आज काहीसा कामाचा मूड अजिबातच नवता ... म्हणजे अगदी सकाळ पासूनच .. सकाळी उठल्यावर अस वाटल कि आज जाऊच नये ऑफिसला ..पण मग विचार केला उगाचच सुट्टी कशाला वाया घालवायची .. मग पटकन आवरून जॉब ला गेले आणि दुपारी मस्त कलटी मारली .. तस मी सकाळीच निघताना कॅमेरा आणि लेन्सेस घेतल्या होत्या ... हाच विचार करून कि जर कलटी मारता आली तर उगाच पुन्हा घरी जायला नको ..
मस्त गाडी ला स्टार्टर मारला, गोगल ओन आणि AC हि ओन .. कार मस्त सिह्नगड रोड ला घातली आणि direct खडकवासला ! मस्त वातावरण होत .. गेल्या गेल्या एक मस्त चहा घेतला आणि विचार केला काय click करायचं ? मग, इकडे तिकडे पहिल्या वर बरंच काही दिसू लागल जे कॅमेऱ्या मध्ये नजर कैद होण्या साठी आतुर होत ..
मग पुढच्या १ तासात मी आणि माझा कॅमेरा काम करत होतो .. खूप काही होत तिथे वेगवेगळी फुल होती, नजर जाईल तिथ पर्यंत पाणी होत , त्यात काही नौका मस्त बागडत होत्या, काही पक्षी उडत होते काही चं झाडावर बसून पाण्यात पाहत होते आणि काही पक्षी झाडा झुडपाच्या मागे बसून आयुष्य बद्दलचे समीकरण बनवत होते ... वचन देत होते .. कधीच वेगळ न होण्याचं !
फ्रेश वाटल पाहून सगळ ... बर्याच जोडप्यांना वाटल कि मी त्यांचे च फोटो काढतेय कदाचित ... पण मी त्यांच्या कडे बघून सांगितलं ..घाबरू नका .. मी हि इथे बसून गेलेले आहे .. तुमच्या साराकीच मलाही खूप वचन मिळती होती .. !! पण वेड्या त्या जीवांना काय आणि कोणी सांगावे कि खर अस काहीच नसत .. पण ते नंतर कळत आणि तेव्हा खूप उशीर झालेला असतो .. असो !
तिथून मी निघणार आणि पावसाने हि मस्त हजेरी लावली .. संध्याकाळ मस्त पावसात नाहली .. मग पाऊस माझा सोबती बनून अगदी पुण्या पर्यंत म्हणजे घर पर्यंत आला .. घरी आले मस्त फ्रेश झाले आणि पुन्हा बाहेर पडले थोड्याश्या कामाने ..काम तर झाले पण बर्याच दिवसांनी माझी नजर पुस्तकांच्या दिशेने वळली .. माहित मला काय वाटल आणि मी आज चक्क चक्क ६ पुस्तके विकत घेतली .. माझ मलाच कळल नाही कि इतकी पुस्तक कशी काय घेतली ... एक घ्यायला गेले आणि हे पण छान वाटतंय आणि ते हि छान असेल अस करत करत ... शेवटी म्हटलं बस .. पैसे संपले आता ..
काही दिवस खूप काही देवून जातात आणि काही खूप काही हिरावून घेतात .. खर तर ह्यालाच जीवन म्हणतात .. कदाचित !!!
छान लिहिले आहे
ReplyDeleteपुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा!
माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/
Thanks for visiting boosting my moral ...प्रशांत रेडकर .. Priti
ReplyDeleteअसं काही वाचलं की मला सुट्टी न घेताच फ्रेश वाटतं....अग इतके फोटो घेतलेस मग एक पोस्टला पण लावाय्चास न...:)
ReplyDeleteअपर्णा , मी नक्की टाकेन फोटो .. ब्लोग ला भेट केल्या बद्दल आभार !!
ReplyDelete