Friday, June 21, 2013
माझ ..नवीन .. घर .. आणि ..शिफ्टींग ...
नवीन घरात शिफ्ट होवून एक महिना झाला तरी अजून घर सेट करण काही थांबलेलं नाही. मी तर ह्या मताला आलेलं आहे कि मराठीत एक म्हण आहे "घर पहाव बांधून" तस "घर पहाव शिफ्ट करून" हे हि तेवढंच अवघड आहे. करण इथे दोन गोष्टी कराव्या लागतात पाहिलं म्हणजे आधीच्या घरातून आपल्याला हवेत त्या सगळ्या गोष्टी आवरून एकत्र भरायच्या मग त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नवीन ठिकाणी जावून बाहेर काढायच्या आणि लावायच्या. अर्रे राम किती ते काय काय कराव लागत .. आता तुम्ही बोलाल कि पेकेर्स अंड मुवेर्स का नाही वापरल इतक सोप आहे शिफ्ट करण .. पण ते लोक फक्त आपण काढून ठेवलेल्या गोष्टी पेक करतात आणि नवीन ठिकाणी जावून अनपेक करतात पण त्यांना आपणच सगळ काढून द्याव लागत .. हा मोठय गोष्टी जस TV ,, फ्रीज ह्या गोष्टी ठीक आहेत ते स्वताच नित पेक करतात. असो तर अश्या प्रकारे मी जुन्या घरातून नवीन घरी शिफ्ट झाले म्हणजे मुवेर्स ने आणल सगळ समान पण आणल्या नंतर लावण आहेच ना .. विचारू नका जवळ जवळ ५ दिवस मी तेच करत होते पहिला हॉल मग किचेन आणि मग शेवटी बेडरूमस .. किचेन मध्ये सगळ लावण तस फास्ट झाल करण तश्या प्रत्येक गोष्टी साठी सोयी करून ठेवलेल्या होत्या ..त्या मानाने हॉल पण लगेच लागला पण वेळ गेला तो बेडरूम्स मध्ये...करण घरातल तेच एक ठिकाण असत जिथे आपण सगळ्यात जास्त वेळ काढतो मग त्यचे माचींग पडदे त्याचा अम्बिअन्स चांगलाच हवा नाही का ?सकाळ पासून मी कामाला लागायचे कालाय्चाच नाही कधी वेळ गेला ते .. रोज एक लिस्ट बनवायचे आज काय हे आणायचं ..ते आणून झाल कि दुसर्या दिवशी अजून एक दुसरी लिस्ट तयार ह्यायाची ..घरातलं आवरून बाहेरच शोप्पिंग बापरे दम निघाला सगळा त्यात मे चा भयानक गरमा .. पण एवढ सगळ करून जे घर आपलं छान दिसत ते अप्रूप वेगळाच असत .............................................................................
आता घर नित लागलाय तरी मध्ये च काही तरी असत कि अर्रे हे आणायचं राहिलंय ..लिस्ट काय अजून संपत नाहीये :) पण वर्थ आहे हे करणआणि आपल घर लावण ह्यात जो आनंद मिळतो तो कशातच नाही ..नाही का ? .................................................................................................................
आता ह्या घरातील एक जागा हि आता माझी फार लाडकी झालेय माझ्या बेड रूम मधली खिडकी .. जिथे बाजूला सोन चाफ्याच्या फुलांनी बहरलेल झाड आहे हल्ली माझी सकाळ चहा बरोबर तिथेच होते .. हेच काय आताही मी तिथेच बसून हे सगळ लिहितेय ..
Subscribe to:
Posts (Atom)