Wednesday, November 30, 2011

पसाट .... wow simply woooow ...!!!


मला पहिल्या पासूनच गाड्यांच भयंकर आकर्षण आहे, कुठलीही नवीन गाडी बाजारात आली कि मला ती कधी एकदा पाहते आस नेहेमीच वाटत आणि बऱ्याच वेळेला मी गाड्यांचे स्पेसिफिकेशन पण अगदी आवर्जून पाहते . आमच्या दोन्ही गाड्या घेताना पण मी बराच विचार केला होता. माझी पहिली गाडी आम्हाला मोठी आणि आरामदायी हवी होती जी आम्ही बाहेरगावी जाताना वापरू म्हणून त्या वेळेला बाजारात इंनोवा गाडी जोरात चालू होती म्हणून मी इंनोवा ला प्रेफरन्स दिला. इंनोवा पण छान गाडी आहे एकदम मोठी, भव्य आणि आरामदायी आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे इंनोवाचा AC, सेकॅंदा मधेच गाडी पूर्ण गार होते. मग काही दिवसांनी मला रोजच्या कामासाठी आणि ऑफिस ला जाण्यासाठी वा गावात जाण्यासाठी इंनोवा खुपच मोठी वाटू लागली मग आम्ही इकॉनोमिकॅल गाडी घ्यायची ठरवली. इकॉनोमिकॅल गाडी म्हटल्यावर मारुती शिवाय मला नाही वाटत कुठल् दुसर नाव समोर येवू शकत. त्यावेलेलाही मी खूप गाड्या पहिल्या आणि सगळ्या मध्ये आवडली निसान ची मिअक्रा पण आधीच ठरवल्या प्रमाणे मला एक छोटी स्वस्त आणि नीट इकॉनोमिकॅल गाडी हवी होत म्हणून मी अल्टो k10 घेतली .. छान गाडी आहे. मग बरेच दिवस कुठली गाडी अशी पहिली नाही कि पुन्हा एकदा मान वळवून पहावी. आणि काही दिवसांनी एका गाडीची चर्चा बाजारात ऐकू येवू लागली ज्याच्या त्याच्या तोंडी एकाच नाव आणि त्या गाडीची स्तुती ... ती गाडी होती Volks Wagen – Pasaat ....
मी पसाटचे फिचर्स पाहून खुपच इम्प्रेस झाले आणि एक दिवस मला ती गाडी एका सिग्नल ला दिसली राखाडी कलर असलेली लांब रेखीव गाडी, ती जाई पर्यंत मी ती गाडी पाहत बसले मग काही दिवसातच पसाट रस्त्यावर दिसू लागली पण जेव्हाही दिसायची मी मागे वळून पाहायचेच
एक दिवस मी माझ्या काकूंकडे चालले होते शनिवार होता माझी गाडी मी रस्त्यावर सामन्तर पार्किंग मध्ये पार्क करत होते मग गाडीतून उतरून मी गाडीला लॉंक लावताना मला माझ्या गाडीच्या मागे पसाट पार्क होताना दिसली म्हटलं जाताना पाहाव तिच्या कडे तेवढ्यातच मला आवाज आला कि “मादाम, एवढ लॉंक नका करु, कोणी नाही चोरून नेणार गाडी ...” मी दचकून मागे पाहिलं तर माझा एक जुना मित्र चांगला मित्र बऱ्याच वर्षांनी माझ्या समोर पसाटमधून उतरत होता मग काय आमच्या गप्पा चालू झाल्या मधून मधून मी पसाटकडे पाहत होते तेवढ्यातच माझा मित्र मला बोलला आपण इथे उभ राहून बोलण्या पेक्षा होटेल मध्ये जाऊन कॉफी घेऊयात का ? मी म्हटलं चला ..., न राहवून मी त्याला बोलले मी चालवू का रे गाडी ?? पण त्याने उत्तर दिल ..पाहिलं तू पसाट काय आहे हा अनुभव बाजूला बसून घे आणि मग चालव .. मग काय गाडी चालू झाली आणि काय सांगू मी एवढी सही गाडी पहिलीच नाहीये कधीही its a computer ती गाडी एक रोबो आहे तिला मानुअल मोड वर चालवा व तिला ऑटो मोड वर .. जस्त लाजवाब ..मी मंत्रमुग्द्ध होवून गाडीच्या प्रत्येक फिचर्स पाहत होते, प्रत्येक सीईट साठी वेगळा AC आणि हिटर, सीईट हि आपल्या मणक्या च्या आकार प्रमाणे स्वतः सेट होते , हि अशी एकमेव गाडी आहे कि तिला बनवता हाडांचे डॉक्टरची मदत घेतली आहे , गाडी स्वतः स्वताला पार्क करते समोरच्या स्क्रीन वर पुढून मागून येणारे अडथळे दाखवते , हूड ऑटो मध्ये मागे घेता येते , मागच्या काचेला बटन ने गार्ड लावता येते, दरवाज्यांना बाजूला ओली छत्री ठेवली तरी ते पाणी बाहेर जाते अशी सोय दिलेय आणि अजूनही काही लहान साहन बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला बाकी दुसऱ्या गाड्यामध्ये बघायला नाही मिळणार .. आणि आराम वाह .. चालवता कळल हि नाही कि स्पीड १०० पर्यंत आहे एकदम स्मूथ .. wow simply woooow ...
मग काय पसाटअम्धून उतरू मस्त कॉफी आणि पूर्वीचे चे विषय .. कोण काय करतं आणि कोण कुठे आहे हे बोलता बोलता वेळ कसा गेला कळलाच नाही ..आणि ठरल्या प्रमाणे परत येताना मी पसाट चालावयाच मानसिक समाधान आणि स्वप्न जगवल ...
बाजारात ह्या बजेट मध्ये बहरपूर गाड्या आहेत मर्सिडीज आहे, BMW आहे, ऑडी हि ..पण पसाट ची गोष्ट वेगळी हे मात्र नक्की ...

Saturday, November 26, 2011

आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले ....


आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तोच चंद्र जो सगळ्यांना हवासा वाटतो
तोच चंद्र जो त्याच्या कवितेत असतो
तोच चंद्र जो तिच्या पुढे सुंदर नसतो
सुंदर असते ती, जी चंद्राला प्रश्न करते
खरच, आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तिचे हसणे पण चंद्राच्या त्या निखळ चांदण्यासारखे भासले
तिचे डोळे पण चन्द्रासारखे दिसले
नाही तर तिच्या डोळ्यात तरी चंद्र दिसला
आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
ती समोर दिसावी म्हणून चंद्र समोर दिसू लागला
आणि आता ती लाजली असेल आस वाटल कारण
चंद्र ढगात लपला ...

Tuesday, November 22, 2011

पोर्न स्टार सन्नी लीवओन ची बिग्ग बोस नावाच्या रिअलिटी शो मध्ये एन्ट्री ..खरच गरज आहे का ?




पोर्न स्टार सन्नी लीवओन ची बिग्ग बोस नावाच्या रिअलिटी शो मध्ये एन्ट्री .. हि बातमी वृत्तवाहिन्यावर झळकताच, आपले सगळे लोक खडबडून जागे झाली. सगळ्या वाहिन्यावर तेच तेच बातम्या आणि त्याच एका बातमीवर वाद विवाद चालू झाला !
कळत नकळत मी हि असंच बातमी पहिली आणि जास्त काही कळण्याच्या आताच मी दुसऱ्या चानेल चा नंबर दाबला पण लक्षात राहील फक्त नाव सन्नी लीवओन ...एक पोर्न स्टार
दुसऱ्या दिवशी पेपर वाचून झाल्यावर माझ्या ते नाव एकदमच माझ्या डोक्यात आल मग मी विचार केला पोर्न स्टार म्हणजे नक्कीच हे सगळ नग्नता आणि अश्लीलता असलेले मॉडेल बद्दल असेल म्हणूनच एवढा आरडा ओरडा सगळ्या वृत्तवाहिन्या वर चालू होता. कधीही न पाहिलेला चेहेरा आणि कधीही न ऐकलेलं नाव कोणाच आहे हे पाहण्यासाठी मी गुगल केल आणि मला घाम फुटला जे काही माझ्या समोर आल ते पाहून ... त्या सगळ्या होत्या पोर्नोग्राफी च्या साईटस आणि हि सन्नी आहे त्या साईटसची स्टार ...
आणि ह्या एवढ्या मोठ्या रिअलिटी शो मध्ये हिला बोलावलंय .. का ? कश्या साठी ? असे भरपूर प्रश्न माझ्या समोर आले .. उत्तर फारच सोप आहे ह्या वाहिन्यांना हवा आहे पैसा आणि यश, प्रसिद्धी .. TRP वाढवण्यासाठी काय वाटेल ते करतील हि लोक उद्या काय वाटेल ते दाखवतील, स्वताच्या स्वार्थासाठी हे लोक हे का नाही विचार करत कि आपण जे काय दाखवतोय ते एका नेशनल वाहिनी वर दाखवतोय आणि हे सगळ फक्त १८+ लोक नाही तर सगळे पाहत आहे, अगदी लहान मुल हि ...
आता हेच उदाहरण घ्या ना मला हे नाव माहित नवत तिचा चेहेरा माहित नवता म्हणून मी गुगल केल माझ्या प्रमाणे भरपूर लोक असतील जे असच करतील आणि सोडूनही देतील पण जर नुकत्याच वयात आलेली कोणीही मुल आणि मुलीने हेच केल आणि त्यांना कळाल कि हि कोण आहे तर त्यांच्याच सामान्य ज्ञानमध्ये नको त्या गोष्टीची भर नाही का पडणार आणि गरज नसताना आणि वयही नसताना ..
आपलीच लोक पैश्यासाठी अश्या गोष्टी समोर आणून माहित नसलेल्या आणि नको असलेल्या लोकांना प्रसिद्धी मीळवून देतात ह्याच गोष्टीच मला नवल वाटत .. आज कोणालाही माहित नसलेली हि मुलगी अचानकच समोर आली आणि फेमस हि झाली .. सगळ कश्या साठी TRP आणि पैश्यासाठी ... आणि काय तर तिला हिंदी चित्रपट साठी पण ऑफर मिळतेय खरच कहर आहे निर्लजतेचा !!

Monday, November 14, 2011

देवूळ ... छान मार्केटिंग चित्रपट ..




जेव्हा मी देवूळच पोस्टर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर ह्या दोघांची जोडी पहिल्यांदाच एका छान चित्रपटात काम करतेय हे पाहून मस्त वाटल. त्यांच्या वृत्तवाहिन्यावर येणारे इंटरवीएव्स पाहून वाटल चला एक छान चित्रपट बर्याच दिवसांनी येतोय मस्त बघू सिनेमा गृहात जावूनच ...
कुलकर्णी'स चा असलेला हा दुसरा चित्रपट म्हणजे "वळू" नंतरचा .. तीच टीम फक्त बदल आसा कि एक कुलकर्णी गायब म्हणजे अतुल कुलकर्णी च्या जागी नाना पाटेकर बस ! बाकी तेच गाव, तेच डोंगर , तीच घर ,तीच मानस सगळ तेच .. असो पण गोष्ट तर वेगळी आहे ना ?
असं म्हणत गेले चित्रपट पाहायला ... लोकांची तशी गर्दी होती म्हणजे होऊस्फुलाच होता जवळ जवळ ... छान वाटल पाहून कि मराठी प्रेक्षक हल्ली सिनेमे चित्रपट गृहातच येवून पाहतात ..
चित्रपट चालू झाला आणि हळू हळू कळायला लागले कि आरे नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर हे च खरे तर मार्केटिंग चे हत्यार आहे .. म्हंजे चित्रपटाचा विषय अतिशय छान आहे आणि तो दाखवलाय पण छान, छोटे छोटे बारकावे पण दिग्दर्शकाने व्यवस्तीत पाने पार पाडलेत .. विषय कुठेही कंटाळवाणा त्याने होऊ दिला नाहीये म्हणजे थोडक्यात विषयाला छान जगवालाय हा चित्रपट ..
एक छोट खेड तेच जे वळू मध्ये होत ते, एका गुराख्याला म्हणजे हा गुराखीच पूर्ण चित्रपटाचा नायक आहे , हा तर त्याला एका भर दुपारी एका उंबराच्या खाली झोपलेला असताना साक्षत्कार होतो कि त्याला दत्त दिसले ! बस मग काय हि बातमी पूर्ण गावात पसरते सगळे हळू हळू तिथे येवून दर्शन घेवू लागतात त्यात गावातले काही मोठे लोक म्हणजे राजकारणी लोक त्याच बातमीचा फायदा घेवून राजकारण सुरु करतात आणि सगळी पोवर वापरून अनादित्रीत्या त्या जागी एक देवूळ बांधतात, ज्या गावामध्ये खरतर एका सरकारी इस्पितळाची गरज असते तिथे उभ राहत एक मंदिर एक देवूळ आणि तेच देवूळ मिळवून देत तिथल्या लोकांना पोट आणि खिसा भरण्याचे साधन ... जी लोक राजकारण खेळूनच त्या गावासाठी वीज, पाणी, रस्ते करू शकलेले नसतात तीच देवूळ झाल्याने सगळ काही करून देतात कारण त्यांना त्याचा मागे मिळत असतो पैसा ... अमाप पैसा !!
पुढे गावच गावपण हिरावल जात .. जो तो पैश्याच्या मागे पळताना दिसतो आणि ज्या दत्ता मुळे हे सगळ मिळाल असत त्यालाच विसरून जातो ..
पण ज्याला ह्या सगळ्या गोष्टीचा साक्षत्कार झालेला असतो तो काश्या समजू लागतो खरी परीस्तीती ..आणि तो एक दिवस देवालाच चोरतो आणि घेवून जातो गावापासून खूप लांब आणि बिचाऱ्याला वाटते चला देव गेला तर गाव पूर्वी सारख छान होईल पण तसं काही घडत नाही .. आणि मग हा चित्रपट संपतो ..हो म्हणजे खरच संपतो
आता तुम्ही बोलाल ह्यात नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर आहेत कुठे ? तेच तर ते खरच, आहेत कुठे ? नाना पाटेकर तरी आपल्याला थोडा दिसतो राजकारणात गावाचा पाटील म्हणून आणि थोडासा चित्रपट नानाच्या वाटेला आला आहे पण दिलीप प्रभावळकर तर फक्त गावाच्या पाटला कडे गावामध्ये होणारे इस्पितळ ची इमारत कशी असेल आणि हा पूर्ण प्रोजेक्ट कसा काम करेल फक्त हेच सांगतो तेही फक्त अर्ध्या चित्रपटात नन्तर तोही निघून जातो म्हणजे मी तर हा चित्रपात बनवला आसता तर कदाचित दिलीप प्रभावळकर ला पाहुणा कलाकार म्हनून संबोधल असत ..पण इथेच आल मार्केटिंग नाना- प्रभावळकर च्या जोडीला पुढे करून हा चित्रपट खूप गर्दी खेचतोय हेच तुम्हाला पाहायला मिळेल पण जर तुम्ही खास नाना व प्रभावळकर चा अभिनय पहायचा अस काहीस मनात ठेवून हा चित्रपट बघायला गेलात तर मात्र तुमच्या पदरी निराशा अपेक्षित आहे ..
केवळ मार्केटिंग हेच हत्यार वापरलाय ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ... जेवढा खर्च चित्रपट बनवण्यासाठी केलाय तेव्हढाच मार्केटिंग साठी ... "दुनिया झुकती ही झुकाने वाला चाहिये" हे मात्र खर ठरत खास देवूळच्या बाबतीत ..असो एकंदरीत मराठी चित्रपट सुद्धा आता हिंदी वाल्यासारखे आपल्या चित्रपटाचे मार्केटिंग खास करून गर्दी खेचू शकतात हे तितकाच खर !!!

Wednesday, November 2, 2011

प्रवास आवडीचा ...

आज मे उप्पर आसमा नीचे, आज मे आगे जमाना हे पीछे …

आज रस्ता तोच होता, तीच तीच गाव मागे मागे जात होती, वातावरणही तेच होते, छान दुपार उन्हात न्हाली होती, वारा मस्त सुसाट घाटातून वाहत होता, शेजारून छान मुळशी धरणाचे पाणी हळूहळू मागे सरत होते ..
रस्त्यात त्याच टपऱ्या, चहाची दुकाने आणि हॉटेल्स ..नेहेमीची गर्दी, नेहेमीच्याच स्पोटला लोकांच्या गाड्या उभ्या होत्या, कोणी फोटो काढताय तर कोणी मस्त झाडाच्या खाली बसून जेवणाचा आनंद घेत आहेत ..
वाह ... वाह!! मोठा वीकेंड त्यामुळे ताम्हीनीही घाटही व्यवस्तीत गाड्यांच्या गर्दिनी फुललेला दिसत होता. बऱ्याच ठिकाणी थांबायचा मोह मला झाला पण आजचा प्रवास वेगळा होता नेहेमीसारखा न्हवता, मला लवकरात लवकर माझ गाव गाठणे आवश्यक होत .. आणि नेहेमी प्रमाणे माझ डोक हि दुखत नवत आणि घरी जाऊन दुखणार पण नवत कारण ह्या वेळेला एकाच मोठा फरक होता माझ्या प्रवासामध्ये आणि तो म्हणजे मी स्वत इंनोवाच्या कारच्या ड्रायवर सीटवर बसले होते तसं इंनोवाला कार नाही म्हणता येणार इंनोवा म्हणजे एक मिनी ट्रक आहे ..
एकेकाळी मला अशक्य वाटणारी गोष्ट कि मी कधी इंनोवा सारखी मोठी गाडी घेवून ३ तासाचा घाट असलेला रस्ता पूर्ण पुण्यापासून कधी चालवू शकेन … पण शेवटी अशक्य काही नसत आणि मला तर वाटत कि ज्या गाड्या जास्त मोठ्या दिसतात त्या चालवायला तेवढ्याच सोप्या असतात .. रोज पुण्यात छोटी कार चालवून जेवढा आत्मविश्वास वाढला होता त्यापेक्षाही ह्या प्रवासाने मला एक नवीन भरारी मिळाली.
असो , पण हा माझा पहिला स्वत केलेला प्रवास खूपच अविस्मरणीय राहील ह्यात काहीच शंका नाही .. पण ह्या पुढे मी जगातली कुठलीही गाडी कुठेही चालवू शकते हे मात्र नक्की ...