Tuesday, May 5, 2009

स्त्री ...

स्त्री ... किती छान आणि आदरपूर्ण शब्द आहे हा... पण खरच का सगळे जण ह्याशब्दचा आदर ठेवतात? मला वाटत , नाही ठेवत... काही जण ह्या शब्दाला मारण्याचा प्रायन्त करतात तर काही जण स्त्रीच्या अस्तित्वाला ला संपवण्याचा प्रयन्त करतात,तिला शारीरिक मारहाण करतात ..काही तर मानतात की स्त्रीला तर अस्तित्वच नसत.खरच का स्त्रीला अस्तित्वा नसत. ... आररे पण हे का विसरतात की त्याच स्त्री मुळे तर ते लोक ह्या जगात वावरत असतात.पण हे कधीच काळत नाही ह्या लोकाना ... त्याना स्त्री फॅक्ट एक साधन असत त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्या साठी ... सकाळी उठल्या पासून ते अगदी zओपे पर्यंत ...एक साधन...जे सगळ्या गरजा पूर्ण करतच असतात काही न बोलता.... अगदी मुकुटपणे...सकाळी उठल्यावर ते ज़ोपे पर्यंत फॅक्ट काम करत रहण ..हेच तीच जीवन असत...पण एवढ करून तिला काय मिळत ... दोन प्रेमाचे शब्द पण नाही ... मिळतात ते फ़क्त शिव्या आणि शाप ... आणि वासनेने भरलेली जवळीक ... जी तिच्या मना सारखी कधीच नसते ... ती फक्त एक साधन असते...आणि एवढ करूनही तिला चांगल कोणीच बोलत नाही...आस का होत ... का स्त्रीला अजूनही लोक जोड्या जवळ ठेवचा प्रयत्न करतात. का ...? तिच्या ह्या जगण्याळा कोण जावाबदर ... आहे? ... ती स्वता: की अजुन दुसर कोणी?

4 comments:

 1. विषय गंभीर आहे. पुरुष कष्ट करत नाहीत असे म्हणायचंय का आपल्याला? तो नोकरी करतो. राबराब राबतो. ओव्हरटाईम करतो. बायका मुलांना पोसतो, घर, बंगला गाडि याचे हप्ते, मुलांच्या फिया भरता भरता कंबरडे मोडते त्याचे.
  त्या मानाने नोकरी न करणा-या बायका या बापतीत मोकळ्या अस्तात.
  मग पुरुष, बायकोने मला वापरले असा ओरडा करतात का? आपल्याच कुटुंबा साठी आपण करतो तर मग स्त्रि एक "साधन" अशी भाषा का?
  दोन प्रेमाचे शब्द: ते मिळायला हवेत. इथे काही पुरुष चुकतात.
  शेवटी विषय वासनेचा. पुरुषाची ती नैसर्गिक गरज आहे. सेक्स हार्मोन्स पुरुषांमध्ये जास्त अस्तात. त्यासाठी तुम्ही त्याला दोषी ठरवणार? आ

  ReplyDelete
 2. प्रीती,

  मी तुझ्याशी सहमत आहे.

  @साधक,

  भारतामधे अजूनही स्त्री ही एक भोग वस्तू समजली जाते ही सत्य परिस्थिती सर्वांना मान्य करवीच लागेल. अजूनही भारतातील काही राज्यामधे मुलगी जन्माला आल्यावर मारुन टाकले जाते. हुंडा बळी च्या आकड्यांमधे अजूनही कपात झाली नाही. अजूनही भारतात सरासरी दर 20 मिनिटाला एक बलात्कार होतो. स्त्री किंवा बालिका दोन्ही बलात्करीत होत आहेत.

  आपण जे म्हणत आहात ते खूपच कमी घरात दिसते.

  ReplyDelete
 3. http://www.marathimati.com/Aksharmanch/SwatiDalavi/we-working-women.asp

  ReplyDelete
 4. साधक आणि अभी , ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आणि प्रतिक्रीये बद्दल खूप खूप आभार.
  सगळ्यात आधी रिप्लाइ करायला उशीर ज़ल्या बद्दल माफी मागते. पण काय करणार ... कामाला ही सध्या माहत्व देणे फारच गरजेच ज़ालाय.
  हो, हा विषय तसा फारच गंभीर आहे .
  ज्या गोष्टीन विषयी तुम्ही लिहिल आहे त्याच्या शी मी पूर्ण पणे सहमत आहे पण ते एका विशिष्ट क्लास ला रेप्रेसेन्त करतेय. कारण ज्या गोष्टी वर नमूद केल्या आहेत त्या फ़क्त तोच पुरूष पूर्ण करू शकतो जो महिन्याला 50-70 हजारपेक्षा जास्त कमावतो किवा जे जोडपे मिळून एवढ कमावतात.
  पण मी ओवर ऑल सगळ्या क्लास ला धरून बोलतेय ... स्पेशली लोवर अँड लोवर मिड्ल क्लास बद्दल...जिथे नवरा करत तर काहीच नाही पण बायकोच्या जिवा वर जगतो आणि पुन्हा तिच्यावरच आररेरावी करतो.
  थोडक्यात अजुन ही कोणाचाच दृष्टिकोन बदलेला नाहीए ... अजुन ही आपला समाज मेल डॉमिनेटेड आहे ... आणि हे एक कटू सत्य आहे.जे मला वाटत बदलायला अजुन ही खूप वेळ लागेल.पण मला आशा आहे की तो बदलेल.

  ReplyDelete