 2 वीलर वाले ह्या लोकाना शिव्या घालते.
कस असत ना माणसाच्या नवीन गोषीणमुळे आणि जीवनात zअलेल्य बदला मुळे (मग ते बदल वस्तू स्वरुप असतील वा माणसा स्वरुप), आपल आधीच जग विसरून जातो आणि पूर्णपणे नवीन जगात सामावून जातो. त्याला आठवत ही नाही की काहीच दिवासपूर्वी ज्या गोष्टी वा व्यक्ती आपल्या साठी सगळ होत्या त्याचीच जागा आता कोणी तरी दुसर्या गोशटाइन वा व्यक्तीने घेतली आहे. आणि तो नवीन दुनियेत जगू लागतो.
मला माझी Activa खूप आवडायची पण आता मला माझी कार जास्त आवडते .. ज आहे की नाही मज्जा … ह्यालाच लाइफ मधे कदाचित पुढे जान बोलत असतील. पुढे जान की नवीन गोष्टीची सवय होन ते नाही सांगता येणार पण असाच काही तरी.
मला आज ही आठवत जेव्हा मी activa नवीन घेऊन ऑफीस ला जायचे … तेव्हा ती मला फारच जड वाटायची (वजनाने) … सुरुवातीला चलवतना टेन्षन यायच. आणि तेच सेम अनुभवाल मी जेव्हा मी पहिल्यांदा एकटी कार घेऊन ऑफीस ला गेले … बापरे मला आताही तो दिवस आठवतोय … मला घाम फुटला होता .. (एसी असूनही )
ऑफीस ला जातात गाडी जवळ जवळ 6-7 वेळा पहिल्या गेरवर बंद पडली .. की मागून फुल्ल होर्न आणि शिव्या चालू … आणि मुलगी आहे बघितल्या वर तर .. जस्त्च पूर्ण कुटुंबाचा उद्धार ! आणि मग ऑफीस मघून घरी परत येताना , स्वॉरगेट ला तर ही मोठी लाइन मुंग्या सारख्या गाड्या हलू हलू पुढे सरकत होत्या … मला चक्कर यायाचीच वेळ आली होती. मनात वाटून गेल की मरु देत गाडी साइड ला लावू यात आणि रिक्ष्यानी घरी जावूयत. पण मग मी म्हटल , दुनिया गेली तेल लावत .. वाजावू देत कितीही होर्न आणि घालू देत कितीही शिव्या मला थोडाच कुणी ओळखटाय … मस्त एसी फुल्ल केला आणि जोरात गाणी लावली (खार तर मला आवडत नाही गाडी मधे मोठ्याने गाणे लावणे) आणि आले घरी …
आता काही नाही वाटत रोजच मी 11:30 च्या सुमारास ऑफीस ला स्वरगॅट वरुन जाते आणि 8:15 पीयेम ला परत येते. पण अजूनही एक मत्र आहे मुलगी पहिली की 2 वीलर वाले शाइनिंग मरणार .. ओफकौर्से मुलाच … जास काही आस भासवतत ..की बघ मी कसा मस्त फास्ट जातोय तुला येतेय का आस गाडी चालवता? पण मला खूप हसू येत ..आणि मग रिक्षावले आणि कॅब वाले .. स्वाताच्या गाड्या नसतात त्यामुळे हॅव तास चालवत .. भीती मुली काही नसतेच … कट काय मारतील मुद्दामन लाइट्स काय ओन् ऑफ करतील ..
मुलगी पहिली की दुनिया रांग दाखवायला सुरूवात !! (सॅरॅडाइया प्रमाणे )
मला सगळ्यात जास्त भीती स्वॉरगेट ची वाटायची .. ओफकौर्से आता काही नाही वाटत सवय झळी .. आता मी कुठेही आणि कोणतीही गाडी (माझया कडे दुसरी Innova आहे) चालवू शकते एनिवेर इन पुणे ऑर इन अन्य सिटी … आणि अजुन काहीच दिवसनाचा प्रश्न आहे मग तर रूट पण चेंज होणार आहे .. पण साडे चार वर्षांचा रूट, स्वर्गतेची गर्दी कधीच विसरू शकणार नाही….. आता दुसरा रस्ता .. नवीन पौल खुणा ... आणि नवीन Milestones !!

क्रमशहा :

Sunday, May 22, 2011

शनिवार आणि रविवार ...

भयंकर बिज़ी शनिवार आणि रविवार ... लवकरच सांगते .. लिहिताना पण थकल्या सारख जाणवत ...
पण खूप धमाल केली आणि आलिही !!