Saturday, December 31, 2011

नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

Heyyyyyyyyy .. Glass of wine and Cocktails .... Chicken Chilly .. and old songs ... welcome 2012 !!!
Beautiful cold whether ... Awesome .. Happy new year !!

Thursday, December 15, 2011

सवाई गंधर्व भीमसेन उत्सवची झालेली माझी नवीन ओळख ...


सवाई गंधर्व भीमसेन उत्सव आणि माझा तसा काहीच संबंध नाहीये म्हणजे मला गान मला येत नाही आणि कळतही नाही , तस एक दोन वेळा मी सवाई ला गेले आहे पण ते असाच कोणाबरोबर तरी सोबत म्हणून गान ऐकायला नाही. पण ह्या वर्षी मात्र एक वेगळीच ओळख झाली माझी सवाई गंधर्व बरोबर ...
ते आस झाल कि मी नेहेमी प्रमाणे पित्ता मुळे आजारी पडले म्हणजे मला नेहेमीच हा त्रास होतो पण सध्या त्याच प्रमाण जरा जास्त चालू आहे . तर जास्त त्रास होत असल्याने मी फोन केला माझ्या फमिली डॉक्टर ना , त्याचं क्लिनिक १२:३० ला चालू होत म्हणून मी लगेचच नंबर लागावा ह्या हेतू ने फोन केला होता पण मला त्यांच्या रीसेप्शनिस्त कडून कळल कि ते त्या दिवशी लवकर येणार नाहीयेत कारण सवाई गंधर्व चालू आहे. मला वाटल अर्रे वाह डॉक्टरना गाण्याची आवड दिसतेय ..मग मी तिने सांगितल्या प्रमाणे २:३० ला दवाखान्यात गेले, पण तरीही डॉक्टर आले नवते मी म्हटलं अर्रे बापरे डॉक्टर एकदम जास्त दर्दी चाहते दिसतात सवाई चे आणि गाण्याचे . मी येवून बराच वेळ झाला, माझी त्यांच्याशी असलेली ओळख आणि माझा आजाराची तीव्रता बघून रीसेप्शनिस्त ने त्यांना फोन लावला तर ते सवाई मधेच होते पण मला कधी कधी सलाईन लावायला लागते म्हणून ते लगेचच आले.
सगळ तपासून झाल्यावर आणि औषध लिहून झाल्यावर मी त्यांना बोलले काय गान खुपच आवडत वाटत म्हणून दवाखान्याची वेळ हि ५ दिवांसाठी बदलली वाटत . माझ्याकडे न पाहताच त्यांनी मला ते सवाई चे त्रेस्त्री आहेत आस सांगितले मी एकदम त्यांच्या कडे दचकून पहिले आणि म्हटलं कस काय ? म्हणजे तुमचा दवाखाना इथेच आहे पहिल्या पासून म्हणून कि तुम्ही त्या बोडी वर आहात ? त्याने वर पहिले आणि अगदी शांत पणे म्हटले "अग मी सवाई गंधर्व ह्यांचा नातू आहे ते माझ्या आईचे वडील , त्यामुळे सगळे हक्क आमच्या कडे आहेत आणि म्हणूनच हे ५ दिवस पूर्ण लक्ष घालावाच लागत. सगळ्यात जास्त रसिकांना ह्या उत्सवाचा आनंद मिळावा म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही तिकिटांचे दर हि बदलेले नाहित, तू नाही वाटत जात ?? ".. मी डोळे मोठे करून हे सगळ ऐकत होते आणि मला काळातच नवत कि मी त्यांना काय विचारू कि काय बोलू .. मग मी थोड सावरून बोलले "नाही, मला कळत नाही गान .. पण पुढच्या वर्षी मात्र नक्की येईन .." ते बोलले "ये ये, समोरचा कोच आपण बुक करू जास्त महाग नाहीयेत त्याचेही दर .."
आस बोलून मी तिथून निघाले आणि विचार करू लागले ज्या लोकांकडे एवढी मोठी गोष्ट दाखवण्या सारखी आहे पण किती साधे पणे त्यांनी मला हे सांगितलं , अजून कोणी असत तर किती भाव मारला असता कि मी प्रत्यक्ष सवाई गंधर्व ह्यांचा नातू आहे . नाही तर ज्या लोकां कडे काहीही नसात ते हि उगाचच भाव मारून जातात .. मला वाटत ह्यालाच मनाचा मोठे पणा म्हणतात बहुतेक ..
काहीही असो , हे मात्र नक्की कि पुढच्या वर्षी सवाई गंधर्व भीमसेन उत्सवाचे छान फोटो मात्र नक्कीच काढायला मिळतील ...

Tuesday, December 13, 2011

न माझी मी राहिले , न माझी मी उरिले ......

तुझ्या डोळ्यात पहिले मी मला
न माझी मी राहिले ,न माझी मी उरिले

राहिले न माझे मी पण न थांबता विरघळून
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

सुंदर भासे सुंदर दिसे जगही आता
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

मन पक्षी पक्षी उडू लागले आकाशातून
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

गुंतले रेशमी बंध वाहिले चांदण्याचे गंध
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

तुझ्या डोळ्यात पहिले मी मला
न माझी मी राहिले , न माझी मी उरिले

Tuesday, December 6, 2011

डर्टी पिक्चर - उलाला उलाला .. !!!!

" जिंदगी एक बार मिलती तो दो बार क्यू सोचे ", "जवानी टेस्ट करने के लिये होती है वेस्ट करने के लिये नही" हि वाक्य आहेत डर्टी पिक्चर ह्या विद्या बालन च्या चर्चेत असलेल्या चित्रपटातील. सिल्क स्मिता ह्या साउथ च्या सेक्स बॉम् च्या जीवनावर आधारित चित्रपटात विद्या ने आपल्या दिखुलास आणि सगळाच खुलास अभिनयाने सगळ्यांना जिंकून घेतलं आहे.
परिणीता मधली विद्या आणि ह्या चित्रपटतील विद्या ह्या मध्ये जमीन असमांचा फरक तुम्हाला स्क्रीन वर बघायलअ नक्कीच मिळेल. चित्रपट छान घेतलाय , हळू हळू आपल्याला सिल्क चा तोलीवूड चा प्रवास कसा होता टे कळू लागत आणि चंदेरी दुनिया किती आतमधून पोखरलेली आहे ते हि कळत.
बाकी इंटरवल नंतर थोडा कंटाळवाना वाटला तरी मधेच चांगला वाटतो .. फक्त सुफियाना हे गान मात्र उगाचच काहीच गरज नसताना चित्रपट मध्ये घुसाडलाय हे मात्र सहन कराव लागत .. असो पण एकदारीतच चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही, चित्रपटाचे संवाद आपले पैसे वसूल करतात. विद्या आणि नसीर भाई चा अभिनय पाहून, ह्या वेळेचे सगळेच अवार्डस डर्टी पिक्चर ला असतील ह्यात काहीच वाद नाही.

माझ्या कडून ह्या चित्रपतासाठी ३ रेटींग ... उलाला उलाला .. गान मस्त हिट !!!!!!

Wednesday, November 30, 2011

पसाट .... wow simply woooow ...!!!


मला पहिल्या पासूनच गाड्यांच भयंकर आकर्षण आहे, कुठलीही नवीन गाडी बाजारात आली कि मला ती कधी एकदा पाहते आस नेहेमीच वाटत आणि बऱ्याच वेळेला मी गाड्यांचे स्पेसिफिकेशन पण अगदी आवर्जून पाहते . आमच्या दोन्ही गाड्या घेताना पण मी बराच विचार केला होता. माझी पहिली गाडी आम्हाला मोठी आणि आरामदायी हवी होती जी आम्ही बाहेरगावी जाताना वापरू म्हणून त्या वेळेला बाजारात इंनोवा गाडी जोरात चालू होती म्हणून मी इंनोवा ला प्रेफरन्स दिला. इंनोवा पण छान गाडी आहे एकदम मोठी, भव्य आणि आरामदायी आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे इंनोवाचा AC, सेकॅंदा मधेच गाडी पूर्ण गार होते. मग काही दिवसांनी मला रोजच्या कामासाठी आणि ऑफिस ला जाण्यासाठी वा गावात जाण्यासाठी इंनोवा खुपच मोठी वाटू लागली मग आम्ही इकॉनोमिकॅल गाडी घ्यायची ठरवली. इकॉनोमिकॅल गाडी म्हटल्यावर मारुती शिवाय मला नाही वाटत कुठल् दुसर नाव समोर येवू शकत. त्यावेलेलाही मी खूप गाड्या पहिल्या आणि सगळ्या मध्ये आवडली निसान ची मिअक्रा पण आधीच ठरवल्या प्रमाणे मला एक छोटी स्वस्त आणि नीट इकॉनोमिकॅल गाडी हवी होत म्हणून मी अल्टो k10 घेतली .. छान गाडी आहे. मग बरेच दिवस कुठली गाडी अशी पहिली नाही कि पुन्हा एकदा मान वळवून पहावी. आणि काही दिवसांनी एका गाडीची चर्चा बाजारात ऐकू येवू लागली ज्याच्या त्याच्या तोंडी एकाच नाव आणि त्या गाडीची स्तुती ... ती गाडी होती Volks Wagen – Pasaat ....
मी पसाटचे फिचर्स पाहून खुपच इम्प्रेस झाले आणि एक दिवस मला ती गाडी एका सिग्नल ला दिसली राखाडी कलर असलेली लांब रेखीव गाडी, ती जाई पर्यंत मी ती गाडी पाहत बसले मग काही दिवसातच पसाट रस्त्यावर दिसू लागली पण जेव्हाही दिसायची मी मागे वळून पाहायचेच
एक दिवस मी माझ्या काकूंकडे चालले होते शनिवार होता माझी गाडी मी रस्त्यावर सामन्तर पार्किंग मध्ये पार्क करत होते मग गाडीतून उतरून मी गाडीला लॉंक लावताना मला माझ्या गाडीच्या मागे पसाट पार्क होताना दिसली म्हटलं जाताना पाहाव तिच्या कडे तेवढ्यातच मला आवाज आला कि “मादाम, एवढ लॉंक नका करु, कोणी नाही चोरून नेणार गाडी ...” मी दचकून मागे पाहिलं तर माझा एक जुना मित्र चांगला मित्र बऱ्याच वर्षांनी माझ्या समोर पसाटमधून उतरत होता मग काय आमच्या गप्पा चालू झाल्या मधून मधून मी पसाटकडे पाहत होते तेवढ्यातच माझा मित्र मला बोलला आपण इथे उभ राहून बोलण्या पेक्षा होटेल मध्ये जाऊन कॉफी घेऊयात का ? मी म्हटलं चला ..., न राहवून मी त्याला बोलले मी चालवू का रे गाडी ?? पण त्याने उत्तर दिल ..पाहिलं तू पसाट काय आहे हा अनुभव बाजूला बसून घे आणि मग चालव .. मग काय गाडी चालू झाली आणि काय सांगू मी एवढी सही गाडी पहिलीच नाहीये कधीही its a computer ती गाडी एक रोबो आहे तिला मानुअल मोड वर चालवा व तिला ऑटो मोड वर .. जस्त लाजवाब ..मी मंत्रमुग्द्ध होवून गाडीच्या प्रत्येक फिचर्स पाहत होते, प्रत्येक सीईट साठी वेगळा AC आणि हिटर, सीईट हि आपल्या मणक्या च्या आकार प्रमाणे स्वतः सेट होते , हि अशी एकमेव गाडी आहे कि तिला बनवता हाडांचे डॉक्टरची मदत घेतली आहे , गाडी स्वतः स्वताला पार्क करते समोरच्या स्क्रीन वर पुढून मागून येणारे अडथळे दाखवते , हूड ऑटो मध्ये मागे घेता येते , मागच्या काचेला बटन ने गार्ड लावता येते, दरवाज्यांना बाजूला ओली छत्री ठेवली तरी ते पाणी बाहेर जाते अशी सोय दिलेय आणि अजूनही काही लहान साहन बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला बाकी दुसऱ्या गाड्यामध्ये बघायला नाही मिळणार .. आणि आराम वाह .. चालवता कळल हि नाही कि स्पीड १०० पर्यंत आहे एकदम स्मूथ .. wow simply woooow ...
मग काय पसाटअम्धून उतरू मस्त कॉफी आणि पूर्वीचे चे विषय .. कोण काय करतं आणि कोण कुठे आहे हे बोलता बोलता वेळ कसा गेला कळलाच नाही ..आणि ठरल्या प्रमाणे परत येताना मी पसाट चालावयाच मानसिक समाधान आणि स्वप्न जगवल ...
बाजारात ह्या बजेट मध्ये बहरपूर गाड्या आहेत मर्सिडीज आहे, BMW आहे, ऑडी हि ..पण पसाट ची गोष्ट वेगळी हे मात्र नक्की ...

Saturday, November 26, 2011

आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले ....


आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तोच चंद्र जो सगळ्यांना हवासा वाटतो
तोच चंद्र जो त्याच्या कवितेत असतो
तोच चंद्र जो तिच्या पुढे सुंदर नसतो
सुंदर असते ती, जी चंद्राला प्रश्न करते
खरच, आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तिचे हसणे पण चंद्राच्या त्या निखळ चांदण्यासारखे भासले
तिचे डोळे पण चन्द्रासारखे दिसले
नाही तर तिच्या डोळ्यात तरी चंद्र दिसला
आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
ती समोर दिसावी म्हणून चंद्र समोर दिसू लागला
आणि आता ती लाजली असेल आस वाटल कारण
चंद्र ढगात लपला ...

Tuesday, November 22, 2011

पोर्न स्टार सन्नी लीवओन ची बिग्ग बोस नावाच्या रिअलिटी शो मध्ये एन्ट्री ..खरच गरज आहे का ?




पोर्न स्टार सन्नी लीवओन ची बिग्ग बोस नावाच्या रिअलिटी शो मध्ये एन्ट्री .. हि बातमी वृत्तवाहिन्यावर झळकताच, आपले सगळे लोक खडबडून जागे झाली. सगळ्या वाहिन्यावर तेच तेच बातम्या आणि त्याच एका बातमीवर वाद विवाद चालू झाला !
कळत नकळत मी हि असंच बातमी पहिली आणि जास्त काही कळण्याच्या आताच मी दुसऱ्या चानेल चा नंबर दाबला पण लक्षात राहील फक्त नाव सन्नी लीवओन ...एक पोर्न स्टार
दुसऱ्या दिवशी पेपर वाचून झाल्यावर माझ्या ते नाव एकदमच माझ्या डोक्यात आल मग मी विचार केला पोर्न स्टार म्हणजे नक्कीच हे सगळ नग्नता आणि अश्लीलता असलेले मॉडेल बद्दल असेल म्हणूनच एवढा आरडा ओरडा सगळ्या वृत्तवाहिन्या वर चालू होता. कधीही न पाहिलेला चेहेरा आणि कधीही न ऐकलेलं नाव कोणाच आहे हे पाहण्यासाठी मी गुगल केल आणि मला घाम फुटला जे काही माझ्या समोर आल ते पाहून ... त्या सगळ्या होत्या पोर्नोग्राफी च्या साईटस आणि हि सन्नी आहे त्या साईटसची स्टार ...
आणि ह्या एवढ्या मोठ्या रिअलिटी शो मध्ये हिला बोलावलंय .. का ? कश्या साठी ? असे भरपूर प्रश्न माझ्या समोर आले .. उत्तर फारच सोप आहे ह्या वाहिन्यांना हवा आहे पैसा आणि यश, प्रसिद्धी .. TRP वाढवण्यासाठी काय वाटेल ते करतील हि लोक उद्या काय वाटेल ते दाखवतील, स्वताच्या स्वार्थासाठी हे लोक हे का नाही विचार करत कि आपण जे काय दाखवतोय ते एका नेशनल वाहिनी वर दाखवतोय आणि हे सगळ फक्त १८+ लोक नाही तर सगळे पाहत आहे, अगदी लहान मुल हि ...
आता हेच उदाहरण घ्या ना मला हे नाव माहित नवत तिचा चेहेरा माहित नवता म्हणून मी गुगल केल माझ्या प्रमाणे भरपूर लोक असतील जे असच करतील आणि सोडूनही देतील पण जर नुकत्याच वयात आलेली कोणीही मुल आणि मुलीने हेच केल आणि त्यांना कळाल कि हि कोण आहे तर त्यांच्याच सामान्य ज्ञानमध्ये नको त्या गोष्टीची भर नाही का पडणार आणि गरज नसताना आणि वयही नसताना ..
आपलीच लोक पैश्यासाठी अश्या गोष्टी समोर आणून माहित नसलेल्या आणि नको असलेल्या लोकांना प्रसिद्धी मीळवून देतात ह्याच गोष्टीच मला नवल वाटत .. आज कोणालाही माहित नसलेली हि मुलगी अचानकच समोर आली आणि फेमस हि झाली .. सगळ कश्या साठी TRP आणि पैश्यासाठी ... आणि काय तर तिला हिंदी चित्रपट साठी पण ऑफर मिळतेय खरच कहर आहे निर्लजतेचा !!

Monday, November 14, 2011

देवूळ ... छान मार्केटिंग चित्रपट ..




जेव्हा मी देवूळच पोस्टर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर ह्या दोघांची जोडी पहिल्यांदाच एका छान चित्रपटात काम करतेय हे पाहून मस्त वाटल. त्यांच्या वृत्तवाहिन्यावर येणारे इंटरवीएव्स पाहून वाटल चला एक छान चित्रपट बर्याच दिवसांनी येतोय मस्त बघू सिनेमा गृहात जावूनच ...
कुलकर्णी'स चा असलेला हा दुसरा चित्रपट म्हणजे "वळू" नंतरचा .. तीच टीम फक्त बदल आसा कि एक कुलकर्णी गायब म्हणजे अतुल कुलकर्णी च्या जागी नाना पाटेकर बस ! बाकी तेच गाव, तेच डोंगर , तीच घर ,तीच मानस सगळ तेच .. असो पण गोष्ट तर वेगळी आहे ना ?
असं म्हणत गेले चित्रपट पाहायला ... लोकांची तशी गर्दी होती म्हणजे होऊस्फुलाच होता जवळ जवळ ... छान वाटल पाहून कि मराठी प्रेक्षक हल्ली सिनेमे चित्रपट गृहातच येवून पाहतात ..
चित्रपट चालू झाला आणि हळू हळू कळायला लागले कि आरे नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर हे च खरे तर मार्केटिंग चे हत्यार आहे .. म्हंजे चित्रपटाचा विषय अतिशय छान आहे आणि तो दाखवलाय पण छान, छोटे छोटे बारकावे पण दिग्दर्शकाने व्यवस्तीत पाने पार पाडलेत .. विषय कुठेही कंटाळवाणा त्याने होऊ दिला नाहीये म्हणजे थोडक्यात विषयाला छान जगवालाय हा चित्रपट ..
एक छोट खेड तेच जे वळू मध्ये होत ते, एका गुराख्याला म्हणजे हा गुराखीच पूर्ण चित्रपटाचा नायक आहे , हा तर त्याला एका भर दुपारी एका उंबराच्या खाली झोपलेला असताना साक्षत्कार होतो कि त्याला दत्त दिसले ! बस मग काय हि बातमी पूर्ण गावात पसरते सगळे हळू हळू तिथे येवून दर्शन घेवू लागतात त्यात गावातले काही मोठे लोक म्हणजे राजकारणी लोक त्याच बातमीचा फायदा घेवून राजकारण सुरु करतात आणि सगळी पोवर वापरून अनादित्रीत्या त्या जागी एक देवूळ बांधतात, ज्या गावामध्ये खरतर एका सरकारी इस्पितळाची गरज असते तिथे उभ राहत एक मंदिर एक देवूळ आणि तेच देवूळ मिळवून देत तिथल्या लोकांना पोट आणि खिसा भरण्याचे साधन ... जी लोक राजकारण खेळूनच त्या गावासाठी वीज, पाणी, रस्ते करू शकलेले नसतात तीच देवूळ झाल्याने सगळ काही करून देतात कारण त्यांना त्याचा मागे मिळत असतो पैसा ... अमाप पैसा !!
पुढे गावच गावपण हिरावल जात .. जो तो पैश्याच्या मागे पळताना दिसतो आणि ज्या दत्ता मुळे हे सगळ मिळाल असत त्यालाच विसरून जातो ..
पण ज्याला ह्या सगळ्या गोष्टीचा साक्षत्कार झालेला असतो तो काश्या समजू लागतो खरी परीस्तीती ..आणि तो एक दिवस देवालाच चोरतो आणि घेवून जातो गावापासून खूप लांब आणि बिचाऱ्याला वाटते चला देव गेला तर गाव पूर्वी सारख छान होईल पण तसं काही घडत नाही .. आणि मग हा चित्रपट संपतो ..हो म्हणजे खरच संपतो
आता तुम्ही बोलाल ह्यात नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर आहेत कुठे ? तेच तर ते खरच, आहेत कुठे ? नाना पाटेकर तरी आपल्याला थोडा दिसतो राजकारणात गावाचा पाटील म्हणून आणि थोडासा चित्रपट नानाच्या वाटेला आला आहे पण दिलीप प्रभावळकर तर फक्त गावाच्या पाटला कडे गावामध्ये होणारे इस्पितळ ची इमारत कशी असेल आणि हा पूर्ण प्रोजेक्ट कसा काम करेल फक्त हेच सांगतो तेही फक्त अर्ध्या चित्रपटात नन्तर तोही निघून जातो म्हणजे मी तर हा चित्रपात बनवला आसता तर कदाचित दिलीप प्रभावळकर ला पाहुणा कलाकार म्हनून संबोधल असत ..पण इथेच आल मार्केटिंग नाना- प्रभावळकर च्या जोडीला पुढे करून हा चित्रपट खूप गर्दी खेचतोय हेच तुम्हाला पाहायला मिळेल पण जर तुम्ही खास नाना व प्रभावळकर चा अभिनय पहायचा अस काहीस मनात ठेवून हा चित्रपट बघायला गेलात तर मात्र तुमच्या पदरी निराशा अपेक्षित आहे ..
केवळ मार्केटिंग हेच हत्यार वापरलाय ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ... जेवढा खर्च चित्रपट बनवण्यासाठी केलाय तेव्हढाच मार्केटिंग साठी ... "दुनिया झुकती ही झुकाने वाला चाहिये" हे मात्र खर ठरत खास देवूळच्या बाबतीत ..असो एकंदरीत मराठी चित्रपट सुद्धा आता हिंदी वाल्यासारखे आपल्या चित्रपटाचे मार्केटिंग खास करून गर्दी खेचू शकतात हे तितकाच खर !!!

Wednesday, November 2, 2011

प्रवास आवडीचा ...

आज मे उप्पर आसमा नीचे, आज मे आगे जमाना हे पीछे …

आज रस्ता तोच होता, तीच तीच गाव मागे मागे जात होती, वातावरणही तेच होते, छान दुपार उन्हात न्हाली होती, वारा मस्त सुसाट घाटातून वाहत होता, शेजारून छान मुळशी धरणाचे पाणी हळूहळू मागे सरत होते ..
रस्त्यात त्याच टपऱ्या, चहाची दुकाने आणि हॉटेल्स ..नेहेमीची गर्दी, नेहेमीच्याच स्पोटला लोकांच्या गाड्या उभ्या होत्या, कोणी फोटो काढताय तर कोणी मस्त झाडाच्या खाली बसून जेवणाचा आनंद घेत आहेत ..
वाह ... वाह!! मोठा वीकेंड त्यामुळे ताम्हीनीही घाटही व्यवस्तीत गाड्यांच्या गर्दिनी फुललेला दिसत होता. बऱ्याच ठिकाणी थांबायचा मोह मला झाला पण आजचा प्रवास वेगळा होता नेहेमीसारखा न्हवता, मला लवकरात लवकर माझ गाव गाठणे आवश्यक होत .. आणि नेहेमी प्रमाणे माझ डोक हि दुखत नवत आणि घरी जाऊन दुखणार पण नवत कारण ह्या वेळेला एकाच मोठा फरक होता माझ्या प्रवासामध्ये आणि तो म्हणजे मी स्वत इंनोवाच्या कारच्या ड्रायवर सीटवर बसले होते तसं इंनोवाला कार नाही म्हणता येणार इंनोवा म्हणजे एक मिनी ट्रक आहे ..
एकेकाळी मला अशक्य वाटणारी गोष्ट कि मी कधी इंनोवा सारखी मोठी गाडी घेवून ३ तासाचा घाट असलेला रस्ता पूर्ण पुण्यापासून कधी चालवू शकेन … पण शेवटी अशक्य काही नसत आणि मला तर वाटत कि ज्या गाड्या जास्त मोठ्या दिसतात त्या चालवायला तेवढ्याच सोप्या असतात .. रोज पुण्यात छोटी कार चालवून जेवढा आत्मविश्वास वाढला होता त्यापेक्षाही ह्या प्रवासाने मला एक नवीन भरारी मिळाली.
असो , पण हा माझा पहिला स्वत केलेला प्रवास खूपच अविस्मरणीय राहील ह्यात काहीच शंका नाही .. पण ह्या पुढे मी जगातली कुठलीही गाडी कुठेही चालवू शकते हे मात्र नक्की ...

Friday, October 21, 2011

ईच्छाशक्ती .. The WillPower

काय असते हि नक्की म्हणजे नक्की कुठे असते आणि आहे कि नाही हे कसे ओळखायचे ? खरच खूप प्रश्न पडतात ना ?... पण हि गोष्ट ज्यांच्या जवळ असते ते ह्या जगातले सगळ्यात सुखी आणि श्रीमंत माणस असतात.
कस असा ? प्रश्न पडण स्वभावीकच आहे, हल्ली लोक थोडस काही तरी बिनसलं किंवा काही गोष्टी मनासारखी नाही झाली कि लगेचच डिप्रेस होतात, काहीना वाटू लागत कि संपल आता सगळ आणि तेच ते घोटत बसतात पण इथेच खरी परीक्षा सुरु होते ..
परवा अशीच घरी बसले होते आणि माझ्या काकूंची मैत्रीण आली, दुपारच होती..मी आपली निवांत पुस्तक वाचत झोपले होते त्या आल्या म्हणून उठून बसले,त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि बोलल्या काय ग तू कधी पासून पुस्तक वाचायला लागलीस? .. मी म्हटलं काही नाही,सध्या वेळच वेळ आहे. ओफीस मध्ये काही काम नाहीये आणि बाकी जे जे तरी करतेय ते पण काय ग्रेट होत नाहीये,वैताग आलाय .. सगळ्या गोष्टी माझ्या बाबतील घडतात,खरच कंटाळा आलाय मला सगळ्याचाच.सगळ माझ्याच बाबतीत बहुतेक देवानी प्लान करून ठेवलाय.
त्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि मला बोलल्या,तुम्ही आज कालची मुल इतक्या लवकर सगळ्या गोष्टीची कट कट कशी करून घेता, प्रत्येक गोष्टीचा त्रास तुम्हालाच आहे आस का वाटत तुम्हाला ? एवढ्या तरुण वयात लगेच गीवउप कस होता तुम्ही ? अख्खा आयुष्य पुढे उभ आहे आणि तुमच्याकडे कामतरता आहे ती विलपावर ची !
मी त्यांची कडे पाहताच बसले आणि मग मला कळली त्यांनी अनुभवलेली ती ३ वर्षे ...
त्यांना ३ वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता होता, एक असाध्य असा कॅन्सर.. सारकोमा
("http://en.wikipedia.org/wiki/Sarcoma"), हा एक पेशींचा कॅन्सर आहे शरीरातील कोणत्याही भागात हा मसलच्या आत पेशींमध्ये वाढतो. सारकोमा हा २ प्रकारचा असतो एक म्हंजे हाडान्माधला आणि दुसरा मसल मधला.त्यांना पायाच्या पोटरी मध्ये सारकोमा झाला होता.
पुण्यातील प्रत्येक स्पेशालीस्ट डॉक्टर ने त्यांना नाही संगीताल.वयाच्या ३५ ला अश्या प्रकारचा असाध्य रोग होणे हे एक वाईट नशीब नाही तर काय? त्या त्यांच्या भरलेल्या संसाराकडे पाहून त्या मरणयातना सहन करत होत्या. आस समजून कि हे जे काही शेवटचे दिवस आहेत ते तरी आपण आपल्या २ मुल आणि नवऱ्या बरोबर आनंदाने घालावूत. त्यांनी स्वताला घट्ट केल आणि काही न काही तरी पर्यंत करताच राहिल्या. वेगवेगळ्या डॉक्टर कडे जा, कोण कोण ला विचार,नेट वर माहिती मिळवणे तेवढ्यात त्यांना एका मुंबईच्या डॉक्टर चा पत्ता कळला, त्यांनी तिथे जावून दाखवून यायचं नक्की केल आणि त्या गेल्या... तिथे गेल्यावर त्यांना कळल कि त्यांचा कॅन्सर त्यांच्या त्या पायातील फक्त पोटरी पर्यंतच पसरलेला आहे आणि त्याच ऑपरेशन होण शक्य आहे,फक्त त्या ऑपरेशन मध्ये कदाचित पाय कापला जाण्याची शक्यता आहे. त्यांना नवी उमेद मिळाल्याने त्या ते करायला तयार झाल्या.पाय नसेल तरी मी माझ्या संसाराची गाडी नक्कीच कशीही पुढे ढकलू शकेल आस त्यांना वाटून गेल आणि त्यांनी डॉक्टरांना तसा पोसिटीव अतितूड ,विलपावर दाखवली, जी खरी अश्या प्रकारच्या उपचारासाठी आवश्यक असते आणि ते ऑपरेशन व्यवस्तीत पार पडले. सारकोमा फक्त पोटरी मध्ये असल्यामुळे त्यांचा पायाही शाबूत रोहिला फक्त पोटरी शिवाय.
त्यांनची इछाशक्ती जिंकली, त्यांनी मरणाला पण आपल्या इछाशक्ती ने दूर लोटले. आज ३ वर्षानंतरही त्या व्यवस्तीत सगळ करतात. कुठे कुठे फिरायला जातात, स्वताच्या पायावर उभ राहून सगळ करतात अगदी सामान्य माणूस करेल ते ...पण जर त्यानी त्या वेळेला त्यांनी गीवउप केल असत तर ? ..त्यांनी प्रयत्नच केले नसते आणि त्यांना कुठलाच उपाय दिसला नसता. तेव्हा इछाशक्ती हि अशी शक्ती आहे जी तुम्हाला कुठलेही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते. मला त्याचं हे सगळ ऐकून माझी लाज वाटली कि मी किती फालतू गोष्टीसाठी रडतेय.
आयुष्य हे एकदाच मिळत, पुढचा जन्म ..मागचा जन्म आस काहीच नसत. जे करायचं इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. त्यामुळे छान आनंदी राहा. आयुष्य छान जागा , स्वत हसा आणि दुसर्यानाही हसवा. कधीच कोणाला दुखवू नका. आणि सगळ्यात महत्तवाच कुठल्याही गोष्टी साठी "अशक्य" म्हणू नका.

Sunday, October 16, 2011

FTI - शोर्ट फिल्म्स फेस्टिवल ...

दोन दिवसा पूर्वी FTI मध्ये शोर्ट फिल्म्स फेस्टिवल झाला, मी गेले होते .. थोडा वेळ होता म्हणून त्यामुळे सगळे फिल्म्स नाही पाहू शकले पण जे काही पहिले त्यातले ३ फिल्म्स विचार करायला लावणाऱ्या होत्या .. पूर्ण दिवस मी त्या ३ गोष्टींवर विचार केला आणि काही जवळच्या लोकांबरोबर मी त्या फिल्म्सच विषयी बोललेही ..पण नंतर मात्र मी ते विसरून गेले ..
पण कालच त्या फेस्तीवलचा निकाल लागला आणि त्यात तेच फिल्म्स अव्वल ठरले जे मला विचार करायला लावणारे होते .. त्यातला एक होता २१२ ० fahrenheit, ज्यामधून दाखवलं गेल होत जर तापमान २१२ fahrenheit म्हणजे १०० degree ला गेले तर काय होईल .. लोक कधी एका पाण्याच्या बाटली साठी एकमेकांच्या जीवांवर उठतील आणि लोक पाणी मिळवण्या साठी काय काय करतील, कस bank चे लोकरहि पाण्यासाठी वापरतील कारण तेव्हा पाण्याला सोन्या पेक्षा जास्त किंमत असेल ... त्यामुळे तुम्हीही थोडा वेळ विचार करून बघा जर खरच पृथ्वीच तापमान १०० डेग्री गेल तर काय होऊ शकेल ?
दुसरा विषय होता कमीत कमीत वेळेत पैसे मिळवण्याच्या मागे धावण्याने लोक कसे स्वताच्या तोंडावर पडतात ..त्यासाठी त्यांनी दाखवलेलं उदाहरण पण छानच होत, नाव होत वर्तुळ ..एक छोट खेड .. आणि त्यातलं एक गरीब कुटुंब ..एक लहान मुलगा .. ज्याची आई त्याला पुरणपोळी साठी गुळ आणायला पाठवते आणि त्याला जाताना २ रुपये देते .. मग त्याला कसे मित्र भेटतात आणि त्याला अनेक मोह होतात पण तो स्वताच्या मनावर ताबा मिळवतो पण पुढे जावून आपल्या मित्राला मिळालेल्या अचानक पैश्यातून तो मोहात पडतो आणि आपले असलेले २ रुपये पैसे लावून खेळणाऱ्या मुलांबरोबर खेळतो आणि पैसे जातात पण हातात काहीच येत नाही म्हणजे २ रुपये पण नाहीत आणि गूळही नाही ...
तिसरी फिल्म होती दोन म्हातारपणाच्या उंबर्थ्याकडे पोहचलेले जोडपे ... ज्यातलं एक माणूस जग सोडून लवकरच जाणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे मरणा विषयीचे बोलणे ... विषय थोडा जड होता आणि संवाद हि मला बरेच जड वाटले पण विषय चांगला हाताळला होता ... ह्या फिल्म च नाव होत थे Gateway of Heaven ! ...
नवीन शिकणारे लहान लहान लोक किती छान फिल्म्स बनवतात हेच अश्या प्रकारच्या फेस्टिवल मधून बघता येत आणि त्यांची छान पारख करता येते... कदाचित ह्यातूनच कोणी तरी पुढे जावून नसरुद्दिन शहा,जाया बाधूरी किवा स्मिता पाटील,नाना पाटेकर,आणि आताच रोहित शेट्टी ... बनतील आणि आपली करमणूक करतील .

Monday, October 10, 2011

‘गझलसम्राट’ काळाच्या पडद्याआड ...




सगळ्या गझल प्रेमीना अतिशय दुखद घटना. मी अस हि काही ऐकल होत कि जी लोक दारू पीत नाहीत त्यांना जगजीतजिच्या गझलने नशा चढायची आणि नेहेमीच चढत राहील ह्यात काहीच वाद नाही. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने त्यांच्याच गझल ऐकवून स्वताच्या प्रियकर व प्रेयसीला खुश केले असेल. आता ह्या पुढे नवीन गझलचा रूपाने काहीच ह्या लोकांना मिळणार नाही पण त्यांची एक आणि एक गझल अजरामर राहील .. थोडक्यात गझल गायीकी ते गेल्याने अनाथ झाली.

गझलला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यात त्यांच मोठं योगदान होतं. जगजीत सिहं यांनी ५० पेक्षाही जास्त अलबममध्ये गाणं गायलं आहे आणि त्याचं गझलांचं प्रमाण जास्त आहे.
तुमको देखा तो ये खयाल आया, होठों सेछुलो तुम मेरा गीत अमर कर दो, वो कागज कश्ती वो बारिश का पानी यांसारख्या गझल फारच लोकप्रिय होत्या.

तुम इतना जो मुस्कारा रहे हो (अर्थ), चिठ्ठी न कोई संदेस (दुश्मन), होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है (सरफरोश), हाथ छुटे तो रिश्ते नही छोडा करते (ट्रफिक सिग्नल) यांसारख्या त्यांच्या अनेक गझल चित्रपटांमधून ऐकायला मिळाल्या.

पण आज फिर आखे नम सी हे ....

Sunday, October 9, 2011

विसरलास का सोडवायचेत अजून तुला खूप सारी कोडी .. ?




एक चूक आयुष्यातील, पुरते आयुष्यभर
कारण हजार कोडी टाकून जाते, हसून जीवनभर

एक कोड संपल कि दुसर उभ राहत
आणि सोडवत सोडवत, झालेल्या चुकेची आठवण करून देत

मन मारत मारत पुढे जाताना वाटत
करता येईल का ? मला माझ्या आयुष्यात एक तरी अंडू

ह्याच उत्तर माहित असत
म्हणूनच, जगत जातो करत पुन्हा पुन्हा रीडू

कधी वाटत झाल, संपली सगळी कोडी आता जगू मनावाणी
तेवढ्याच मन म्हणत अररे .. विसरलास का सोडवायचेत अजून तुला खूप सारी कोडी

पूर्ण जीवनाच्या चुकामुकीला तेवढ एकच निमित्त पुरत
झालेल्या भूल चुकीला खाकोत्याला बांधत

त्यातूनच शिकत शिकत जगावं लागत
केलेल्या प्रमादाने जगच भूल भुलैया दिसू लागत

आणि लोक कितीही चुकलेली असली तरी आपलीच भूल जाणवून देतात
कारण, आपले जवळचेही हसत हसत त्यांच्यात सामील होतात

Monday, September 26, 2011

मी .. कधी न संपणारी सुखाची चाहूल ...

जळून जाशील .. आग आहे मी ..
कधी न संपणारी वाट आहे मी ..

जितका जवळ येशील धग जाणवेल तुला ..
काही विचार करण्या आधीच ती संपवेल तुला ..

वाटत असेल सुंदर जाईल जीवन माझे
कस समजावू तुला, नको अडकुस .. हे मृगजळ असेल..

कारण अडकलास तर वाहत जाशील
इतका दूर, कि परत येण्याशी वाट विसरशील ..

विसरशील भूक आणि विसरशील जग..
कारण मला माहितेय, माझ्या आहे ती धग ..

माझा कडे आलास तर, माझाच होऊन जगू लागशील
वीज आहे मी, उर्जा आहे, मी .. कधी न संपणारी सुखाची चाहूल आहे.

Tuesday, September 20, 2011

जीवन ऐसे नाव !

आज काहीसा कामाचा मूड अजिबातच नवता ... म्हणजे अगदी सकाळ पासूनच .. सकाळी उठल्यावर अस वाटल कि आज जाऊच नये ऑफिसला ..पण मग विचार केला उगाचच सुट्टी कशाला वाया घालवायची .. मग पटकन आवरून जॉब ला गेले आणि दुपारी मस्त कलटी मारली .. तस मी सकाळीच निघताना कॅमेरा आणि लेन्सेस घेतल्या होत्या ... हाच विचार करून कि जर कलटी मारता आली तर उगाच पुन्हा घरी जायला नको ..
मस्त गाडी ला स्टार्टर मारला, गोगल ओन आणि AC हि ओन .. कार मस्त सिह्नगड रोड ला घातली आणि direct खडकवासला ! मस्त वातावरण होत .. गेल्या गेल्या एक मस्त चहा घेतला आणि विचार केला काय click करायचं ? मग, इकडे तिकडे पहिल्या वर बरंच काही दिसू लागल जे कॅमेऱ्या मध्ये नजर कैद होण्या साठी आतुर होत ..
मग पुढच्या १ तासात मी आणि माझा कॅमेरा काम करत होतो .. खूप काही होत तिथे वेगवेगळी फुल होती, नजर जाईल तिथ पर्यंत पाणी होत , त्यात काही नौका मस्त बागडत होत्या, काही पक्षी उडत होते काही चं झाडावर बसून पाण्यात पाहत होते आणि काही पक्षी झाडा झुडपाच्या मागे बसून आयुष्य बद्दलचे समीकरण बनवत होते ... वचन देत होते .. कधीच वेगळ न होण्याचं !
फ्रेश वाटल पाहून सगळ ... बर्याच जोडप्यांना वाटल कि मी त्यांचे च फोटो काढतेय कदाचित ... पण मी त्यांच्या कडे बघून सांगितलं ..घाबरू नका .. मी हि इथे बसून गेलेले आहे .. तुमच्या साराकीच मलाही खूप वचन मिळती होती .. !! पण वेड्या त्या जीवांना काय आणि कोणी सांगावे कि खर अस काहीच नसत .. पण ते नंतर कळत आणि तेव्हा खूप उशीर झालेला असतो .. असो !
तिथून मी निघणार आणि पावसाने हि मस्त हजेरी लावली .. संध्याकाळ मस्त पावसात नाहली .. मग पाऊस माझा सोबती बनून अगदी पुण्या पर्यंत म्हणजे घर पर्यंत आला .. घरी आले मस्त फ्रेश झाले आणि पुन्हा बाहेर पडले थोड्याश्या कामाने ..काम तर झाले पण बर्याच दिवसांनी माझी नजर पुस्तकांच्या दिशेने वळली .. माहित मला काय वाटल आणि मी आज चक्क चक्क ६ पुस्तके विकत घेतली .. माझ मलाच कळल नाही कि इतकी पुस्तक कशी काय घेतली ... एक घ्यायला गेले आणि हे पण छान वाटतंय आणि ते हि छान असेल अस करत करत ... शेवटी म्हटलं बस .. पैसे संपले आता ..

काही दिवस खूप काही देवून जातात आणि काही खूप काही हिरावून घेतात .. खर तर ह्यालाच जीवन म्हणतात .. कदाचित !!!

Saturday, September 3, 2011

गुंतता ह्रिदय हे ...

मनाची मना ला लागतसे आस
प्रीतीच्या फुलांना चांदण्याचा वास
पाखरू जीवाचे ... अडकत जाते
सुटका न होते ...

Monday, August 15, 2011

अन्ना हजारे - जेल भरो !!

आज सरकारला दाखवण्याची वेळ आली आहे कि जर पूर्ण भारत एकत्र आला तर काय घडू शकत ! मी अण्णांच्या बरोबर आहे आणि माझ त्यांनाच पूर्णपणे समर्थन आहे. पूर्ण देश जर आज एकत्र आला तर एक नवीन इतिहास घडवून आणू.
मी पुण्यातून आणला समर्थन करतेय तुम्ही जिथे आहात तिथून , प्रतेक्ष्य व अप्रतेक्ष्य पणे अण्णांना समर्थन करा .. माझ्या साठी नाही व अण्णांसाठी हि नाही स्वतासाठी , तुमच्या भविष्य साठी ... तुमच्या देश साठी ...
जय हिंद !!

लवकरच मी पुण्यातील rallye चे फोटो प्रदर्शित करेन.

Sunday, July 17, 2011

"हर एक के सच के versions होते है"

"हर एक के सच के versions होते है" ! हि ओळ आहे नुकताच आलेल्या नव्या चित्रपट "जिंदगी मिलेगी न दुबारा" मधील .. जिंकाल ह्या ओळीने ! खरच प्रत्येकाला आयुष्यात जेव्हा खर बोलायची वेळ येते तेव्हा त्याचे खर बोलायचे वेगवेगळे versions तयार होतात, म्हणजे तो जे खर बोलत असतो ते त्यासाठी खर असत म्हंजे स्वतासाठी बनवलेलं खर आणि इतरांसाठी किवा इतर सगळ्यासाठी वेगवेगळे versions .. तस तो प्रसारित करतो.
गम्मत अशी असते कि त्या माणसाने त्याला चांगल वाटाव आणि त्याच्या साठी ते एकदम बरोबर ठराव आस एक खर बोलण्याच version तयार केलेलं असते त्यात तो पूर्ण पणे Hero असतो मग तो समोरच्या माणसाला किवा वेगवेगळ्या लोकांना त्याच एका "खरच्या" release च वेगवेगळे verions सांगायला सुरुवात करतो .. पण विचार करा न समजा हीच सगळी लोक जर एकत्र आली तर तेच "खर" एका नवीन version मध्ये बाहेर येत, ते त्या माणसाच खोट आणि त्या खऱ्याच अगदी खरे खरे version असत.
बर असो, "जिंदगी मिलेगी न दुबारा" ..एक छान चित्रपट वाटला, तरुणाईचा आवक असलेला , कुठे तरी "दिल चाहता हिची" आठवण करून देणारा पण बराच फरक असलेला अगदी आताच्या काळाप्रमाणे असलेला.
चित्रपट बऱ्या पैकी वेग आहे, कंटाला येत नाही, सगळ्यांची काम छान झालीत worth to watch ... माझ्या कडून ३ आणि १/२ *

Friday, July 8, 2011

मला सगळ आवरल्या शिवाय चैनेच पडत नाही

बेडा घाट वरून परत आल्यावर सगळ्यात मोठ काम माझ्या समोर होत ते म्हणजे सगळ्या bags आवरून सगळ समान जागच्या जागेवर ठेवणे ... मग काय रात्री जेव्हा मी पुण्यात पोहोचले खूप जास्त थकले होते .. सगळ तसाच ठेवून झोपून गेले आणि सकाळी उठल्यावर माझ काम चालू ...
माझा प्रोब्लेम असा आहे न कि मी कितीही थकलेले असले तरी मला सगळ आवरल्या शिवाय चैनेच पडत नाही ... सगळ्या bags उघडून सगळ्यात आधी मी धुण्याचे कपडे वेगळे केले तसे मी ते थिथूनच वेगळे करून आणले होते ... ते आधी वाशिंग मचिन ला लावले , जे जास्त मळले होते ते गरम पाण्यात भिजवले मग next जे कपडे dycleaning ला जाणार होते एका पिशवीत टाकले. मग बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे माझे cosmatices सगळे जागच्या गेवर ठेवले मग बाथरूम गोष्टी जागेवर गेल्या ..मग सगळे चप्पल आणि shoes पुसून, कागद मध्ये गुंडाळून जागेवर ठेवले ... पूर्ण bag रिकामी करून bagechya जागेवर ... जेव्हा माझी पूर्ण रूम पाहोल्या सारखी दिसू लागली तेव्हा माझ्या जीवात जीव आला ...
काही लोक मी पाहिलेत bags तश्याच ठेवून महिना भरही तसेच राहू शकतात .. मला खरच आश्चर्या वाटत ...