Wednesday, January 4, 2012

२०११ ... आयुष्यातील एक सगळ्यात मोठ पर्व ... जे शिकवून गेल बराच काही !!! अलविदा २०११ ...मला वाटत ह्या जगातला प्रत्येक माणूस नवीन वर्ष चालू होताना एकदा तरी मागील वर्ष कस गेल ह्या बाबतीत नक्कीच विचार करत असेल आणि त्या एका सेकंदाच तो माणूस ते पूर्ण वर्ष फिरून येतो ,प्रत्येकाला स्वताचे चांगले वाईट दिवस दिसून जातात आणि त्यावरच लोक ठरवतात कि मगच वर्ष चांगल गेल कि खराब ..
वाट तशी ठरली होती कुठे जायचं ते हि पक्क होत आयुष्यात कधी दुख असू शकतच नाही हेच फक्त तेव्हा दिसत होत पण अचानकच वादळ आल आणि सगळ काही धुसर झाल आणि वाटच चुकली वाट अशी चुकली कि परत वाटेवर न आणता पूर्वीच्या वाटेवर सोडून गेली, तेव्हा कदाचित हे नवते माहित कि पूर्वीचीच वाट बरोबर होती ..
२०११ वर्षाची सुरुवातच वादळाने झाल्या मुळे पूर्ण वर्ष त्या वादळाच्या पाऊल खुणा काढण्यात गेल्या आस काहीस म्हणायला काहीच हरकत नाहीये, आयुष्यात जे काही कठीण प्रसंग येऊ शकतात ते सगळे हा म्हणजे तसे सगळेच जवळ जवळ येवून गेल्या सारखे वाटले. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच आयुष्यात प्रोब्लेम्स असतात.. हो तर , असतात नं पण प्रत्येकाने आपला एक साचा बनवलेला असतो आणि त्याच्या बाहेर माणूस जास्त करून जाण्याचा प्रयत्न करत नसावा बहुतेक ..
तसाच साचा बनवलेला होता पण ह्या वेळेला साच्यात ठरवलेल्या गोष्टी आल्याच नाहीत, ज्यांच्या वर जास्त विश्वास होता ती लोक विश्वासाच्या चौकडीत बसलीच नाही तिथेच नापास झाली आणि स्वतच जग बानवण्यासाठी दुसऱ्याच बनवलेलं जग निर्दयी पणे तोडून निघून गेली. जीवनात भावना किती महत्त्वाच्या असतात आणि जेव्हा कोणी त्या तोडून मोडून लाथाडून निघून जात तेव्हा त्या इकडे तिकडे विखुरलेल्या भावना एकत्र गोळा करताना काय यातना होतात ते शब्दात सांगूनही कोणाला कळणार नाही. प्रत्येक भावना गोळा करताना मन किती जड होत हि गोष्ट अनुभवण्यासाठी त्याच अनुभवातून जाव लागेल. हे जग किती स्वार्थी असू शकत ते कळल्यावर आपला विश्वास कोणावरच बसू शकत नाही. प्रत्येक माणूस संशयी वाटू लागतो .. अगदी प्रत्येक !
त्यामुळे ह्या वर्षात हे कळल कि पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये अगदी ती व्यक्ती आपल्या कितीही ओळखीची का होऊ नये, अगदी कितीही.. काही गोष्टी शेऐर करतान हजार काय १० हजार वेळा विचार करा.
आणि प्रत्येक वेळेला स्वताचा विचार करा आपल कस कश्या मुळे जास्त फायदा होईल ते बघा , जग स्वार्थी आहे तर आपण पण काय कमी स्वार्थी आहोत असा प्रश्नच पुढे कधी येतच कामा नये ... हि झाली भावनिक शिकवण जी २०११ वर्षां कडून मिळाली .
मग आली आर्थिक, कितीही छान गुंतवणूक आहे असे वाटल तरी स्वता कडचे सगळे पैसे संपवून त्याच्या मागे पळने मुर्खपणा असतो, पैसे संपतात आणि जेव्हा खरच पैश्याची गरज असते तेव्हा जमीन किवा घर आपल्याला लगेच काहीच पैसे देवू शकत नाही .. गुंतवून करा पण पैसे थोडे बाजूला ठेवून करा कारण जस मी वर सांगितलं, तस कोणीही कितीही जवळच असाल तरी पैश्याची गोष्ट आल्यावर सगळे तू कोण असेच हात वर करतात .. अगदी फालातुतल्या फालतू रकमे साठी सुद्धा ! आणि कधी काळी जरी तुम्ही त्या लोकांना मदत केली असेल तर तो परत आपलाच मुर्ख पणा ...
मग होत कॅरीअर् बद्दलचे झटके, नवीन ऑफिस मध्ये स्वताला सेट कारण हे मला वाटत सगळ्यात अवघड काम असेल आणि जेव्हा तुमच्या कुठल्याच गोष्टी निट होत नाहीयेत हे जेव्हा तुम्हाला माहित असत तेव्हा
बाकीच्या गोष्टीही नक्कीच खराब होतात कारण तुमच मन आणि डोक दोनीही जागेवर नसतात. त्यामुळे जेव्हा तुमच सगळाच पणाला लागल असेल कॅरिअर पणाला लावणे हा एक मोठा मुर्खपणा ठरेल ..
आता साधी आणि सोपी गोष्ट सगळ गणित बिनसल आणि एकदा का गाडी रुळावरून घसरली कि सगळा पडसाद उमटतो घरामध्ये आणि घरातल्या लोकांवर आणि चालू होतात घातरले प्रोब्लेम्स जे सुटत तर नाहीच उलट बिघडतच जातात आणि खर तिथे तुम्हाला गरज असते समजुतीची आणि कोणी तरी समजावून घेण्याची जर कोणी तस केल तरच घरामध्ये जास्त खचण्या आधी आपण वर येतो ...
त्यातच आयुष्यात हे हि शिकले कि तुमच्या कडे सगळ असेल पैसा, हुद्दा , ताकद, सौदर्य आणि व्यक्तीमतत्व पण 1 वेळ तुमला सगळ विसायला लावते अगदी सगळ .. जास्त अभिमान तुम्हाला घेवून बुडतो.
एकंदरीतच, आयुष्याच गणित जर एकदा चुकल तर ते बरोबर उत्तर द्यायला खुप वेळ लागतो आणि बरोबर घेवून जातो पैसा, काळजी, भावना , लोक , वेळ आणि वृत्ती ...
तेव्हा २०११ ने बराच काही हिरावून गेल पण शिकवून गेल लाख मोलाच्या गोष्टी ज्या आता पर्यंतच्या आयुष्यातही शिकल्या गेल्या नवत्या. जुनी लोक बोलतात कि नेहेमी आपल्यावर जेव्हा वाईट प्रसंग येतात ते आपल्याला काहीतरी धडा शिकवून जातात . आज कालची पिढी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसेल पण अश्या गोष्टींवर विश्वास बसण क्रमप्राप्त होत. २०११ वर्ष वाईट नवत ते होत नवीन धडे शिकवणारे वर्ष, जे धडे येणाऱ्या पुढील आयुष्यात नेहेमीच उपयोगी पडतील.
त्यातहि काही लोक सरप्राइस गिफ्ट पेंकेत मध्ये ह्या वर्षात आले आणि थोडा का होईना आपलेपणा आणि समजूतदार पण दाखवून गेले. आणि त्यामुळेच आलेल वादळ आणि त्यामुळे सापडलेली आधीची वाटच अगदी योग्य होती ह्याची पावती देवून गेले.

No comments:

Post a Comment