Thursday, June 30, 2011

शेवटी महाराष्ट्र ते महाराष्ट्र ..

कालच मी कान्हा वरून परत आलेय आधी मुंबईत आले आणि तिथून पुण्याला, हुस्श्या झाले मला एकदाच घरी आल्यावर ... शेवटी महाराष्ट्र ते महाराष्ट्र .. त्याला तोड नाही .. आणि पुण्याला तर नाहीच नाही ...
मी आत पर्यंत खूप राज्य बघितली ... पण महाराष्ट्र एवढी सुबत्ता आणि सुरक्षितता कुठेच नाहीये .. मी जेवढ सुरक्षित पुण्यात असते तेवढ मला दुसर कुठेही वाटत नाही आणि सत्य आहे ...
म प्र चांगल आहे .. त्यांनी जी add केलीये ती हि त्यातल काही प्रदेशाला match करते ..पण मला तिथे भयंकर गरिबी वाटली म्हणजे गरीबीच आहे तिथे .. एवढा मोठा पसरलेला भूखंड आणि त्यातून वाहणारी नर्मदा .. पण उपयोग काय लोकच नाह्येत तिथे सगळे पैसे कमवण्या साठी गेलेत बाहेर म्हणजे कोणी दिल्लीला तर कोणी मुंबईला अथवा कोणी पुण्याला ...
तिथे असणाऱ्या जमिनीचा आणि नर्मदेच्या पाण्याचा काही उपयोगच नाहीये ... खर सांगू का जर तिथल्या लोकांनी ठरवलं ना तर ठीथे सोन पण उगवेल पण कष्ट कोण करणार ?
साध उदाहरण सांगते ... तिथे बेडा घात म्हणून एक visitor spot आहे जिथे खूप हिंदी चित्रपटांच शूटिंग झाल आहे ... तिथे संगमरवरी दगडाची कलाकारी विकण्यासाठी आहे सात संगमरवरी हत्तीचा संच कितीला असेल ... फक्त ३५ रुपयांना ... विश्वास बसतोय म्हंजे तो संच पाहून कोणीही इथे त्याचे १५० - २०० रुपये सहज देतील ..
अजून एक सांगते .. माझ्या गाडीचा चालक जो मला जबलपूर ते कान्हा आणि कान्हा ते कान्हा ते जबलपूर नेणार होता त्याला फक्त ३,५०० हजार पगार होता आणि त्यात तो खुश होता ..
विश्वासच बसत नाही ...
पण जेव्हा मी कान्हा पाहिलं तेव्हा मी सगळ विसरून गेले .. सुंदर खूपच सुंदर असा जंगलच मी कधी पाहिलं नाही .. मला live national geograpghy channel पहिल्या सारख वाटत ..इतक शांत आणि घनदाट पसरलेलं जंगल ... अहाहा डोळे दिपले माझे ते निसर्गाचे रूप बघून, खरच ... निसर्ग एवढ सुंदर कोणीच नाही ...
मी लवकरच कान्हाचे चित्रफिती आणि माहिती इथे प्रसारित करेन

1 comment:

  1. कोणी कमी पैशांत खूष असल तर काही बिघडत नाही.. त्यांना एवढ्या कमी पैशांत जीवानावश्यक गोष्टी - ज्यात अन्न, वस्त्र, निवारा बरोबर आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजनही येत - मिळत नाहीत हे वाईट आहे. खर तर सगळ्यांनाच कमी पैशांत भागवता आलं (तशी परिस्थिती असली - महागाई कमी असली ) तर जास्त चांगल.

    ReplyDelete