Showing posts with label अभिव्यक्त. Show all posts
Showing posts with label अभिव्यक्त. Show all posts

Wednesday, July 13, 2016

हीच ती वेळ ...

हाच तो दिवस, हीच ती वेळ असा करता करता आपण पुढे जात असतो
पुढे जात असतो की स्वतःला ढकलत असतो समाधान जातो की आसमाधानाने .. कदाचित समाधानाने जात नाही म्हणून पुढचा येणार दिवस सुरू पण तसाच करतो.

काही लोक म्हणातात मला असाच जगायचंय .. कोण काय बोलताय ह्याच मला काही घेणं देणं नाही ..लोक वेडे असतात काहीही अपेक्षा ठेवतात की मी कसं जगायचं कसं बोलायचं .. माझं मी बघेन 

खूप लोक बोलतात सकाळ किंवा दिवसाची सुरुवात छान झाली तर दिवस चांगला जातो .. पण लोक हे विसरतात .. दिवसात अनेक लोक आपल्याला कामानिमित्ताने भेटतात आणि त्यांची सुरुवात छान झालेलीच असते असा काही नसत .. त्यांचंही आपल्यावर परिणाम होतो ..

खरं तर प्रत्येक बिंदू वेळेचा, जगावं आसा असला पाहिजे .. किंवा तो जगता आला पाहिजे .. माहीत नाही कधी असा जमेल .. जेव्हा जमेल सगळे सुखी होतील. पण हे ह्या सगळ्याच उत्तर नाहीये .. 

एक पुस्तक वाचतेय सध्या.. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जो विचार करता तसं घडत .. तुम्हची गोष्टी तुमच्या जीवनातल्या आकर्षित करता .. जर तुमही सगळं छान हवाय तुम्ही फक्त छान आणि चांगले विचार कारण आवश्यक आहे .. आणि खरं तेच खूप अवघड आहे 

एक माझे काका आहेत ते नेहेमी हे बोलत असतात हीच ती वेळ चला .. कुठल्याही गोष्टी साठी जर ती छोटी असेल किंवा मोठी, काही करण्या आधी "हीच ती वेळ " ..
मला कधी कधी ते ऐकून वाटत बहुतेक असाच असेल जेव्हा काही घडत असेल किंवा घडायचं असेल एक वेळ त्याला असेलच ना ..? 

Wednesday, March 16, 2016

रेघ

रुसून ओढली एकदा दोन मनामध्ये
पुसली तरी ओरखडा देवून गेली ..
आधीच्या खोल भावनाना प्रश्न पुसून गेली
गोंधलेल्या मनात अजून गोंधळ देवून गेली ..
आज वरच्या प्रेमाला नजर लावून गेली
आणि जुन्या वेळेवर धूळ पसरवून गेली..

Saturday, January 9, 2016

खफा

हम खफा किससे रहे यहा तो अपने हि पराये हो गये ...
दामनने साथ छोडा हि था अब तो परछायी रुथ गयी ...
कच्ती दरियामे दूर गयी , हुमे तो न किनारा नसीब हुवा न दरिया का पाणी ....
वो प्यार करणा हमसे सिखे और बदलेमे बेवफाई दे गये ....

Wednesday, November 5, 2014

कूप मंडूक

आपल्या सगळ्यांना कूप मंडूक हि गोष्ट माहित आहेच .. कि कसा एकाच विहिरीत राहून बेडकाला आस वाटू लागल कि हि विहीर म्हणजेच पूर्ण जग आहे. विहिरीतून दिसणार आकाश म्हणजेच एवढाच विश्व आहे. त्यांनी कधी पर्यंत केला नाही त्या विहिरीतून वर येवून बघायचा, एकदा एक कासव तिथे आल त्यांनी त्यला विचारलं अरे तू इथे काय बसून राहिलास वर ये आणि बघ समुद्र किती मोठा आहे पण बेडकाला डोक्यात कायम असत कि नाही आस काही नाहीच आहे हेच जग आहे ..आणि तो कासवाला वेड्यात काढत
असा जीवनात विचार करणारी खूप लोक असतात ज्यांनी स्वताच एक जग ठरवलेले असत आणि त्यांना त्यातून बाहेरच यायचं नसत , त्यांनीच त्याच्या सीमा ठरवलेल्या असतात आणि ते त्यातच रहात असतात, त्यांच्यात एक अहंकार असतो कि मला कोणाची गरज नाही मी माझा एकटाच एकटीच मस्त आहे.. काय लोकांशी ओळख करायची उगाचच .. ह्या लोकांना कोणी मित्र या मैत्रिणी नसतात ..हे लोक कधीच सोशल होत नाहीत म्हणजे त्यांना ते जमत नाही. रादर ते ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मूर्खपणाच्या वाटतात. असा करणारे लोक हे किती मूर्ख असतात असा काहीच गैरसमज करून हे लोक असाच जगत राहतात.
मला एवदाच मांडायचं कि हे जग खूप छान आहे आणि हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळत. आस ते फुकट घालवू नका .. जगा दुसर्यांना जगू द्या, मस्त सोशल व्हा, जीवनाचा आनंद लुटा. माणूस जेव्हा सोशल होतो न विचारांची देवाण घेवाण होते जे आपल्याला बराच काही शिकवून जाते, आयुष्यात पुढे जावून आस नको वाटायला कि अर्रे हे तर मी करू शकत होते का नाही केल ? माझ्या कडे तर तेव्हा वेळ होता पण आता नाहीये कारण वेळ हि कोणासाठीच थांबत नसते .. वेळ एकदा गेली कि गेली...
कोणाला तरी मिस करताय मग फोन करा ..
कोणाला तरी भेटावस वाटतंय .. त्याला बोलावून घ्या ...
स्वताला कोणीतरी समजून घ्यावास वाटतंय .. समजावून सांगा
प्रश्न आहेत, ऊतर हवय .. विचारा
काही गोष्टी आवडल्या नाहीयेत .. बोलून दाखवा
कुणाच काहीतरी आवडलाय .. अप्रीशियेत करा
कुणावर तरी खूप प्रेम करताय .. मग एकदा तरी नक्की बोलून बघा ..
बघा तरी हे करून ... मित्र/ मात्रिणी बनवा, स्वताला वेळ द्या, दुसर्यंची बेडी बनू नका, स्वत जागा .. दुसर्याला जगू द्या, आनंद द्या आणि मग घ्याही ..नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करा .. मला एखादी गोष्ट का जमत नाहीये हे ह्याचा विचार करा आणि ती करायचा एक तरी प्रयत्न करा .. सगळ्यात महत्त्वाच स्वतावर खूप प्रेम करा ..
आणि कूप मंडूक प्रवृत्तीतून बाहेर पडा ...

Thursday, March 14, 2013

जागतिक महिला दिन ???

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिन निमित्ताने काही गोष्टी तुमच्याशी शेएर करावयाच्या वाटल्या ...आपण जागतिक महिला दिन का सेलेब्रेट करतो ? हा जागतिक महिला दिन कश्या साठी बनवला गेला ? ................................................................................................................................. हा काही गोष्टी बंद होण्यासाठी बनवला गेला त्या स्त्री साठी जाचक होत्या, त्याचा भविष्यकाळ सुखद असावा, त्यांना इतर सगळ्या प्रमाणे सगळ्या सुविधा मिळाव्यात , त्यांना त्याच डिसिजन स्वत घेता याव आणि सगळ्यात महत्त्वाच त्यांच्या वर होणारा अन्याय आणि मारझोड बंद ह्वावी आणि स्त्रीला पण सगळ्या मध्ये आदर मिळावा. ................................................................................................................................. पण आस आजही मला वाटत नाही कि हे सगळ तिला मिलालय .... नाही भारतामध्ये अजूनही ला बर्याच गोष्टीना वंचित रहाव लागतंय ... काही भाग सोडले तर बाकी सगळीकडे तिच्या पदरी निराशाच आहे ... ................................................................................................................................ मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय लोक कुठेच गणली जात नाहीत त्याच प्रमाणे महिला दिन त्यांना काहीसा आपला वाटत नसावा कारण त्यातल्या त्यातच हा वर्ग व्यवस्तीत सुधारलेला आहे आणि इथली स्त्री स्वताच्या पायावर उभी राहून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करते इथे उलट जागतिक पुरुष दिन करायची गरज कदाचित भासेल ... ................................................................................................................................... पण बाकी सगळ्या वर्गांमध्ये हि असमानता दिसून येते आणि असते हि ... बर्याच स्तर मध्ये स्त्री ला देण्यात येणारा आदर कमी पडतो आणि खरी त्रुटी इथेच आहे. जोपर्यंत सगळ्या स्तरांवर स्त्री ला आदर मिळाला तरच हि मारझोड, होणारा अन्याय आणि शारीरिक शोषण बंद होणार आहे ... आता आदर म्हणजे नक्की कसा द्यायचा .. आता लोकांना सांगून तो काही लगेच येणार नाही पण आपल्या नवीन जनरेशन जर हे सारख सारख सांगितलं ..त्यांना स्त्रीत्व किती महान आहे हे समजून आपण सांगू शकलो तर नक्कीच पुढे येणारा काळ प्रत्येक स्त्री साठी सुकर असेल. लहान मुलांच्या शाळेच्या अभ्यास मध्ये दर वर्षी जर कुठल्याही महान स्त्री ची कथा अभ्यासक्रमा मध्ये टाकली तर लहान पण पासूनच स्त्री बद्दल चांगल मत बनण्यास मदत होईल आस नाही का वाटत तुम्हाला ? ................................................................................................................................... भारतातल्या बर्याच भागांमध्ये स्त्री हि एक भोग वस्तू म्हणूनच बघितली जाते , तिला चूल मुल आणि संसार ह्याच्या व्यतिरिक्त तिला इतर काहीही जीवनात अस्तित्व नाही. आस का विचारल्यावर पुन्हा तीच त्रुटी दिसून येते कि स्त्रीत्व चा आदर नसणे .. ................................................................................................................................... आताच झालेलि दिल्लीची निर्भया केस आपण सगळ्यांनीच ऐकली .वाचली .. काय चूक होती तिची ? एवढीच कि ती दिल्लीमध्ये थोड उशिर झाल्यामुले घाईने चुकीच्या बस मध्ये बसली आणि इतका भयंकर क्रूर कृत्य घडल. तिच्या वर बलात्कार करणाऱ्या प्रत्येक माणसाला आई असेलच ना ? पण इथेच स्त्री बद्दलचा आदर कमी पडला आणि ती एक भोग वस्तू आहे हे त्यांनी पाहिलं .................................................................................................................................. सगळी कडे फिरून शेवटी हेच मत येत कि मुलांना स्त्री चा आदर करता येवू लागला पाहिजे नाही तर अजून परिस्तिति गंभीर होण्यासाठी वेळ लागणार नाही. हि परिस्तिति फक्त ह्याच एका गोष्टीने सुटू शकते कारण व्यवस्तीत शिकलेले मुल हि आसा विचार करताना मी स्वत पाहिलं आहे कि रस्त्यावरून जाणारी मुलगी हि आपल्या साठी भोगवस्तू असू शकते ................................................................................................................................... हा विचार करणारा मनुष्य स्त्रीला कधीच समजू शकत नाही आणि नाही तीच स्त्रीत्व ...

Saturday, February 11, 2012

युवी...वि आर मिसिंग यु !!


युवी ..युवराज .. क्रिकेट वर राज करणारा तो युवराज .. भारताचा नायक .. क्रिकेट साठी लढणारा लाढविय्या एकदम अचानक पटागांतून दिसेनासा झाला .. आणि लढू लागला आयुष्याची लढाई ..
खूप वाईट वाटले जेव्हा युवीच्या आजार बद्दल कळले आणि एकदम आठवली ती जाहिरात "जब तक बल्ला है थाट है .. नही तो ?"
जेव्हा पाहिल्यांदा त्याच्या आजार बद्दल पपेर मध्ये कळले तेव्हा कुठे तरी पाल चुक्चुकून गेली कि नक्की काय आहे ..पण काही दिवसातच बातमी आली आणि मन अस्तीर झाल ..
मनुष्याच जीवन इतक नाजूक रेशमी धागा असतो का ? .. कि तो कधी हि विरू लागतो आणि आयुष्याची लढाई चालू करून देतो, हि गोष्ट कोणीच सांगू शकत नाही .. युवी ची बातमी कळल्यावर माझ्या डोळ्या समोर त्याचे सगळे चांगले दिवस एका मागून एक येवून गेले .. त्याची प्रेमप्रकरणे , त्याचे ते एकाच ओवर मधले ६ षटकार .. आणि त्याला मिळालेली वाह वाह .. त्याचे चित्रपट ताराकाबरोबराचे नाच .. त्याच्या सगळ्या जाहिराती आणि मग ... तो विश्व विजेता होण्याचा मान आणि जगलेल ते स्वप्न .. सगळ्यांचच ! जे पूर्ण करण्यामध्ये त्याचा फारच मोलाचा वाटा आहे. विश्वजेत्ते पद मिळाल्या नन्तर त्यांनी व्यक्त केलेला आनंद उत्सव ... शब्द नाहीयेत त्या गोष्टी सांगण्यासाठी .. आणि आपण सगळ्यांनीच ते पाहिलंय आणि अनुभवलाय !
काळ कसा एका शक्नात बदलतो आणि होत्याच नवत करतो .. युवीच्या सगळ्या जाहिराती आता कोणी तरी वेगळे लोक करत आहेत फक्त एकच जाहिरात अजूनही तशीच आहे एका बदला सह .. "जब तक बल्ला है थाट है .. नही तो , जिंदगी भी क्या रंग दिखती है .."
युवी लवकरच छान बर होऊन पटागांत परत येईल आणि त्याच्या त्याच कातील खेळातून पुन्हा आपल्या देशाच नाव पुढे आणील असाच मला मनापासून वाटत आणि मला वाटत असाच सगळ्यांना हि वाटत असेल ..
युवी वि मिस यु !!

Wednesday, January 4, 2012

२०११ ... आयुष्यातील एक सगळ्यात मोठ पर्व ... जे शिकवून गेल बराच काही !!! अलविदा २०११ ...



मला वाटत ह्या जगातला प्रत्येक माणूस नवीन वर्ष चालू होताना एकदा तरी मागील वर्ष कस गेल ह्या बाबतीत नक्कीच विचार करत असेल आणि त्या एका सेकंदाच तो माणूस ते पूर्ण वर्ष फिरून येतो ,प्रत्येकाला स्वताचे चांगले वाईट दिवस दिसून जातात आणि त्यावरच लोक ठरवतात कि मगच वर्ष चांगल गेल कि खराब ..
वाट तशी ठरली होती कुठे जायचं ते हि पक्क होत आयुष्यात कधी दुख असू शकतच नाही हेच फक्त तेव्हा दिसत होत पण अचानकच वादळ आल आणि सगळ काही धुसर झाल आणि वाटच चुकली वाट अशी चुकली कि परत वाटेवर न आणता पूर्वीच्या वाटेवर सोडून गेली, तेव्हा कदाचित हे नवते माहित कि पूर्वीचीच वाट बरोबर होती ..
२०११ वर्षाची सुरुवातच वादळाने झाल्या मुळे पूर्ण वर्ष त्या वादळाच्या पाऊल खुणा काढण्यात गेल्या आस काहीस म्हणायला काहीच हरकत नाहीये, आयुष्यात जे काही कठीण प्रसंग येऊ शकतात ते सगळे हा म्हणजे तसे सगळेच जवळ जवळ येवून गेल्या सारखे वाटले. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच आयुष्यात प्रोब्लेम्स असतात.. हो तर , असतात नं पण प्रत्येकाने आपला एक साचा बनवलेला असतो आणि त्याच्या बाहेर माणूस जास्त करून जाण्याचा प्रयत्न करत नसावा बहुतेक ..
तसाच साचा बनवलेला होता पण ह्या वेळेला साच्यात ठरवलेल्या गोष्टी आल्याच नाहीत, ज्यांच्या वर जास्त विश्वास होता ती लोक विश्वासाच्या चौकडीत बसलीच नाही तिथेच नापास झाली आणि स्वतच जग बानवण्यासाठी दुसऱ्याच बनवलेलं जग निर्दयी पणे तोडून निघून गेली. जीवनात भावना किती महत्त्वाच्या असतात आणि जेव्हा कोणी त्या तोडून मोडून लाथाडून निघून जात तेव्हा त्या इकडे तिकडे विखुरलेल्या भावना एकत्र गोळा करताना काय यातना होतात ते शब्दात सांगूनही कोणाला कळणार नाही. प्रत्येक भावना गोळा करताना मन किती जड होत हि गोष्ट अनुभवण्यासाठी त्याच अनुभवातून जाव लागेल. हे जग किती स्वार्थी असू शकत ते कळल्यावर आपला विश्वास कोणावरच बसू शकत नाही. प्रत्येक माणूस संशयी वाटू लागतो .. अगदी प्रत्येक !
त्यामुळे ह्या वर्षात हे कळल कि पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये अगदी ती व्यक्ती आपल्या कितीही ओळखीची का होऊ नये, अगदी कितीही.. काही गोष्टी शेऐर करतान हजार काय १० हजार वेळा विचार करा.
आणि प्रत्येक वेळेला स्वताचा विचार करा आपल कस कश्या मुळे जास्त फायदा होईल ते बघा , जग स्वार्थी आहे तर आपण पण काय कमी स्वार्थी आहोत असा प्रश्नच पुढे कधी येतच कामा नये ... हि झाली भावनिक शिकवण जी २०११ वर्षां कडून मिळाली .
मग आली आर्थिक, कितीही छान गुंतवणूक आहे असे वाटल तरी स्वता कडचे सगळे पैसे संपवून त्याच्या मागे पळने मुर्खपणा असतो, पैसे संपतात आणि जेव्हा खरच पैश्याची गरज असते तेव्हा जमीन किवा घर आपल्याला लगेच काहीच पैसे देवू शकत नाही .. गुंतवून करा पण पैसे थोडे बाजूला ठेवून करा कारण जस मी वर सांगितलं, तस कोणीही कितीही जवळच असाल तरी पैश्याची गोष्ट आल्यावर सगळे तू कोण असेच हात वर करतात .. अगदी फालातुतल्या फालतू रकमे साठी सुद्धा ! आणि कधी काळी जरी तुम्ही त्या लोकांना मदत केली असेल तर तो परत आपलाच मुर्ख पणा ...
मग होत कॅरीअर् बद्दलचे झटके, नवीन ऑफिस मध्ये स्वताला सेट कारण हे मला वाटत सगळ्यात अवघड काम असेल आणि जेव्हा तुमच्या कुठल्याच गोष्टी निट होत नाहीयेत हे जेव्हा तुम्हाला माहित असत तेव्हा
बाकीच्या गोष्टीही नक्कीच खराब होतात कारण तुमच मन आणि डोक दोनीही जागेवर नसतात. त्यामुळे जेव्हा तुमच सगळाच पणाला लागल असेल कॅरिअर पणाला लावणे हा एक मोठा मुर्खपणा ठरेल ..
आता साधी आणि सोपी गोष्ट सगळ गणित बिनसल आणि एकदा का गाडी रुळावरून घसरली कि सगळा पडसाद उमटतो घरामध्ये आणि घरातल्या लोकांवर आणि चालू होतात घातरले प्रोब्लेम्स जे सुटत तर नाहीच उलट बिघडतच जातात आणि खर तिथे तुम्हाला गरज असते समजुतीची आणि कोणी तरी समजावून घेण्याची जर कोणी तस केल तरच घरामध्ये जास्त खचण्या आधी आपण वर येतो ...
त्यातच आयुष्यात हे हि शिकले कि तुमच्या कडे सगळ असेल पैसा, हुद्दा , ताकद, सौदर्य आणि व्यक्तीमतत्व पण 1 वेळ तुमला सगळ विसायला लावते अगदी सगळ .. जास्त अभिमान तुम्हाला घेवून बुडतो.
एकंदरीतच, आयुष्याच गणित जर एकदा चुकल तर ते बरोबर उत्तर द्यायला खुप वेळ लागतो आणि बरोबर घेवून जातो पैसा, काळजी, भावना , लोक , वेळ आणि वृत्ती ...
तेव्हा २०११ ने बराच काही हिरावून गेल पण शिकवून गेल लाख मोलाच्या गोष्टी ज्या आता पर्यंतच्या आयुष्यातही शिकल्या गेल्या नवत्या. जुनी लोक बोलतात कि नेहेमी आपल्यावर जेव्हा वाईट प्रसंग येतात ते आपल्याला काहीतरी धडा शिकवून जातात . आज कालची पिढी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसेल पण अश्या गोष्टींवर विश्वास बसण क्रमप्राप्त होत. २०११ वर्ष वाईट नवत ते होत नवीन धडे शिकवणारे वर्ष, जे धडे येणाऱ्या पुढील आयुष्यात नेहेमीच उपयोगी पडतील.
त्यातहि काही लोक सरप्राइस गिफ्ट पेंकेत मध्ये ह्या वर्षात आले आणि थोडा का होईना आपलेपणा आणि समजूतदार पण दाखवून गेले. आणि त्यामुळेच आलेल वादळ आणि त्यामुळे सापडलेली आधीची वाटच अगदी योग्य होती ह्याची पावती देवून गेले.

Thursday, December 15, 2011

सवाई गंधर्व भीमसेन उत्सवची झालेली माझी नवीन ओळख ...


सवाई गंधर्व भीमसेन उत्सव आणि माझा तसा काहीच संबंध नाहीये म्हणजे मला गान मला येत नाही आणि कळतही नाही , तस एक दोन वेळा मी सवाई ला गेले आहे पण ते असाच कोणाबरोबर तरी सोबत म्हणून गान ऐकायला नाही. पण ह्या वर्षी मात्र एक वेगळीच ओळख झाली माझी सवाई गंधर्व बरोबर ...
ते आस झाल कि मी नेहेमी प्रमाणे पित्ता मुळे आजारी पडले म्हणजे मला नेहेमीच हा त्रास होतो पण सध्या त्याच प्रमाण जरा जास्त चालू आहे . तर जास्त त्रास होत असल्याने मी फोन केला माझ्या फमिली डॉक्टर ना , त्याचं क्लिनिक १२:३० ला चालू होत म्हणून मी लगेचच नंबर लागावा ह्या हेतू ने फोन केला होता पण मला त्यांच्या रीसेप्शनिस्त कडून कळल कि ते त्या दिवशी लवकर येणार नाहीयेत कारण सवाई गंधर्व चालू आहे. मला वाटल अर्रे वाह डॉक्टरना गाण्याची आवड दिसतेय ..मग मी तिने सांगितल्या प्रमाणे २:३० ला दवाखान्यात गेले, पण तरीही डॉक्टर आले नवते मी म्हटलं अर्रे बापरे डॉक्टर एकदम जास्त दर्दी चाहते दिसतात सवाई चे आणि गाण्याचे . मी येवून बराच वेळ झाला, माझी त्यांच्याशी असलेली ओळख आणि माझा आजाराची तीव्रता बघून रीसेप्शनिस्त ने त्यांना फोन लावला तर ते सवाई मधेच होते पण मला कधी कधी सलाईन लावायला लागते म्हणून ते लगेचच आले.
सगळ तपासून झाल्यावर आणि औषध लिहून झाल्यावर मी त्यांना बोलले काय गान खुपच आवडत वाटत म्हणून दवाखान्याची वेळ हि ५ दिवांसाठी बदलली वाटत . माझ्याकडे न पाहताच त्यांनी मला ते सवाई चे त्रेस्त्री आहेत आस सांगितले मी एकदम त्यांच्या कडे दचकून पहिले आणि म्हटलं कस काय ? म्हणजे तुमचा दवाखाना इथेच आहे पहिल्या पासून म्हणून कि तुम्ही त्या बोडी वर आहात ? त्याने वर पहिले आणि अगदी शांत पणे म्हटले "अग मी सवाई गंधर्व ह्यांचा नातू आहे ते माझ्या आईचे वडील , त्यामुळे सगळे हक्क आमच्या कडे आहेत आणि म्हणूनच हे ५ दिवस पूर्ण लक्ष घालावाच लागत. सगळ्यात जास्त रसिकांना ह्या उत्सवाचा आनंद मिळावा म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही तिकिटांचे दर हि बदलेले नाहित, तू नाही वाटत जात ?? ".. मी डोळे मोठे करून हे सगळ ऐकत होते आणि मला काळातच नवत कि मी त्यांना काय विचारू कि काय बोलू .. मग मी थोड सावरून बोलले "नाही, मला कळत नाही गान .. पण पुढच्या वर्षी मात्र नक्की येईन .." ते बोलले "ये ये, समोरचा कोच आपण बुक करू जास्त महाग नाहीयेत त्याचेही दर .."
आस बोलून मी तिथून निघाले आणि विचार करू लागले ज्या लोकांकडे एवढी मोठी गोष्ट दाखवण्या सारखी आहे पण किती साधे पणे त्यांनी मला हे सांगितलं , अजून कोणी असत तर किती भाव मारला असता कि मी प्रत्यक्ष सवाई गंधर्व ह्यांचा नातू आहे . नाही तर ज्या लोकां कडे काहीही नसात ते हि उगाचच भाव मारून जातात .. मला वाटत ह्यालाच मनाचा मोठे पणा म्हणतात बहुतेक ..
काहीही असो , हे मात्र नक्की कि पुढच्या वर्षी सवाई गंधर्व भीमसेन उत्सवाचे छान फोटो मात्र नक्कीच काढायला मिळतील ...

Monday, October 10, 2011

‘गझलसम्राट’ काळाच्या पडद्याआड ...




सगळ्या गझल प्रेमीना अतिशय दुखद घटना. मी अस हि काही ऐकल होत कि जी लोक दारू पीत नाहीत त्यांना जगजीतजिच्या गझलने नशा चढायची आणि नेहेमीच चढत राहील ह्यात काहीच वाद नाही. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने त्यांच्याच गझल ऐकवून स्वताच्या प्रियकर व प्रेयसीला खुश केले असेल. आता ह्या पुढे नवीन गझलचा रूपाने काहीच ह्या लोकांना मिळणार नाही पण त्यांची एक आणि एक गझल अजरामर राहील .. थोडक्यात गझल गायीकी ते गेल्याने अनाथ झाली.

गझलला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यात त्यांच मोठं योगदान होतं. जगजीत सिहं यांनी ५० पेक्षाही जास्त अलबममध्ये गाणं गायलं आहे आणि त्याचं गझलांचं प्रमाण जास्त आहे.
तुमको देखा तो ये खयाल आया, होठों सेछुलो तुम मेरा गीत अमर कर दो, वो कागज कश्ती वो बारिश का पानी यांसारख्या गझल फारच लोकप्रिय होत्या.

तुम इतना जो मुस्कारा रहे हो (अर्थ), चिठ्ठी न कोई संदेस (दुश्मन), होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है (सरफरोश), हाथ छुटे तो रिश्ते नही छोडा करते (ट्रफिक सिग्नल) यांसारख्या त्यांच्या अनेक गझल चित्रपटांमधून ऐकायला मिळाल्या.

पण आज फिर आखे नम सी हे ....

Sunday, June 19, 2011

मिस यु आल .. !!!

आयुष्यात प्रत्येक जन काही तरी ध्येय घेवून पुढे जात असतात मी हि काही तरी ठरवून पुढे जातेय ... पण जेव्हा आपण काही तरी मिळवायचं ठरवतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील काहीतरी मागेन सोडून पुढे सरकत असतो ... कारण आस होऊच शकत नाही कि सगळ्या गोष्टी घेवून किवा सगळ्यांना खुश करून आयुष्यात पुढे जाता येत ... मग आता कुठे काय आणि कोणाला सोडायचं हे मात्र सर्वस्वी आपल्यालाच ठरावाव लागत ... त्या मध्ये मात्र आपली मदत करणार कोणीही नसत ...
मी हि हच विचार करून .. पुचे जातेय ... १५ तारखेला माझा ऑफिसचा शेवटचा दिवस होता .. साडे चार वर्षे ज्या कॉमापानी मध्ये मी काढली ती सोडताना ..मनाला काही तरी वेगळ वतन साहजिक होत .. आणि तेच मी अनुभवलं ... भयंकर द्विधा मानास्तीती मध्ये होते मी ... ते ऑफिस , ते सगळे लोक ज्यांच्या बरोबर मी इतक्या वर्षे काम केल ... ते ऑफिस मधाळ वातावरण आणि जे थोडे पण आयुष्य भर पुरणारे मित्र ... हे सोडताना जर वाईट वाटल नाही तर तो माणूस .. दगडी काळजाचा असेल असाच मी म्हणेल ...
दुपार पर्यंत स्वताला शांत ठेवून clearance काम केली .. पण जसे घड्याळ पुढे पुढे सरकत होते पायातले त्राण कमी कमी होत होते ... शेवटी एक वेळ असाही आली कि रडू कोसालेच .. मग मी पटकन ऑफिस मध्ये वाश रूम मध्ये गेले आणि स्वताला कंट्रोल मध्ये आणून बाहेर आले ..
रोज मी त्या सगळ्या गोशी मिस करते .. आता जो पर्यंत नवीन काम चालू होत नाही तो पर्यंत आणि नंतरही कादाचील ते सगळ आठवेल ... मिस यु आल .. !!!

Sunday, May 15, 2011

अभिव्यक्त !!!

मी पुन्हा लिहीणे सुरू करतेय .. कारण ही कला मला माहितेय आणि मला ती अजुन रूपात आणायचेय .. बघू कस जमताय ते .. आज मी महाराष्ट्रा टाइम मधला एक लेख वाचला आणि माझच मला कलाल की मी काय वाया घालवते आहे ..

Make it simpal silly !! :)

तुमची प्रीती