Thursday, March 14, 2013

जागतिक महिला दिन ???

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिन निमित्ताने काही गोष्टी तुमच्याशी शेएर करावयाच्या वाटल्या ...आपण जागतिक महिला दिन का सेलेब्रेट करतो ? हा जागतिक महिला दिन कश्या साठी बनवला गेला ? ................................................................................................................................. हा काही गोष्टी बंद होण्यासाठी बनवला गेला त्या स्त्री साठी जाचक होत्या, त्याचा भविष्यकाळ सुखद असावा, त्यांना इतर सगळ्या प्रमाणे सगळ्या सुविधा मिळाव्यात , त्यांना त्याच डिसिजन स्वत घेता याव आणि सगळ्यात महत्त्वाच त्यांच्या वर होणारा अन्याय आणि मारझोड बंद ह्वावी आणि स्त्रीला पण सगळ्या मध्ये आदर मिळावा. ................................................................................................................................. पण आस आजही मला वाटत नाही कि हे सगळ तिला मिलालय .... नाही भारतामध्ये अजूनही ला बर्याच गोष्टीना वंचित रहाव लागतंय ... काही भाग सोडले तर बाकी सगळीकडे तिच्या पदरी निराशाच आहे ... ................................................................................................................................ मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय लोक कुठेच गणली जात नाहीत त्याच प्रमाणे महिला दिन त्यांना काहीसा आपला वाटत नसावा कारण त्यातल्या त्यातच हा वर्ग व्यवस्तीत सुधारलेला आहे आणि इथली स्त्री स्वताच्या पायावर उभी राहून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करते इथे उलट जागतिक पुरुष दिन करायची गरज कदाचित भासेल ... ................................................................................................................................... पण बाकी सगळ्या वर्गांमध्ये हि असमानता दिसून येते आणि असते हि ... बर्याच स्तर मध्ये स्त्री ला देण्यात येणारा आदर कमी पडतो आणि खरी त्रुटी इथेच आहे. जोपर्यंत सगळ्या स्तरांवर स्त्री ला आदर मिळाला तरच हि मारझोड, होणारा अन्याय आणि शारीरिक शोषण बंद होणार आहे ... आता आदर म्हणजे नक्की कसा द्यायचा .. आता लोकांना सांगून तो काही लगेच येणार नाही पण आपल्या नवीन जनरेशन जर हे सारख सारख सांगितलं ..त्यांना स्त्रीत्व किती महान आहे हे समजून आपण सांगू शकलो तर नक्कीच पुढे येणारा काळ प्रत्येक स्त्री साठी सुकर असेल. लहान मुलांच्या शाळेच्या अभ्यास मध्ये दर वर्षी जर कुठल्याही महान स्त्री ची कथा अभ्यासक्रमा मध्ये टाकली तर लहान पण पासूनच स्त्री बद्दल चांगल मत बनण्यास मदत होईल आस नाही का वाटत तुम्हाला ? ................................................................................................................................... भारतातल्या बर्याच भागांमध्ये स्त्री हि एक भोग वस्तू म्हणूनच बघितली जाते , तिला चूल मुल आणि संसार ह्याच्या व्यतिरिक्त तिला इतर काहीही जीवनात अस्तित्व नाही. आस का विचारल्यावर पुन्हा तीच त्रुटी दिसून येते कि स्त्रीत्व चा आदर नसणे .. ................................................................................................................................... आताच झालेलि दिल्लीची निर्भया केस आपण सगळ्यांनीच ऐकली .वाचली .. काय चूक होती तिची ? एवढीच कि ती दिल्लीमध्ये थोड उशिर झाल्यामुले घाईने चुकीच्या बस मध्ये बसली आणि इतका भयंकर क्रूर कृत्य घडल. तिच्या वर बलात्कार करणाऱ्या प्रत्येक माणसाला आई असेलच ना ? पण इथेच स्त्री बद्दलचा आदर कमी पडला आणि ती एक भोग वस्तू आहे हे त्यांनी पाहिलं .................................................................................................................................. सगळी कडे फिरून शेवटी हेच मत येत कि मुलांना स्त्री चा आदर करता येवू लागला पाहिजे नाही तर अजून परिस्तिति गंभीर होण्यासाठी वेळ लागणार नाही. हि परिस्तिति फक्त ह्याच एका गोष्टीने सुटू शकते कारण व्यवस्तीत शिकलेले मुल हि आसा विचार करताना मी स्वत पाहिलं आहे कि रस्त्यावरून जाणारी मुलगी हि आपल्या साठी भोगवस्तू असू शकते ................................................................................................................................... हा विचार करणारा मनुष्य स्त्रीला कधीच समजू शकत नाही आणि नाही तीच स्त्रीत्व ...

1 comment:

  1. खूप छान लिहिला आहेस.... खरच विचारसरणी बदलली नाही तर खूप अवघड होयील पुठे.... प्रत्येकाने वाचून अनुकरण करण्यासारखा आहे...

    ReplyDelete