परडी भरली होती फुलांनी
ओसंडून वाहिली होती चारहि दिशांनी
वाहून गेले माझीच मी ...
अश्रू वाहोनि थिजले गाली
विरघळून गेली ती कहाणी
अस्मिता जपली माझीच मी ...
चान्दण झेललं ह्या ओठी
सुख साठवलं ह्या पोटी
ओंजळीत लपली माझीच मी ...
चालत चालत चालले मी
पुन्हा नं मागे पाहिलं मी
ओळखीच्या वळणवर, ना
नदीच्या काठावर, ना
संध्येच्या सूर्य बरोबर
चालत चालली माझीच मी ...
No comments:
Post a Comment