मित्रो !! ... SS .. असा आवाज हल्ली लोकांच्या हृदयात खूपच घर करून गेलाय .. तर मित्रो ..तुम्हाला सगळ्यांना नववर्षयाच्या हार्दिक शुभेचछा !! ह्या वर्षी महिन्यातून एक तरी कमीत कमी पोस्ट मी कारेन असा ठरवलंय .. बघू मी किती स्वतःच आवाज ऐकतेय ..
बऱ्याच दिवस पासून लिहीन म्हणून बोलत होते पण राहत होत .. खूप दिवसापासून मनात काही गोष्टी घोळ घालत होत्या पण मलाच काळत नाही कसं ते शब्दात मांडता येईल .. असा कि वाचून ते पटलं पाहिजे आणि वाचणाऱ्याला राग हि नाही आला पाहिजे
आपण नक्की उचच भ्रू, सोफासिकेटेड आहोत असे कश्यावरुन लोक ठरवतात ? किंवा ठरवावे ?
माहीत नाही म्हणजे कळत नाही, काही लोक खूप शिकून पण संकोचित वृतीची असतात आणि काही लोक न शिकता पण पूर्णपणे खूप शहाणे असतात. काही लोक सगळ्यात छान ठिकाणी राहून पण तू लहान मी मोठा मी श्रेष्ष्ठ अन तू नाही ..
म्हणजे मला कळलंत नाही कि कोणत्या गोष्टी ह्या विचारसरणीला कारणीभूत असाव्यात ?
लोकांच्या आडनावावरून आताचे पालक स्वतःच्या मुलांना जेव्हा कोणाबरोबर राहा आणि खेला किंवा नका राहू सांगताना दिसतात तेव्हा मला खरंच त्यांची कीव करावीशी वाटते. कीव वाटते त्याच्या विचारसरणीची कीव वाटते २०१७ मध्ये असण्याची ..
हि लोक खरं तर स्वतःच्या ठरवून दिलेल्या लक्ष्मण रेषेत राहतात.. तसंच जगतात. त्यांना ४ टाळकी मिळाली ना .. म्हणजे त्यांची बरं का ..ते खुश असतात. त्यांना वाटत आपण सगळ्यात भारी लोकांच्या संगतीत आहोत. हे लोक जास्त करून आम्ही उंचच आणि बाकी "इतर" ह्या कॅटेगरी चे असतात. त्यांना त्याच्या पुढं गेलेलं आवडत नाही आणि कोणी "इतर" लोक काही छान करत असतील तर ते त्यांना भडक वाटत ..खरं तर मनातून त्यांनाही तेच करायचं असत .. पण काय करणार लक्ष्मण रेषा असते ना आखलेली !.. हे लोक खूप प्रयन्त करतात सगळ्यात वर्चस्व दाखवण्यात पण यश काही त्यांना मिळत नाही ..म्हणजे त्याला असं वाटत असत कि ते जिंकले पण बाकीच्या कुठल्याच लोकांना काही फरक पडलेला नसतो. प्रत्येक घारीला आकाशातून उडताना जमिनीवर किडेच दिसल्याचा भास होतो पण तसं प्रत्यक्षात नसत. ह्यांनाही सगळे किडे वाटतात.
थोडक्यात काय सोफिस्टिकेशन अन शिक्षण ह्याचा एकमेकांशी प्रत्यक्ष पणे काहीच संबंध नाही. तुम्ही कुठे राहता, कोणा बरोबर राहता ह्याचा तुमच्या बौद्धिक पातळीशी तसं काहीच घेणं देणं नाहीये. मला एवढं कळत कि सगळी कडे एकचं डेफिनेशन असावी सोफिस्टिकेशनची. कोण काय आहे, कसं आहे, काय करत, कसं राहत हे सगळं आपापले प्रश्न आहेत. बेटर, ते स्वतःचे स्वतः सोडवले पाहिजेत. कोणावर बंधन घालणं, हे वाईट आहे आणि हे चांगलं आहे हे न ठरवणं हे सगळं पाळलं पाहिजे.. मुलांना एकमेकांबरोबर राहून देणं महत्त्वाचं आहे, let them learn by their own !! डोन्ट स्पूनफीड एव्हरीथिंग .. असं शेवटी हीच पिढी मोठी होऊन पुढची पिढी घढवेल.
माहित नाही मी माझी बाजू मांडलेय वा तसं प्रयत्न केलाय ... पण मला काय बोलायचं हे तुमच्या पर्यंत पाहोचणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.
No comments:
Post a Comment