काय असते हि नक्की म्हणजे नक्की कुठे असते आणि आहे कि नाही हे कसे ओळखायचे ? खरच खूप प्रश्न पडतात ना ?... पण हि गोष्ट ज्यांच्या जवळ असते ते ह्या जगातले सगळ्यात सुखी आणि श्रीमंत माणस असतात.
कस असा ? प्रश्न पडण स्वभावीकच आहे, हल्ली लोक थोडस काही तरी बिनसलं किंवा काही गोष्टी मनासारखी नाही झाली कि लगेचच डिप्रेस होतात, काहीना वाटू लागत कि संपल आता सगळ आणि तेच ते घोटत बसतात पण इथेच खरी परीक्षा सुरु होते ..
परवा अशीच घरी बसले होते आणि माझ्या काकूंची मैत्रीण आली, दुपारच होती..मी आपली निवांत पुस्तक वाचत झोपले होते त्या आल्या म्हणून उठून बसले,त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि बोलल्या काय ग तू कधी पासून पुस्तक वाचायला लागलीस? .. मी म्हटलं काही नाही,सध्या वेळच वेळ आहे. ओफीस मध्ये काही काम नाहीये आणि बाकी जे जे तरी करतेय ते पण काय ग्रेट होत नाहीये,वैताग आलाय .. सगळ्या गोष्टी माझ्या बाबतील घडतात,खरच कंटाळा आलाय मला सगळ्याचाच.सगळ माझ्याच बाबतीत बहुतेक देवानी प्लान करून ठेवलाय.
त्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि मला बोलल्या,तुम्ही आज कालची मुल इतक्या लवकर सगळ्या गोष्टीची कट कट कशी करून घेता, प्रत्येक गोष्टीचा त्रास तुम्हालाच आहे आस का वाटत तुम्हाला ? एवढ्या तरुण वयात लगेच गीवउप कस होता तुम्ही ? अख्खा आयुष्य पुढे उभ आहे आणि तुमच्याकडे कामतरता आहे ती विलपावर ची !
मी त्यांची कडे पाहताच बसले आणि मग मला कळली त्यांनी अनुभवलेली ती ३ वर्षे ...
त्यांना ३ वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता होता, एक असाध्य असा कॅन्सर.. सारकोमा
("http://en.wikipedia.org/wiki/Sarcoma"), हा एक पेशींचा कॅन्सर आहे शरीरातील कोणत्याही भागात हा मसलच्या आत पेशींमध्ये वाढतो. सारकोमा हा २ प्रकारचा असतो एक म्हंजे हाडान्माधला आणि दुसरा मसल मधला.त्यांना पायाच्या पोटरी मध्ये सारकोमा झाला होता.
पुण्यातील प्रत्येक स्पेशालीस्ट डॉक्टर ने त्यांना नाही संगीताल.वयाच्या ३५ ला अश्या प्रकारचा असाध्य रोग होणे हे एक वाईट नशीब नाही तर काय? त्या त्यांच्या भरलेल्या संसाराकडे पाहून त्या मरणयातना सहन करत होत्या. आस समजून कि हे जे काही शेवटचे दिवस आहेत ते तरी आपण आपल्या २ मुल आणि नवऱ्या बरोबर आनंदाने घालावूत. त्यांनी स्वताला घट्ट केल आणि काही न काही तरी पर्यंत करताच राहिल्या. वेगवेगळ्या डॉक्टर कडे जा, कोण कोण ला विचार,नेट वर माहिती मिळवणे तेवढ्यात त्यांना एका मुंबईच्या डॉक्टर चा पत्ता कळला, त्यांनी तिथे जावून दाखवून यायचं नक्की केल आणि त्या गेल्या... तिथे गेल्यावर त्यांना कळल कि त्यांचा कॅन्सर त्यांच्या त्या पायातील फक्त पोटरी पर्यंतच पसरलेला आहे आणि त्याच ऑपरेशन होण शक्य आहे,फक्त त्या ऑपरेशन मध्ये कदाचित पाय कापला जाण्याची शक्यता आहे. त्यांना नवी उमेद मिळाल्याने त्या ते करायला तयार झाल्या.पाय नसेल तरी मी माझ्या संसाराची गाडी नक्कीच कशीही पुढे ढकलू शकेल आस त्यांना वाटून गेल आणि त्यांनी डॉक्टरांना तसा पोसिटीव अतितूड ,विलपावर दाखवली, जी खरी अश्या प्रकारच्या उपचारासाठी आवश्यक असते आणि ते ऑपरेशन व्यवस्तीत पार पडले. सारकोमा फक्त पोटरी मध्ये असल्यामुळे त्यांचा पायाही शाबूत रोहिला फक्त पोटरी शिवाय.
त्यांनची इछाशक्ती जिंकली, त्यांनी मरणाला पण आपल्या इछाशक्ती ने दूर लोटले. आज ३ वर्षानंतरही त्या व्यवस्तीत सगळ करतात. कुठे कुठे फिरायला जातात, स्वताच्या पायावर उभ राहून सगळ करतात अगदी सामान्य माणूस करेल ते ...पण जर त्यानी त्या वेळेला त्यांनी गीवउप केल असत तर ? ..त्यांनी प्रयत्नच केले नसते आणि त्यांना कुठलाच उपाय दिसला नसता. तेव्हा इछाशक्ती हि अशी शक्ती आहे जी तुम्हाला कुठलेही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते. मला त्याचं हे सगळ ऐकून माझी लाज वाटली कि मी किती फालतू गोष्टीसाठी रडतेय.
आयुष्य हे एकदाच मिळत, पुढचा जन्म ..मागचा जन्म आस काहीच नसत. जे करायचं इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. त्यामुळे छान आनंदी राहा. आयुष्य छान जागा , स्वत हसा आणि दुसर्यानाही हसवा. कधीच कोणाला दुखवू नका. आणि सगळ्यात महत्तवाच कुठल्याही गोष्टी साठी "अशक्य" म्हणू नका.
इंस्पिरिंग आहे
ReplyDeleteखरतर प्रत्येकाजवळ हि शक्ती असते, ती कमी अधिक प्रमाणात वापरत असतो. मला वाटत मनापासून आपण कुठली इच्छा ठेवली आणि ती मिळवण्यासाठी प्रयत्न ठेवले तर कुटलीही इच्छा पुर्णत्वाकडे जाते. ती मिळवण्यासाठी आजू बाजूचं वातावरण आपल्याला नकळत मदत करत असतं. शाहरुख खानच्या ओम शांती ओम चा dialog मला खूप आवडतो, "किसीको अगर दिल से चाहो तो पुरी कायनात उसे मिलाने के लिये जूट जाती है". Newton ने काहीतरी करण्याची इच्छा ठेवली होती एक दिवस तो शेप झाडावरून पडला आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तो शेप आणि मुंबईचे ते डॉक्टर हा त्या "कायनात"चाच भाग, काही जन याला योगायोग म्हणतात, काही नशीब, तर काही देवाची कृपा, मला वाटत हा त्या शक्तीचाच प्रभाव असावा बहुतेक.......