Saturday, May 5, 2012
USA embassy - अनुभव
USA embassy समोर बसून काय कराव कळत नवत म्हणून म्हटलं थोड लिहाव काही तरी कनस्त्रक्टीव तरी होईल. मी माझ्या घाईमुळे आणि मुर्खापणा मुळे माझा कॅमेरा पुण्यातून निघताना घेतला नाही तो जर आणला असता तर आता मला जास्त काही विचार करायची वेळच लागली नसती कारण इथे प्रत्येक गोष्ट कॅमेरा ्मधे बंद करण्याची होती, मागेच समुद्र होता तिथे हि मला फोटो काढता येवू शकले असते पण काही उपयोग नाही आता ..विचार करूनही ...
मग विचार केला कि जर माझ्या लिहिण्यातून मी इथले चित्र जर वाचकासमोर आणू शकाले तर छान होईल. मी आता एका फळ वाल्याच्या शेजारी रचून ठेवलेल्या फळांच्या क्रेट वर बसली आहे आणि मस्त चहा पीत पीत हे लिहित आहे. माझ्या आजू बाजूला असंख्य लोक उभी आहेत, रस्त्याच्या इकडच्या तिकडच्या दोन्ही बाजूला लोकन्चि ये जा चालु आहे. embassy मध्ये जाणारी लोक म्हणजेच अप्लीकॅन्त अतिशय तणावातून रांगेत हळू हळू पुढे सरकत embassy मध्ये जात आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न .. माझे काय होईल ?, मला काय प्रश्न विचारतील ? त्यांची भाषा मला कळेल का ? सगळ्यात महत्त्वाच म्हणजे मला विसा मिलेल का ?
कोणी ओफिस कडून H1 वा L1 करण्यासाठी आलेले आहेत किवा कोणी आपल्या मुलीकडे व मुलाकडे जाण्यासाठी विसा करत आहेत, त्याचं एक वेगळच टेन्शन. नवीन लग्न झालेल्या मुलींचं वेगळाच टेन्शन .. त्या आपल्या भविष्य ठरण्यासाठी रांगेत उभ्या आहेत .. लग्न तर झालाय पण विसा होईल का आणि मी तिकडे जाऊ शकेन का ? अश्याच काहीश्या भावना त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहेत.
हि झाली आत जाणाऱ्या लोकांची परीस्तीती .. आता बाहेर कोणाचे आई बाबा आपल्या मुलाचे काम होईल कि नाही हि चिंता करत उभे आहेत, कोणाचा भाऊ , कोणाचा नवरा, कोणाची बहिण, काका, मामा अशी असंख्य लोक embassy बाहेर जागा मिळेल तिथे बसून आपल्या माणसाची वाट पाहत आहेत .. कित्येक लोक स्वताला सोफास्तीकॅतेड किवा लई भारी समजणारी मस्त फुटपाथवर बसलेले इथे तुम्हाला दिसतील म्हणजे तसं मी हि इथे अशीच बसलेय.
तेवढ्यात माझ लक्ष इथून चालत असलेल्या मुलींच्या घोळक्यावर गेल त्या विसा साठी आलेल्या दिसत नवत्या कदाचित इथून जात असतील. माझ लक्ष गेल त्यांच्या outfit वर आणि accesaries वर. एकंदरीतच मुंबईत नवीन ट्रेंडस खूप लवकर येतात आणि नंतर त्या इतर सगळ्या शहरामध्ये पसरतात. मुंबईच्या मुली लगेचच ओळखू येतात, एकतर गोगल त्यांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो मग त्यातही त्यांची फशन दिसते मग तो ब्रान्देड नसला तरी त्यांना चालतो. त्यांच्या कानामध्ये कानातल्यांचे प्रकार बघण्यासारखे असतात. बऱ्याच वेळेला केस सुटतेच दिसतील त्यांचे, जस काही त्या येणाऱ्या घामाची त्यांना सवय झालेली असते, कोणी वेणी घातलेली दिसते पण त्यातही वेरीअशांस असतात म्हणजे एकाच बाजूला ला वेणीचे पेड असतात तर दुसऱ्या बाजूला समोरच्या केसाची बट पुढे डोळ्यावर काढलेली असते. मला तर बऱ्याच वेळेला वाटत कि त्यांच्या डोळ्यांना त्या अश्या प्रकारच्या केसांचा त्रास तर त्रास होत नसेल का?. पण एवढ मात्र आहे त्याच आयुष्य खूप फास्ट आहे. जेवढ्या लवकर त्या नवीन गोष्टी अदाप्त करतात तेवढ्याच लवकर बदलतात हि.
तेवढ्यातच मला embassy मधून एक मुलगा बाहेर येताना दिसला त्याच स्वप्न पूर्ण झालेलं त्याच्या चेहऱ्यावर लागेचाच कळत होत, मस्त हसत हसत त्याने बाहेर पावूल टाकत ते नवीन आयुष्याची निव रोवण्यासाठीच, मग माझ लक्ष मी पुन्हा एकदा embassy मधून बाहेर येणार्यांकडे केंद्रित केल एक छानस जोडप बाहेर पडल पूर्णत्वाचा भाव ठेवून, ठेवढ्यात एक मुलगा धावतच बाहेर आला आणि आपल्या मित्राला कि भावाला कडाडून मिठी मारली पण मागूनच एक मुलगा मान लटकावून बाहेर पडला नी पटकन दिसेनासा झाला त्याला मात्र पुन्हा ह्या सगळ्या दिव्यातून जायचं होत
काही लोक हसत हसत तर काही तोंडावर प्रश्नचिन्ह घेवून बाहेर पडत होते, प्रश्न तसा फारच साधा आहे असा वाटत पण त्याच उत्तर काय हे मात्र आपल नशिबाच ठरवत आणि usa विसा करताना नक्कीच ह्या सगळ्याचा अनुभव येतो. तुम्ही काय आणि कुठे कस बोलायचं, कस उत्तर द्यायचं हे कितीही ठरवून गेलात तरी ते तसाच घडेल हे मात्र सांगता येन अवघड आहे.
ज्यावेळी मी विसा साठी गेले होते तेव्हा माझा विसा झाला होता त्या वेळेला पण तेव्हाही बऱ्याच लोकांनी बरीच इनपुट्स दिली होती कि सकाळचाच वेळ घ्या तर काम नक्की होत पण आता तर वेळ हि तुम्हाला ऑटो जनेरेतेड मिळते ..मग कोणी सांगितलं कि interviewer मुलगी असेल तर जरा अवघडच असत पण जेव्हा माझा विसा झला माझा interview एका मुलीनेच घेतला होता .. आणि मला एकदमच माझा तो दिवस आठवला जेव्हा मी हि अशीच घाबरलेल्या अवस्तेत विसा करण्यासाठी आले होते, मीही तेव्हा अप्प्लीकॅन्त्च्या लीने मध्ये उभी होते तेव्हा माझ बाहेरच्या लोकां कडे व बाहेर कुठेही लक्ष्य गेले नाही .. आज हि आठवत, स्वत जवळच्या सगळ्या गोष्टी अगदी मोबिले सुद्धा आपल्याला VFS च्या ऑफिस मध्ये लोकेर मध्ये ठेवून फक्त आपले लागणारे कागद पत्र (त्यांच्या दिलेल्या लिस्ट प्रमाणे ) घेवून विसा ऑफिस मध्ये जायचे असते. रांगेत आत गेल्या वर आपले अप्प्लीकॅतीओन चेक ह्वून एन्ट्री झाल्या वर ते आपल्याला एकदा चेक करतात कि आपण कागद पत्र शिवाय काही घेवून तर आलो नाहीये ना .. मग आपल्याला एक लाकूड आणि टोकन हातात दिल जात जे आपल्या बरोबर परत बाहेर पडे पर्यंत ठेवायचं असते त्या लाकडाच काय काम आहे ते काही कोणाला हि कळत नाही पण मला आस वाटत कि त्या मध्ये एखादी चीप असावी ज्यामुळे जर त्यांना आत मधील सगळ्या लोकांवर एकाच वेळेला नीट नजर (कॉम्पुटर वरून ) ठेवता येईल. मग पुढे जावून आपल्याला अंगठ्याचे आणि बोटांचे इम्प्रेशन द्यायचे असतात तेव्हा हातावर मेहेंदी खराब बोट म्हणजे स्कीन ला काही प्रोब्लेम असेल तर ते लोक इम्प्रेशन घेत नाहीत मग आपण एका मोठ्या हॉल मध्ये आपला नंबर येई पर्यंत बसायचं , समोर आपल्याला बरेच कौन्तर दिसतात काही भाषा स्पेसिफिक असतात म्हणजे ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही अथवा काळात नाही त्यांच्या साठी ट्रान्सलेतर असतत. मला अजूनही आठवत एक आजी ज्या पंढरपूर वरून आल्या होत्या विसा करण्या साठी त्यांचा मुला कडे जायचं होत. अश्या मस्त नवावरी साडी घालून गळ्यात पंढरपूरच्या तीपिकॅल maala घालून त्या बसल्या होत्या जस मी त्याच्या शेजारी जावून बसले त्यांनी मला विचारलं बघ काय बाय हा नंबर आलं का ? मला त्यांचा कॉन्फिदान्चे पाहून अजूनच हुरूप आला ..
मग जसा माझा नंबर आला मी त्या दिशेने गेले आणि इंटरविव चालू झाला आणि संपला पण .. फक्त २ प्रश्न आणि विसा मिळाला ..मला विसा मिळाला .. मला विश्वास च बसत नवता .. त्यामुळे काहीही खोट बोलायचा प्रयत्न करू नका खोते कागदपत्र लावू नका, कागदपत्र नित लावून त्याच्या समोर प्रेसेंत करा आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे आपली body language खूप लक्ष्य पूर्वक त्याचं आपल्या कडे लक्ष्य असत ते मात्र अजिबात विसारु नका .. पण आपण अजिबात कुठल्याच गोष्टीवर ठाम पणे सांगू शकत नाही कि असाच असेल वा असाच होईल .. शेवटी तुम्ही काय कस करता ह्या पेक्षा तुमच्या नशिबाने काय ठरवलं आहे तेच जास्त महत्त्वाचे ठरते .
Subscribe to:
Posts (Atom)