Friday, July 5, 2013
पावूस आला पावूस आला ....
||आकाशातून बरसे जलधारा,
न्हाऊन निघाला निसर्ग सारा,
आसमंत हा नवा नवा ||..............
||भिर भिर वारा आणि त्या पावूस धारा,
चिंब मन आणि ओले क्षण,
आसमंत हा नवा नवा ||..............
||वीज आणि वार्याचा खेळ हा पहा,
ह्या नव चैतन्यात जावून बघा,
आसमंत हा नवा नवा ||.............
||पावूस आला पावूस आला,
मन हे माझे हर्षुनी गेला,
आसमंत हा नवा नवा ||.............
||इंद्रधनुश्याशी झालर,
फुला आणि पानांचा भर,
आसमंत हा नवा नवा ||.............
||सुंदर तो मोर पिसारा,
हसला पाहून निसर्ग सारा,
आसमंत हा नवा नवा ||..............
Friday, June 21, 2013
माझ ..नवीन .. घर .. आणि ..शिफ्टींग ...
नवीन घरात शिफ्ट होवून एक महिना झाला तरी अजून घर सेट करण काही थांबलेलं नाही. मी तर ह्या मताला आलेलं आहे कि मराठीत एक म्हण आहे "घर पहाव बांधून" तस "घर पहाव शिफ्ट करून" हे हि तेवढंच अवघड आहे. करण इथे दोन गोष्टी कराव्या लागतात पाहिलं म्हणजे आधीच्या घरातून आपल्याला हवेत त्या सगळ्या गोष्टी आवरून एकत्र भरायच्या मग त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नवीन ठिकाणी जावून बाहेर काढायच्या आणि लावायच्या. अर्रे राम किती ते काय काय कराव लागत .. आता तुम्ही बोलाल कि पेकेर्स अंड मुवेर्स का नाही वापरल इतक सोप आहे शिफ्ट करण .. पण ते लोक फक्त आपण काढून ठेवलेल्या गोष्टी पेक करतात आणि नवीन ठिकाणी जावून अनपेक करतात पण त्यांना आपणच सगळ काढून द्याव लागत .. हा मोठय गोष्टी जस TV ,, फ्रीज ह्या गोष्टी ठीक आहेत ते स्वताच नित पेक करतात. असो तर अश्या प्रकारे मी जुन्या घरातून नवीन घरी शिफ्ट झाले म्हणजे मुवेर्स ने आणल सगळ समान पण आणल्या नंतर लावण आहेच ना .. विचारू नका जवळ जवळ ५ दिवस मी तेच करत होते पहिला हॉल मग किचेन आणि मग शेवटी बेडरूमस .. किचेन मध्ये सगळ लावण तस फास्ट झाल करण तश्या प्रत्येक गोष्टी साठी सोयी करून ठेवलेल्या होत्या ..त्या मानाने हॉल पण लगेच लागला पण वेळ गेला तो बेडरूम्स मध्ये...करण घरातल तेच एक ठिकाण असत जिथे आपण सगळ्यात जास्त वेळ काढतो मग त्यचे माचींग पडदे त्याचा अम्बिअन्स चांगलाच हवा नाही का ?सकाळ पासून मी कामाला लागायचे कालाय्चाच नाही कधी वेळ गेला ते .. रोज एक लिस्ट बनवायचे आज काय हे आणायचं ..ते आणून झाल कि दुसर्या दिवशी अजून एक दुसरी लिस्ट तयार ह्यायाची ..घरातलं आवरून बाहेरच शोप्पिंग बापरे दम निघाला सगळा त्यात मे चा भयानक गरमा .. पण एवढ सगळ करून जे घर आपलं छान दिसत ते अप्रूप वेगळाच असत .............................................................................
आता घर नित लागलाय तरी मध्ये च काही तरी असत कि अर्रे हे आणायचं राहिलंय ..लिस्ट काय अजून संपत नाहीये :) पण वर्थ आहे हे करणआणि आपल घर लावण ह्यात जो आनंद मिळतो तो कशातच नाही ..नाही का ? .................................................................................................................
आता ह्या घरातील एक जागा हि आता माझी फार लाडकी झालेय माझ्या बेड रूम मधली खिडकी .. जिथे बाजूला सोन चाफ्याच्या फुलांनी बहरलेल झाड आहे हल्ली माझी सकाळ चहा बरोबर तिथेच होते .. हेच काय आताही मी तिथेच बसून हे सगळ लिहितेय ..
Thursday, March 14, 2013
जागतिक महिला दिन ???
नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिन निमित्ताने काही गोष्टी तुमच्याशी शेएर करावयाच्या वाटल्या ...आपण जागतिक महिला दिन का सेलेब्रेट करतो ? हा जागतिक महिला दिन कश्या साठी बनवला गेला ?
.................................................................................................................................
हा काही गोष्टी बंद होण्यासाठी बनवला गेला त्या स्त्री साठी जाचक होत्या, त्याचा भविष्यकाळ सुखद असावा, त्यांना इतर सगळ्या प्रमाणे सगळ्या सुविधा मिळाव्यात , त्यांना त्याच डिसिजन स्वत घेता याव आणि सगळ्यात महत्त्वाच त्यांच्या वर होणारा अन्याय आणि मारझोड बंद ह्वावी आणि स्त्रीला पण सगळ्या मध्ये आदर मिळावा.
.................................................................................................................................
पण आस आजही मला वाटत नाही कि हे सगळ तिला मिलालय .... नाही भारतामध्ये अजूनही ला बर्याच गोष्टीना वंचित रहाव लागतंय ... काही भाग सोडले तर बाकी सगळीकडे तिच्या पदरी निराशाच आहे ...
................................................................................................................................
मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय लोक कुठेच गणली जात नाहीत त्याच प्रमाणे महिला दिन त्यांना काहीसा आपला वाटत नसावा कारण त्यातल्या त्यातच हा वर्ग व्यवस्तीत सुधारलेला आहे आणि इथली स्त्री स्वताच्या पायावर उभी राहून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करते इथे उलट जागतिक पुरुष दिन करायची गरज कदाचित भासेल ...
...................................................................................................................................
पण बाकी सगळ्या वर्गांमध्ये हि असमानता दिसून येते आणि असते हि ... बर्याच स्तर मध्ये स्त्री ला देण्यात येणारा आदर कमी पडतो आणि खरी त्रुटी इथेच आहे. जोपर्यंत सगळ्या स्तरांवर स्त्री ला आदर मिळाला तरच हि मारझोड, होणारा अन्याय आणि शारीरिक शोषण बंद होणार आहे ... आता आदर म्हणजे नक्की कसा द्यायचा .. आता लोकांना सांगून तो काही लगेच येणार नाही पण आपल्या नवीन जनरेशन जर हे सारख सारख सांगितलं ..त्यांना स्त्रीत्व किती महान आहे हे समजून आपण सांगू शकलो तर नक्कीच पुढे येणारा काळ प्रत्येक स्त्री साठी सुकर असेल. लहान मुलांच्या शाळेच्या अभ्यास मध्ये दर वर्षी जर कुठल्याही महान स्त्री ची कथा अभ्यासक्रमा मध्ये टाकली तर लहान पण पासूनच स्त्री बद्दल चांगल मत बनण्यास मदत होईल आस नाही का वाटत तुम्हाला ?
...................................................................................................................................
भारतातल्या बर्याच भागांमध्ये स्त्री हि एक भोग वस्तू म्हणूनच बघितली जाते , तिला चूल मुल आणि संसार ह्याच्या व्यतिरिक्त तिला इतर काहीही जीवनात अस्तित्व नाही. आस का विचारल्यावर पुन्हा तीच त्रुटी दिसून येते कि स्त्रीत्व चा आदर नसणे ..
...................................................................................................................................
आताच झालेलि दिल्लीची निर्भया केस आपण सगळ्यांनीच ऐकली .वाचली .. काय चूक होती तिची ? एवढीच कि ती दिल्लीमध्ये थोड उशिर झाल्यामुले घाईने चुकीच्या बस मध्ये बसली आणि इतका भयंकर क्रूर कृत्य घडल. तिच्या वर बलात्कार करणाऱ्या प्रत्येक माणसाला आई असेलच ना ? पण इथेच स्त्री बद्दलचा आदर कमी पडला आणि ती एक भोग वस्तू आहे हे त्यांनी पाहिलं ..................................................................................................................................
सगळी कडे फिरून शेवटी हेच मत येत कि मुलांना स्त्री चा आदर करता येवू लागला पाहिजे नाही तर अजून परिस्तिति गंभीर होण्यासाठी वेळ लागणार नाही. हि परिस्तिति फक्त ह्याच एका गोष्टीने सुटू शकते कारण व्यवस्तीत शिकलेले मुल हि आसा विचार करताना मी स्वत पाहिलं आहे कि रस्त्यावरून जाणारी मुलगी हि आपल्या साठी भोगवस्तू असू शकते
...................................................................................................................................
हा विचार करणारा मनुष्य स्त्रीला कधीच समजू शकत नाही आणि नाही तीच स्त्रीत्व ...
Subscribe to:
Posts (Atom)